Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paytm New Features: पेटीएमचा नवा धमाका! चहाच्या बिलावरही मिळणार ‘खरं सोनं’; युजर्ससाठी आणली भन्नाट फीचर्स

पेटीएमने (Paytm) युजर्ससाठी धमाकेदार फीचर्स लाँच केले आहेत. आता रोजच्या UPI व्यवहारांवर फ्री डिजिटल गोल्ड (Digital Gold) कमावता येणार असून, खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी AI आधारित स्पेंड समरी टूल देण्यात आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 29, 2026 | 05:34 PM
पेटीएमचा नवा धमाका! (Photo Credit- X)

पेटीएमचा नवा धमाका! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • पेटीएमचा नवा धमाका!
  • चहाच्या बिलावरही मिळणार ‘खरं सोनं’
  • युजर्ससाठी आणली भन्नाट फीचर्स
मुंबई दि. 29 (प्रतिनिधी ): मुंबईकरांचा सकाळचा कटिंग चहा असो, पुण्यातलं पेट्रोल असो की नाशिकमधील किराणा सामान, महाराष्ट्रात सध्या रोख पैशांऐवजी युपीआयचा बोलबाला आहे. पण, तुम्ही रोज करत असलेल्या याच पेमेंटमधून आता थेट सोन्याची कमाई करता येणार आहे, असं म्हटलं तर? होय, डिजिटल पेमेंट क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पेटीएम ने आपल्या युजर्ससाठी अशाच काही खास आणि भन्नाट सुविधा आणल्या आहेत. आता पेटीएम केवळ पैसे पाठवण्याचे साधन राहिले नसून, ते तुमच्या पैशांचे योग्य नियोजन आणि बचतही करणार आहे.

प्रत्येक पेमेंटवर मिळणार ‘डिजिटल गोल्ड’

पेटीएमने ‘गोल्ड कॉइन्स’ ही अनोखी सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत, युजर्सनी केलेल्या पात्र व्यवहारांवर त्यांना गोल्ड कॉइन्स मिळतील, ज्यांचे रूपांतर नंतर ‘डिजिटल सोन्यात‘ होईल. विशेष म्हणजे, हे डिजिटल सोनं तुम्ही खऱ्या सोन्यातही बदलून घेऊ शकता. म्हणजेच, एरवी होणाऱ्या रोजच्या खर्चातूनच आता नकळत तुमची सोन्यात गुंतवणूक होणार आहे .

एआय आधारित ‘स्पेंड समरी’मुळे खर्चावर वॉच

महिनाअखेरीस आपले पैसे नेमके कुठे खर्च झाले, असा प्रश्न अनेकांना पडतो. यावर पेटीएमने ‘स्पेंड समरी’ हा एआय आधारित तोडगा आणला आहे. यामध्ये तुमचे खाणे-पिणे, प्रवास, शॉपिंग आणि बिल पेमेंट अशा वेगवेगळ्या गटांत खर्चाचे वर्गीकरण केले जाते. यामुळे प्रत्येक व्यवहार मोजत बसण्याची गरज पडत नाही आणि संपूर्ण महिन्याचा हिशोब एका क्लिकवर समोर येतो.

Jan Vishwas Act : ‘चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा’; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा

सर्व बँकांचा ‘टोटल बॅलन्स’ एकाच ठिकाणी

पगार, बचत आणि रोजचा खर्च यासाठी अनेकजण एकापेक्षा जास्त बँक खाती वापरतात. अशा वेळी प्रत्येक बँकेचा बॅलन्स तपासण्यासाठी वेगवेगळ्या बँक अॅप्समध्ये जावे लागते. मात्र, पेटीएमच्या ‘टोटल बॅलन्स’ या फीचरमुळे युजर्सना त्यांचे सर्व लिंक केलेले बँक अकाउंट्स आणि त्यातील शिल्लक रक्कम एकाच स्क्रीनवर पाहता येणार आहे.

युपीआय स्टेटमेंट एका क्लिकवर डाउनलोड

खर्चाचा पुरावा किंवा ऑफिस रिइम्बर्समेंटसाठी महिनाभराचा तपशील हवा असल्यास, आता ‘डाउनलोड युपीआय स्टेटमेंट’ या सुविधेद्वारे संपूर्ण व्यवहार इतिहास एक्सल किंवा पीडीएफ स्वरूपात सहज मिळवता येईल. याशिवाय पेमेंट रिमाइंडर, निवडक पेमेंट लपवण्याचा पर्याय आणि होम स्क्रीन विजेट अशा छोट्या पण उपयुक्त सोयीही अॅपमध्ये देण्यात आल्या आहेत.

“आता पेमेंट अॅपकडून फक्त पैसे पाठवणे नव्हे, तर पैशांचे व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. ही नवी फीचर्स लोकांना अधिक चांगल्या आर्थिक नियोजनासाठी आणि रोजच्या पेमेंटमधून अधिक फायदा मिळवण्यासाठी मदत करतील.” प्रवक्ता, पेटीएम

या सर्व भन्नाट सुविधा पेटीएम अॅपवर सध्या सर्व युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

LPG Rules: 3-4 किलोमीटर लांब जाऊन भरताय एलपीजी सिलेंडर? गॅस एजन्सी देतेय धोका, काय आहे नक्की नियम

Web Title: Paytms big new move get real gold even on tea bills exciting new features launched for users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • Business News
  • Digital Gold
  • Paytm

संबंधित बातम्या

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा
1

DHL Express ग्राहकांना मोठा झटका! १ जानेवारी २०२७ पासून भारतात शिपिंग शुल्क ८.९% वाढणार, कंपनीने केली घोषणा

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा
2

व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन होणार स्वस्त? MDR नंतर आता TMR! वैद्यकीय उपकरणांवरील अवाजवी नफ्याला बसणार आळा

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई
3

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
4

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.