Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NSE IPO Big Update : NSE IPO ची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! एसबीआय विकणार आपली हिस्सेदारी; शेअर बाजारात मोठी हालचाल

NSE IPO Big Update : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या NSE बहुप्रतिक्षित आयपीओबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिची उपकंपनी NSE मधील आपली हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 30, 2026 | 05:24 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • NSE IPO ची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी!
  • देशातील सर्वात मोठी बँक विकणार आपली हिस्सेदारी
  • शेअर बाजारात मोठी हालचाल
NSE IPO Big Update : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या म्हणजेच NSE च्या बहुप्रतिक्षित IPO बाबत मोठी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिची उपकंपनी NSE मधील आपली हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावित ३०,००० कोटी रुपयांच्या आयपीओद्वारे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील आपला एक टक्का हिस्सा विकू शकतात. एसबीआयचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी सांगितले की, बँक एनएसई आयपीओमध्ये सहभागी होईल आणि आपला ०.६५ टक्के हिस्सा विकणार आहे. त्यामुळे जर तुम्ही NSE च्या IPO ची वाट पाहत असाल तर बातमी सविस्तर वाचा. ( NSE IPO Big Update )

Corporate Loan : वाह रे सरकार… उद्योजकांवर कोट्यवधीची उधळपट्टी, अनेक उद्योजकांच्या कर्जमाफीत भरडला सामान्य माणूस

सध्या किती हिस्सा ?

एसबीआयचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी याबाबत सांगताना स्पष्ट केलं की, बँक एनएसई आयपीओमध्ये सहभागी होईल आणि आपला ०.६५ टक्के हिस्सा विकणार आहे. शेट्टी म्हणाले, “आम्ही या निर्गुंतवणुकीत सहभागी होत आहोत. एसबीआय ०.६५ टक्के आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स ०.३५ टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव देत आहे. दोघांचाही हिस्सा आहे, त्यामुळे एसबीआय समूहाच्या स्तरावर हा हिस्सा सुमारे १ टक्का असेल. पण इतर भागधारक सामील झाल्यास हा हिस्सा कमी होऊ शकतो.” सध्या, एनएसईमध्ये एसबीआयचा ३.२३ टक्के आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्सचा ४.३३ टक्के इतका हिस्सा आहे.

बँक इतर सब्सिडियरीतील हिस्सा विकणार नाही

शेट्टी यांनी स्पष्ट केले की, भविष्यात इतर उपकंपन्यांमधील आपला हिस्सा विकण्याची कोणतीही योजना नाही. गेल्या महिन्यात, एसबीआयने आपला परदेशी भागीदार अमुंडीसोबत मिळून एसबीआय म्युच्युअल फंडामधील आपला सुमारे १० टक्के हिस्सा विकला होता. देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड कंपनीचा ₹९,८०० कोटींचा पब्लिक इश्यू यशस्वी झाला आहे ज्याला ४२ पट अधिक प्रतिसाद मिळाला. या व्यवहारानंतर, एसबीआय म्युच्युअल फंडामधील एसबीआयचा हिस्सा ६१.७६ टक्क्यांवरून ५५.४६ टक्क्यांवर आला, तर अमुंडीचा हिस्सा ३.७ टक्क्यांनी कमी होऊन ३२.५६ टक्क्यांवर आला आहे.

गृहकर्जाचा आकडा ₹१० लाख कोटींचा टप्पा गाठेल

शेट्टी म्हणाले की, गृहकर्ज क्षेत्रातील मजबूत मागणीमुळे, एसबीआयचा गृहकर्ज पोर्टफोलिओ चालू तिमाहीत ₹१० लाख कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडू शकतो. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “या तिमाहीत १० लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याची आशा आहे.” देशातील सर्वात मोठ्या कर्जदात्या बँकेने गेल्या आर्थिक वर्षातच ९ लाख कोटी रुपयांच्या गृहकर्ज पोर्टफोलिओचा टप्पा ओलांडला होता. शेट्टी यांच्या मते, गृहकर्ज क्षेत्रात एसबीआयचा बाजारहिस्सा सुमारे २८ टक्के आहे. बँकेने देशभरातील ग्राहकांना गृहकर्ज अधिक सरळ सोपे करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती शेअर बाजाराबद्दल आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. नवराष्ट्र गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Home Loan : तुमचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! होम लोन झाले स्वस्त, ‘या’ बँका देताहेत सर्वात स्वस्त दर

Web Title: Nse ipo big update its subsidiary to sell stake check details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • IPO
  • NSE
  • SBI
  • share market

संबंधित बातम्या

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरांचा रॉकेट स्पीड! एकाच दिवसात तब्बल 3000 ची मोठी वाढ; पाहा आजचे ताजे दर
1

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरांचा रॉकेट स्पीड! एकाच दिवसात तब्बल 3000 ची मोठी वाढ; पाहा आजचे ताजे दर

Stock Market Today : गुंतवणूकदारांना मोठा धक्का! शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स २५१ अंकांनी घसरला, निफ्टी २२,७०० च्या खाली
2

Stock Market Today : गुंतवणूकदारांना मोठा धक्का! शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स २५१ अंकांनी घसरला, निफ्टी २२,७०० च्या खाली

Share Market Today: शेअर बाजारात पडझडीचे संकेत! नकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा लक्ष
3

Share Market Today: शेअर बाजारात पडझडीचे संकेत! नकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
4

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.