Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीएसटीच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींचे अर्थमंत्र्यांना पत्र; …म्हणाले ‘हे’ करावेच लागेल!

केंद्रीय परिवहन आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी सर्वसामान्यांच्या मागणीला हात घालत, जीवन विमा आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुद्दयाबाबत काय निर्णय घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 31, 2024 | 03:30 PM
जीएसटीच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींचे अर्थमंत्र्यांना पत्र; ...म्हणाले 'हे' करावेच लागेल!

जीएसटीच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींचे अर्थमंत्र्यांना पत्र; ...म्हणाले 'हे' करावेच लागेल!

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात जीवन विमा आणि आरोग्य विमा यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. याशिवाय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) देखील वेळोवेळी आपल्या नियमात अनुकूल बदल करत असते. याशिवाय आतापर्यंत अनेकांनी जीवन विमा आणि आरोग्य विमा यांच्यावरील जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे जीवन विमा आणि आरोग्य विमा यावरील जीएसटी हटवण्याची मागणी केली आहे.

आकारला जातो 18 टक्के जीएसटी

सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडून जीवन विमा आणि आरोग्य विमा यावर तब्बल 18 टक्के जीएसटी लागू केला जातो. मात्र, आता वेळोवेळी होणाऱ्या जीवन विमा आणि आरोग्य विम्यावरील जीएसटीत कपात करण्याच्या मागणीत नितीन गडकरी यांनी देखील उडी घेतली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एक पत्र लिहिले असून, त्यात त्यांनी जीवन विमा आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : उधारीच्या 500 रुपयातून उभारला व्यवसाय; आज महिला करतीये वार्षिक 5 कोटींचा टर्नओव्हर!

सामान्यांचे जीवन, वैद्यकीय विमा महत्वाचा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, अर्थमंत्र्यांनी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील विमा कंपन्यांना बळकट करण्यासाठी पावले उचलण्याचे गरजेचे आहे. याशिवाय विमा घेतल्यानंतर सामान्यांना कर कपातीबाबत देखील दिलासा मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रीमियमवरील आयकर कपात पुन्हा सुरू करावी. संपूर्ण समाजाचे जीवन आणि वैद्यकीय विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : LIC ची भन्नाट योजना..! एकदाच गुंतवा पैसे, मिळेल आयुष्यभर 1 लाख रुपये पेन्शन!

…तर लोकांचा कल आणखी वाढेल!

दरम्यान, जीवन विमा किंवा आरोग्य विमा यावर जीएसटी लागू करणे म्हणजे जीवनाच्या अनिश्चिततेवर कर आकारण्यासारखे आहे. असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. जर एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचलत असेल तर त्याला कर सवलत दिलीच पाहिजे. त्यांच्यावर जीएसटी लादून आपण त्यांना निराश करू नये. अर्थमंत्र्यांनी जनतेला हा दिलासा दिल्यास जीवन आणि वैद्यकीय विम्याकडे लोकांचा कल आणखी वाढेल, असेही नितीन गडकरी यांनी अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Nitin gadkari urges fm nirmala sitaraman to remove gst on life medical insurance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 03:30 PM

Topics:  

  • GST
  • Nirmala Sitaraman
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

एटीएममधून पैसे काढणे महागले; एसबीआय ग्राहकांकडून वसूल करणार अतिरिक्त शुल्क आणि जीएसटी
1

एटीएममधून पैसे काढणे महागले; एसबीआय ग्राहकांकडून वसूल करणार अतिरिक्त शुल्क आणि जीएसटी

GST Fraud Alert: बनावट GST नोटिसपासून राहा सावध! CBIC ने दिला पडताळणीचा सोपा मार्ग; सविस्तर वाचा एका क्लिकवर 
2

GST Fraud Alert: बनावट GST नोटिसपासून राहा सावध! CBIC ने दिला पडताळणीचा सोपा मार्ग; सविस्तर वाचा एका क्लिकवर 

Indian Economy 2027: भारतीय अर्थव्यवस्थेबाबत क्रिसिलने वर्तविला अंदाज; भारतीय अर्थव्यवस्था ६.७% वेगाने धावणार
3

Indian Economy 2027: भारतीय अर्थव्यवस्थेबाबत क्रिसिलने वर्तविला अंदाज; भारतीय अर्थव्यवस्था ६.७% वेगाने धावणार

नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…
4

नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.