LIC ची भन्नाट योजना..! एकदाच गुंतवा पैसे, मिळेल आयुष्यभर 1 लाख रुपये पेन्शन!
अनेक जण भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) गुंतवणुकीला सर्वात सुरक्षित पर्याय मानतात. त्यामुळे आता तुम्ही देखील एलआयसीच्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. एलआयसीची एक अनोखी योजना आहे, ज्यामध्ये एकदाच गुंतवणूक करून तुम्ही आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात तब्बल १ लाख रुपयेहून अधिक पेन्शन मिळवू शकतात. एलआयसीची ही योजना नेमकी काय आहे? तिचे स्वरूप कसे आहे? याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत…
काय आहे योजनेचे नाव?
भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी गुंतवणूक योजना राबवत असते. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) निवृत्तीच्या नंतरच्या काळातील अशा अनेक योजना आहे. ज्या गुंतवणूकदाराला वर्षाकाठी तब्बल १ लाख रुपये इतकी पेन्शन मिळवू देऊ शकतात. “न्यू जीवन शांति प्लान” असे या योजनेचे नाव असून, या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वर्षाकाठी १ लाख रुपये पेन्शन मिळते.
हेही वाचा : 1 लाख रुपये गुंतवले, 2 कोटी कमावले; ‘या’ 1 रुपयाच्या शेअरद्वारे गुंतवणूकदार मालामाल!
काय आहे वयोमर्यादा?
एलआयसीच्या या पेन्शन योजनेसाठी कंपनीने वयोमर्यादा गुंतवणूकदारांना ३० ते ७९ वर्षे इतकी वयोमर्यादा निश्चित करून दिली आहे. या योजनेत पेन्शनसोबतच इतर अनेक फायदे मिळतात. हा योजना सुरु करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. यामध्ये तुमची इच्छा असल्यास तुम्ही एकाच योजनेत गुंतवणूक करू शकता किंवा तुम्ही एकत्रित गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकतात.
कशी मिळणार १ लाख रुपये पेन्शन?
समजा, एखाद्या 55 वर्षांच्या व्यक्तीने एलआयसीच्या या न्यू जीवन शांती योजनेमध्ये 11 लाख रुपये गुंतवले. तर ते पाच वर्षांसाठी गुंतवलेले असतील. त्यानंतर वयाच्या साठीनंतर तुम्हाला दरवर्षी 1,02,850 रुपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन गुंतवणूकदार दर सहा महिन्यांनी किंवा दर महिन्याला घेऊ शकतात. अर्थात दर महिन्यांनी तुम्हाला पेन्शन घ्यायची, असल्यास तुम्हाला 50,365 रुपये इतकी रक्कम मिळेल. अर्थात दरमहा तुम्हाला 8,217 रुपये पेन्शन मिळणार आहे.
हेही वाचा : अंबानींच्या अँटिलिया हाऊसचे वीज बिल माहितीये का? आयुष्यभर कमवाल तरी…नाही होणार कमाई!
योजनेद्वारे ‘हे’ फायदेही मिळणार
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) च्या न्यू जीवन शांती योजनेमध्ये पेन्शनसह इतर देखील फायदे दिले जातात. जसे की, एखाद्या गुंतवणूकदाराचा मध्येच मृत्यू झाल्यास अशा गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा असलेली संपूर्ण रक्कम, त्याने मेन्शन केलेल्या नॉमिनीला दिली जाते. अर्थात एखाद्या गुंतवणूकदाराने एलआयसीच्या या योजनेमध्ये 11 लाख रुपये गुंतवणूक केली असेल तर त्याच्या मृत्युनंतर नॉमिनीला 12,10,000 रुपये इतकी रक्कम मिळते.