Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instamart च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नंदिता सिन्हा यांची नियुक्ती! आधी ‘या’ मोठ्या कंपनीत बजावली भूमिका

इंस्टामार्टने नंदिता सिन्हा यांची ३ ऑगस्ट २०२६ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती जाहीर केली असून त्या अमितेश झा यांची जागा घेणार आहेत. स्विगीचे CEO श्रीहर्ष मजेटी यांनी नंदिता यांच्या नेतृत्वगुणांवर विश्वास व्यक्त करत, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनामुळे इंस्टामार्टच्या वाढीला नवी गती मिळेल, असे सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 28, 2026 | 07:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतातील आघाडीच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इंस्टामार्टने नंदिता सिन्हा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांची नियुक्ती ३ ऑगस्ट २०२६ पासून प्रभावी होणार असून त्या अमितेश झा यांची जागा घेतील. ई-कॉमर्स आणि ग्राहक इंटरनेट क्षेत्रातील दोन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या नंदिता सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली इंस्टामार्टच्या पुढील वाढीच्या टप्प्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

EPFO Portal: PF खातेधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवीन ई-पोर्टल लाँच; जाणून घ्या कसा होणार फायदा

स्विगीचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मजेटी यांनी नंदिता सिन्हा यांचे स्वागत करताना सांगितले की, त्या भारतातील ग्राहक इंटरनेट क्षेत्रातील अत्यंत यशस्वी नेतृत्वकर्त्यांपैकी एक आहेत. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन, दूरदृष्टी आणि प्रभावी अंमलबजावणी या त्यांच्या गुणांमुळे इंस्टामार्टला आणखी बळ मिळेल. त्यांनी कंपनीच्या पुढील विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी श्रीहर्ष मजेटी यांनी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमितेश झा यांच्या योगदानाचाही गौरव केला. त्यांच्या नेतृत्वाखाली इंस्टामार्टने महत्त्वपूर्ण वाढ नोंदवली असून Noice सारख्या उपक्रमांमुळे कंपनीची वेगळी ओळख निर्माण झाली. तसेच योगदान मार्जिनमध्ये सातत्याने सुधारणा, मजबूत कार्यसंस्कृती आणि उच्च कार्यक्षमतेची टीम उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी कंपनीने शुभेच्छाही दिल्या आहेत.

नव्या जबाबदारीबद्दल प्रतिक्रिया देताना नंदिता सिन्हा म्हणाल्या की, इंस्टामार्टने ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवत उभारलेले काम नेहमीच प्रेरणादायी वाटले आहे. भारतातील दैनंदिन खरेदीची पद्धत बदलण्यात इंस्टामार्टची महत्त्वाची भूमिका असून सहकारी, भागीदार आणि ग्राहकांसोबत मिळून कंपनीच्या पुढील विकासाच्या पर्वाला आकार देण्यास त्या उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

नंदिता सिन्हा यापूर्वी मिन्त्राच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने भारतातील सर्वात मोठा फॅशन ई-कॉमर्स व्यवसाय म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले. २०२४ मध्ये EBITDA नफाक्षमता साध्य केल्यानंतरही स्पर्धात्मक बाजारात कंपनीचा बाजारहिस्सा वाढवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय फ्लिपकार्ट, ब्रिटानिया आणि हिंदुस्थान युनिलिव्हरसारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्येही त्यांनी विविध नेतृत्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत.

Paytm Payments Bank: Paytm ला हायकोर्टाचा सर्वात मोठा दणका! पेटीएम पेमेंट्स बँक बंद करण्याचे आदेश; युजर्सचे काय होणार?

इंस्टामार्टच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नंदिता सिन्हा कंपनीच्या उत्पादन धोरणाला अधिक बळ देणे, व्यवसायाचा विस्तार, सुधारित नफाक्षमता, ग्राहक-केंद्रित सेवा आणि कार्यात्मक उत्कृष्टता यांवर भर देणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे इंस्टामार्टच्या वाढीला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून भारतीय क्विक कॉमर्स क्षेत्रातील स्पर्धेत कंपनीचे स्थान आणखी मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Nandita sinha appointed as ceo of instamart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • instagram

संबंधित बातम्या

Instagram Update: Facebook, Youtubeला टक्कर, आता Instagram वर करता येणार 90 मिनिटांचे व्हिडिओ अपलोड, क्रिएटर्सना होणारा मोठा फायदा
1

Instagram Update: Facebook, Youtubeला टक्कर, आता Instagram वर करता येणार 90 मिनिटांचे व्हिडिओ अपलोड, क्रिएटर्सना होणारा मोठा फायदा

मोबाईलची छोटी स्क्रीन विसरा! आता थेट Apple TV वर पाहता येणार Instagram रिल्स; मेटाने केली घोषणा
2

मोबाईलची छोटी स्क्रीन विसरा! आता थेट Apple TV वर पाहता येणार Instagram रिल्स; मेटाने केली घोषणा

Vijay Deverakonda Unfollows Rashmika: लग्नाच्या अवघ्या 8 महिन्यांतच रश्मिका-विजयमध्ये दुरावा? नात्याबद्दल चाहत्यांमध्ये कुजबुज
3

Vijay Deverakonda Unfollows Rashmika: लग्नाच्या अवघ्या 8 महिन्यांतच रश्मिका-विजयमध्ये दुरावा? नात्याबद्दल चाहत्यांमध्ये कुजबुज

Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!
4

Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.