Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाचे भाव घसरले; भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?

Petrol Diesel Price: जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण सुरू झाली आहे. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, चीन, अमेरिका आणि नेपाळमध्ये इंधनाचे भाव कमी झाले आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 20, 2026 | 11:08 AM
Petrol Diesel Price: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Petrol Diesel Price: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानसह अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर घसरले.
  • भारतात तेल कंपन्यांना 42 हजार कोटींचा फटका.
  • निवडणुकांपूर्वी भारतात इंधन स्वस्त होण्याची शक्यता?

शेजारच्या पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेल काहीप्रमाणात स्वस्त झाले आहे. तसेच श्रीलंका, बांगलादेश, चीन, अमेरिका, नेपाळ या देशांमध्ये सुद्धा भाव घसरले. आता मात्र भारतात कधी स्वस्त होणार? असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. Petrol Diesel Price:

सरकार भाव कमी करणार की तसेच ठेवणार? सध्या यावरच सगळीकडे चर्चा चालू आहे. मे 2026 मध्ये सरकारी तेल कंपन्यांनी 4 वेळा भाव वाढवले होते. पेट्रोल आणि डिझेल दोन्हीवर लिटरमागे तब्बल 7.50 रुपये वाढ झाली होती. त्याआधी कच्चं तेल महागलं होतं, तरी निवडणुका असल्यामुळे सरकारने भाव वाढवले नव्हते. आता परत उत्तर प्रदेश, उत्तराखंड सारख्या मोठ्या राज्यांमध्ये पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका आहेत. त्यामुळे आता तरी सरकार भाव वाढवणार नाही, असं अनेकांना वाटतंय. उलट भाव कमी करून लोकांना खुश करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

Share Market Today: गुंतवणूकदारांनो, आज ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष; सेन्सेक्स-निफ्टीच्या हालचालींसह जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

बाहेरच्या देशात काय चाललंय?

पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून जगभरात पेट्रोल महाग झालं होतं. आता कुठे कुठे भाव कमी होऊ लागलेत. म्यानमारमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून पेट्रोल 74.8% महाग झालं होतं. एकेकाळी तर दुप्पट झालं होतं. डिझेल पण 77.6% वाढलं होतं.

UAE मध्ये पण पेट्रोल एकावेळी 83.7% वाढलं होतं. आता ते 73.4% वर आलंय. डिझेल 90.50% वरून 88.5% वर आलं. म्हणजे थोडी घट झालीय.पाकिस्तानमध्ये पण लोकांना थोडा दिलासा मिळालाय. तिथे पेट्रोलची वाढ 46.9% वरून 25.9% वर आलीय. डिझेलची वाढ 43.6% वरून 29.9% वर आले.

श्रीलंका, बांगलादेश, चीन, अमेरिका आणि नेपाळमध्ये पण भाव उतरलेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या देशांमध्ये अजूनही पेट्रोल भारतापेक्षा महागच आहे. आपल्याकडे भाव जास्त वाढले नाहीत, त्यामुळे आपण बऱ्यापैकी वाचलोय.

भारतात भाव जास्त का वाढले नाहीत?

जगात सगळीकडे भाव भडकले असताना भारतात मात्र फक्त 8.50% वाढ झालीय, असं सांगितलं जातंय. याचं कारण सरकार आणि तेल कंपन्यांनी नुकसान स्वतःच्या अंगावर घेतलं. कच्चं तेल महाग झालं की त्याचा पूर्ण भार लोकांवर टाकला नाही. बराचसा फटका कंपन्या आणि सरकारने सोसला. काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी पण हेच सांगितलं होतं. पश्चिम आशियातल्या भांडणामुळे आणि तेल पुरवठ्यात अडचण आल्यामुळे कंपन्यांना जवळपास 42 हजार कोटींचं नुकसान झालंय.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठा बदल! 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके रुपये; चांदीचाही भाव जाणून घ्या

त्यामुळे आता भाव कमी करायच्या आधी कंपन्यांचं नुकसान भरून काढणं गरजेचं आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजे लगेच मोठी कपात होईल असं वाटत नाही.पण निवडणुका जवळ आल्या की राजकारण बदलतं. लोकांना दिलासा द्यायला 1-2 रुपये कमी केले तर आश्चर्य वाटायला नको. सध्या तरी वाट बघण्याशिवाय पर्याय नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का?

    Ans: सध्या दरकपातीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र आगामी काळात दर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Que: कोणत्या देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर घसरले आहेत?

    Ans: पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, चीन, अमेरिका आणि नेपाळसह अनेक देशांमध्ये इंधनाचे दर कमी झाले आहेत.

  • Que: तेल कंपन्यांचे किती नुकसान झाले आहे?

    Ans: पश्चिम आशियातील संघर्ष आणि तेलपुरवठ्यातील अडचणींमुळे तेल कंपन्यांना जवळपास 42 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Petrol diesel price cut india global fuel prices rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • Crude Oil Prices
  • diesel
  • Fuel Price Hike
  • Oil Prices
  • petrol
  • petrol diesel
  • Petrol Diesel Price Today

संबंधित बातम्या

LPG Rate Hike: महागाईने त्रस्त जनतेला आणखी झटका? LPG सिलिंडरमागे 150 रुपये कमिशनची मागणी; पेट्रोल-डिझेलबाबतही मोठी मागणी
1

LPG Rate Hike: महागाईने त्रस्त जनतेला आणखी झटका? LPG सिलिंडरमागे 150 रुपये कमिशनची मागणी; पेट्रोल-डिझेलबाबतही मोठी मागणी

Petrol Diesel Price Today: वीकेंडची भटकंती ठरवण्याआधी पाहा, इंधनाचे दर किती?
2

Petrol Diesel Price Today: वीकेंडची भटकंती ठरवण्याआधी पाहा, इंधनाचे दर किती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.