Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

३,८००+ ई-क्लिनिकद्वारे गावापर्यंत पोहचणार आरोग्यसेवा, करण्यात आली भागीदारी

ग्रामीण आणि अर्ध-शहरी महिला उद्योजिकांमार्फत ३,८००+ ई-क्लिनिकद्वारे देशाच्या शेवटच्या गावापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली जाणार आहे. यासाठी आता मोठ्या प्रमाणात भागीदारी करण्यात आली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 02, 2025 | 02:27 PM
देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचणार आरोग्यसेवा (फोटो सौजन्य - iStock)

देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचणार आरोग्यसेवा (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: भारतातील आघाडीची ब्रँचलेस बँकिंग आणि डिजिटल नेटवर्क कंपनी पेनियरबायने डिजिटल हेल्थकेअर सेवा प्रदाता एम-स्वस्थसोबत भागीदारी केली आहे.  पेनियरबाय आणि एम-स्वस्थ यांनी भारतात आर्थिक व डिजिटल पोहोच तसेच आरोग्यसेवा समावेशन बळकट करण्यासाठी भागीदारी केली आहे. या सहकार्याअंतर्गत देशभरातील ३,८०० पेक्षा अधिक विशेषीकृत ई-क्लिनिकद्वारे वंचित समुदायांना परवडणाऱ्या आणि उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. पेनियरबायच्या ‘डिजिटल नारी’ उपक्रमांतर्गत ही भागीदारी कुटुंबांना २४x७ डिजिटल ओपीडी सल्ला, अमर्यादित व्हिडिओ टेली-चेकअप आणि २२ विशेषज्ञ डॉक्टरांशी थेट सल्ला घेण्याची सुविधा देईल. याचा उद्देश सतत आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सहकार्य सुनिश्चित करणे आहे.

या उपक्रमाअंतर्गत एम-स्वस्थ ई-क्लिनिकमध्ये डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधांची मोफत सुविधा दिली जाईल, तसेच एका कुटुंबातील सहा सदस्यांना एका वर्षासाठी आरोग्य संरक्षण मिळेल. ही भागीदारी आवश्यक आरोग्य सेवा सुलभ व परवडणारी करून देशाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवेल आणि वेळेवर उपचार सुनिश्चित करेल.

कशी असेल सेवा?

या सेवांच्या माध्यमातून पेनियरबायची ‘डिजिटल नारी’ योजना भारतभरातील महिला उद्योजिकांना अधिक सशक्त करेल. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्यांना वंचित समुदायांपर्यंत आवश्यक सेवा पोहोचवण्याची संधी मिळेल. या उपक्रमामुळे आर्थिक व डिजिटल पोहोच यांच्यासोबतच आरोग्य समावेशनालाही चालना मिळेल. सध्या ७५,००० पेक्षा अधिक महिला देशातील १०,००० हून अधिक पिनकोड क्षेत्रांमध्ये सक्रिय आहेत आणि महिलांची डिजिटल तसेच आर्थिक भागीदारी बळकट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

छोट्या अंबांनींवर पैशांचा पाऊस! अनिल अंबानीचा मोठा डाव; आशिया खंडात वाजणार डंका 10000 ची करणार गुंतवणूक

पहिल्यांदाच घेत आहेत अनुभव

यातील ६०% पेक्षा जास्त ‘डिजिटल नारी’ प्रथमच उद्योजकतेचा अनुभव घेत आहेत आणि त्या दरमहा सुमारे ₹३,००० ते ₹५,००० पर्यंत कमावत आहेत. यातील अनेक महिला शेती किंवा लघु उद्योगही सांभाळतात. ‘डिजिटल नारी’ उपक्रमाद्वारे महिलांना बँकिंग, डिजिटल आणि आता आरोग्यसेवा देण्यासाठी आवश्यक साधनांनी सक्षम केले जात आहे, जेणेकरून त्या वंचित समुदायांमध्ये अर्थपूर्ण आर्थिक आणि सामाजिक बदल घडवू शकतील.

काय म्हणाले CEO

या लाँचप्रसंगी पेनियरबायचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आनंद कुमार बजाज म्हणाले, “पेनियरबायचा हेतू नेहमीच हा राहिला आहे की आवश्यक सेवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक ठिकाणी पोहोचाव्यात. ‘डिजिटल नारी’ प्लॅटफॉर्मवर एम-स्वस्थला जोडून आता आपण दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सेवा भारताच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवत आहोत. या भागीदारीअंतर्गत ३,८०० हून अधिक ई-क्लिनिकद्वारे वेळेवर वैद्यकीय सेवा मिळू शकेल. हे महिला उद्योजिकांमार्फत समाजाला आरोग्यदायी व सक्षम बनवण्याकडे एक ठोस पाऊल आहे.”

ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का, जागतिक बाजारावर होईल परिणाम

डायरेक्टरने मांडले विचार

पेनियरबायच्या सीएमओ आणि ‘डिजिटल नारी’ प्रोग्राम डायरेक्टर जयत्री दासगुप्ता म्हणाल्या, “‘डिजिटल नारी’मध्ये आमचा विश्वास आहे की जेव्हा महिलांना योग्य साधने दिली जातात, तेव्हा त्या केवळ स्वतःचे घरच नव्हे तर संपूर्ण समुदाय पुढे नेतात. एम-स्वस्थसोबतचे हे सहकार्य भारतातील कुटुंबांपर्यंत परवडणाऱ्या व दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवेल आणि डिजिटल नार्यांना समुदायात विश्वास व प्रभावाचे केंद्र बनवेल. हे एकत्रीकरण त्यांना सेवा क्षेत्र विस्तारण्यास, स्थानिक पातळीवर आरोग्य व सक्षमता वाढविण्यास आणि उत्पन्नाचे नवे स्रोत मिळविण्यास समर्थ करेल. प्रत्येक घर आणि व्यक्तीपर्यंत पोहोचून त्या एक सक्षम व आरोग्यदायी भारताची पायाभरणी करत आहेत. या उपक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही प्रशिक्षण, भागीदारी आणि नेतृत्वाच्या संधींद्वारे त्यांना मार्गदर्शन करत राहू.”

भागीदारीबाबत मत

एम-स्वस्थचे सीईओ आणि सह-संस्थापक नीरज महेश्वरी म्हणाले, “पेनियरबायसोबतची ही भागीदारी करून आम्हाला खूप आनंद होत आहे. हे सहकार्य आम्हाला भारतातील अधिकाधिक भागांमध्ये दर्जेदार आरोग्यसेवा वेळेवर व विश्वासासह पोहोचवण्यास सक्षम करेल. आमच्या टेलिमेडिसिन आणि ई-क्लिनिक सेवा ‘डिजिटल नारी’च्या विश्वासार्ह नेटवर्कशी जोडून आम्ही विशेषतः अशा भागांमध्ये आरोग्यसेवा सुलभ करत आहोत जिथे आजवर त्याची पोहोच मर्यादित होती. 

Web Title: Paynearby and m swasth partner to strengthen financial and digital reach and healthcare inclusion in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • Business News
  • health care news
  • Small Business

संबंधित बातम्या

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
1

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद
2

सलग पाचव्या दिवशी बाजार तेजीत, IT शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला; निफ्टी २५०५० वर झाला बंद

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी
3

भारतीय ग्राहकांसाठी ट्रॅव्हल-रिटेल लॉयल्टी प्रोग्रामसाठी मॅरियट बोनव्हॉय आणि फ्लिपकार्टची भागीदारी

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा
4

Paytm च्या शेअर्सनी गाठला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक, एका वर्षात पैसे झाले दुप्पट, मोतीलाल ओसवाल यांनी वाढवला हिस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.