Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका! 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक; नेमका काय आहे मेगाप्लॅन?

Novitas Solar Investment Maharashtra : भारतातील आघाडीची सोलर मॉड्यूल उत्पादक कंपनी Novitas Solar पुढील ५ वर्षांत १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या भव्य गुंतवणुकीअंतर्गत महाराष्ट्रात २०० मेगावॅट आणि २५ मेगावॅट क्षमतेचे दोन मोठे सोलर पार्क, तर गुजरातमध्ये ५ GWh क्षमतेचा बॅटरी एनर्जी प्रकल्प उभारणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 29, 2026 | 06:13 PM
Novitas Solar Investment Maharashtra ( सौजन्य - सोशल मीडिया )

Novitas Solar Investment Maharashtra ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Novitas Solar चा महाराष्ट्रात मोठा धमाका!
  • 5 वर्षांत 10000 कोटींची गुंतवणूक
  • नेमका काय आहे मेगाप्लॅन?
Novitas Solar Investment Maharashtra : नव्हिटास सोलर या भारतातील आघाडीच्या सोलर मॉड्यूल उत्पादक कंपनीने आज पुढील पाच वर्षांत १०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. या गुंतवणूकीअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात येथे एकात्मिक नवीकरणीय ऊर्जा परिसंस्था उभारण्यात येईल. या नियोजित गुंतवणुकीमुळे इनगॉट्स, वेफर्स, उच्च-कार्यक्षम सोलर सेल्स आणि मॉड्यूल्स यांसह बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम्स (बीईएसएस) आणि नवीकरणीय ऊर्जा निर्मितीपर्यंत कंपनीच्या संपूर्ण सोलर मूल्य साखळीतील विस्ताराला गती मिळेल. ( Novitas Solar Investment Maharashtra ) 

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?

ही गुंतवणूक नव्हिटास सोलरच्या साध्या सोलर मॉड्यूल उत्पादकाकडून एकात्मिक स्वच्छ ऊर्जा कंपनी बनण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. कंपनीचा नवीकरणीय ऊर्जा मूल्य साखळीच्या अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम क्षेत्रांमध्ये उपस्थिती अधिक दृढ करण्याचा मनसुबा आहे, ज्यासाठी कंपनीने देशांतर्गत उत्पादन क्षमतांची निर्मिती, पुरवठा साखळीचे सक्षमीकरण आणि मोठ्या प्रमाणावरील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या विकासात सहभाग यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

नवीकरणीय ऊर्जा निर्मिती, ऊर्जा साठवणूक क्षेत्रातही विस्तार

कंपनी केवळ उत्पादनापुरते मर्यादित न राहता आता नवीकरणीय ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा साठवणूक क्षेत्रातही विस्तार करत आहे. महाराष्ट्रात, नव्हिटास सोलर ईपीसी आणि इंडीपेन्डंट पॉवर प्रॉड्युसर (आयपीपी) मॉडेल्स अंतर्गत अनुक्रमे २०० मेगावॅट आणि २५ मेगावॅट क्षमतेचे दोन सोलर पार्क्स विकसित करत आहे. तसेच, गुजरातमध्ये कंपनी वडोदरा येथे ५ जीडब्ल्यूएच बॅटरी एनर्जी स्टोरेज प्रकल्पासह ऊर्जा साठवणूक क्षेत्रात पदार्पण करत आहे, ज्यामुळे स्वच्छ ऊर्जा परिसंस्थेतील कंपनीची क्षमता अधिक दृढ होईल.

स्वच्छ ऊर्जा परिवर्तनामध्ये मोलाचे योगदान

नव्हिटास सोलरचे डायरेक्टर अंकित सिंघानिया म्हणाले, “भारताचा नवीकरणीय ऊर्जेचा प्रवास अद्वितीय टप्प्‍यावर पोहोचत आहे, जिथे कामाचा आवाका, तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी या क्षेत्राची स्पर्धात्मकता ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावतील. नव्हिटास सोलरमध्ये, आम्हाला संपूर्ण मूल्य साखळीत सक्रिय सहभाग घ्यायचा आहे आणि क्षमतांची निर्मिती करायची आहे, ज्यामुळे आम्ही भारताच्या स्वच्छ ऊर्जा परिवर्तनामध्ये मोलाचे योगदान देण्यास सक्षम होऊ. पुढील पाच वर्षांतील आमच्या १०,००० कोटी रुपयांच्या नियोजित गुंतवणूकीमधून ही महत्त्वाकांक्षा दिसून येते. आम्ही उत्पादन क्षमतेसह भारतातील नवीकरणीय ऊर्जा परिसंस्थेच्या पुढील टप्प्याला आकार देणाऱ्या तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमध्येही गुंतवणूक करत आहोत.”

नवीकरणीय ऊर्जा पोर्टफोलिओचा विस्तार

ही नियोजित गुंतवणूक नव्हिटास सोलरच्या सध्याच्या उत्पादन पायावर उभारली जात आहे. कंपनीची वार्षिक ३ गिगावॅट सोलर मॉड्यूल निर्मिती क्षमता आहे. तसेच कंपनी टॉपकॉन आणि बायफेशिअल मोनो पीईआरसी तंत्रज्ञानासह उच्च-कार्यक्षम सोलर मॉड्यूल्सची निर्मिती करते. कंपनीने आपला सोलर एनकॅप्सुलंट व्यवसाय नव्हिटास अल्फाच्या माध्यमातून बॅकवर्ड इंटिग्रेशन साधले आहे, तर नव्हिटास प्लॅनेट सारख्या उपकंपन्यांच्या माध्यमातून नवीकरणीय ऊर्जा पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.

भारतातील युटिलिटी-स्केल नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसोबत कंपनीचा ईपीसी व्यवसाय युटिलिटी/आयपीपी स्तरावरील प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी दक्षिण आफ्रिका प्रदेशात देखील उपस्थिती विस्तारत आहे.

करदात्यांना मोठा दिलासा! Income Tax Audit ची मुदत वाढवली; पाहा ITR भरण्याची नवीन तारीख

Web Title: Novitas solar announces 10000 crore investment in maharashtra and gujarat marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • maharashtra
  • Solar Panel

संबंधित बातम्या

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
1

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांची मोठी घोषणा
2

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीबाहेरील रस्त्यांसाठी २ कोटींचा निधी; आमदार सुनील शेळके यांची मोठी घोषणा

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…
3

केवळ ७० रुपयांत मिळेल मुंबईच्या स्ट्रीट फूडचा स्वाद; मदर्स रेसिपीची बॉम्बे सँडविच चटणी…

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण
4

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.