Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol – Diesel वर राज्यांचा चाललाय मनमानी कारभार? अंदमानमध्ये 1 रुपया तर तेलंगणामध्ये तब्बल 35 रुपये Tax

पेट्रोल - डिझेल हे GST च्या कक्षेत येत नाहीत; परिणामी, प्रत्येक राज्य आपला स्वतःचा 'व्हॅट'चा म्हणजेच मूल्यवर्धित कर दर निश्चित करते. नेमक्या याच कारणामुळे, देशभरात इंधनाच्या किमतींमध्ये मोठी तफावत दिसून येते. काही भागांमध्ये करांचे प्रमाण अत्यंत कमी असते, तर कधी अधिक असते आणि या परिस्थितीचा परिणाम किमतीवर होतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 16, 2026 | 03:10 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारतामध्येही महागाईचा भडका उडाला
  • कोणती राज्ये पेट्रोलवर सर्वाधिक कर आकारतात?
  • कोणत्या राज्यांमध्ये कर सर्वात कमी आहेत?
India Petrol Tax Rate: जागतिक परिस्थितीचा फटका इतर देशांना जोरदार बसत आहे. त्यामुळे आपल्या भारतामध्येही महागाईचा भडका उडाला आहे. सगळ्यासोबत भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कडाक्याने वाढत आहे. पेट्रोल – डिझेल हे GST च्या कक्षेत येत नाहीत; परिणामी, प्रत्येक राज्य आपला स्वतःचा ‘व्हॅट’चा म्हणजेच मूल्यवर्धित कर दर निश्चित करते. नेमक्या याच कारणामुळे, देशभरात इंधनाच्या किमतींमध्ये मोठी तफावत दिसून येते. काही भागांमध्ये करांचे प्रमाण अत्यंत कमी असते, तर इतर भागांमध्ये ते लक्षणीयरीत्या अधिक असते आणि या परिस्थितीचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांच्या खिशावर होत आहे. नेमकी का आणि किती फरक पडतोय किंमतींमध्ये जाणून घेऊयात.

US vs China vs India: $100 अब्ज क्लबमध्ये अमेरिकेचीच हवा! महासत्तांना टक्कर देण्यासाठी भारत-चीनचा काय आहे तगडा प्लॅन?

कोणती राज्ये पेट्रोलवर सर्वाधिक कर आकारतात?

भारतात, पेट्रोलवर सर्वाधिक ‘व्हॅट’ तेलंगणामध्ये आकारला जातो, जो ३५.२० टक्के इतका आहे. हा संपूर्ण देशातील सर्वाधिक दर आहे. यानंतर, इतरही अनेक राज्यांमध्ये करांचे दर उच्च असल्याचे दिसून येतात. नेमका कोणत्या राज्यांत किती टॅक्स आकरला जातो. जाणून घेऊयात…

आंध्र प्रदेश: ३१ टक्के + ₹४ प्रति लिटर + रस्ते विकास उपकर (Cess)
केरळ: ३०.०८ टक्के + ₹१ प्रति लिटर + इतर उपकर
कर्नाटक: २९.८४ टक्के
राजस्थान: २९.०४ टक्के + रस्ते विकास उपकर
मध्य प्रदेश: २९ टक्के + ₹२.५० प्रति लिटर + १ टक्के उपकर
ओडिशा: २८ टक्के
महाराष्ट्र: २५ टक्के + ₹५.१२ प्रति लिटर (अतिरिक्त कर)
पश्चिम बंगाल: २५ टक्के + उपकर
मणिपूर: २५ टक्के

कोणत्या राज्यांमध्ये करांचे दर मध्यम स्वरूपाचे आहेत?

आसाम: २४.७७ टक्के किंवा ₹१८.८० प्रति लिटर
छत्तीसगड: २४ टक्के + ₹२ प्रति लिटर
बिहार: २३.५८ टक्के + अधिभार (Surcharge)
नागालँड: २१.७५ टक्के
गोवा: २१.५ टक्के + हरित उपकर (Green Cess)
दिल्ली: १९.४० टक्के
उत्तर प्रदेश: १९.३६ टक्के किंवा ₹१४.८५ प्रति लिटर
हरियाणा: १८.२० टक्के + अतिरिक्त कर

कोणत्या राज्यांमध्ये कर सर्वात कमी आहेत?

तामिळनाडू: १३ टक्के + ₹११.५२ प्रति लिटर
गुजरात: १३.७ टक्के + उपकर (cess)
अरुणाचल प्रदेश: १४.५० टक्के
लक्षद्वीप: १० टक्के
अंदमान आणि निकोबार: १ टक्के (देशातील सर्वात कमी)
राज्या-राज्यांमधील करांमध्ये अशा प्रकारे मोठी तफावत दिसून येते.

पेट्रोल आणि डिझेलवरील करांमध्ये राज्या-राज्यांनुसार लक्षणीय फरक दिसून येतो. ज्या राज्यांमध्ये ‘व्हॅट’ (VAT) सर्वाधिक आहे आणि ज्या राज्यांमध्ये तो सर्वात कमी आहे, त्यांच्यातील फरक ३४ टक्क्यांहून अधिक आहे. याचा अर्थ असा की, जर एखाद्या भागात पेट्रोलचा मूळ दर ₹१०० असेल, तर दुसऱ्या एखाद्या भागात कराची रक्कम ₹३५ पर्यंत पोहोचू शकते; तर अन्य काही भागांमध्ये ही रक्कम केवळ ₹१ च्या आसपास राहते. त्यानुसार आपल्याला मिळणाऱ्या पेट्रोलची किंमत बदलते. परिणामी अशा प्रकारेच लागणाऱ्या टॅक्सवरुन किंमतींमध्येही तफावत जाणवते.

Inflation Bomb : सोनं… दूध, आणि आता पेट्रोल – डिझेल, CNG अवघ्या 48 तासांत महागाईचा अटॅक, सामान्यांनी करायचं काय?

Web Title: Petrol diesel price state wise vat tax difference andaman vs telangana see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Business News
  • Diesel Petrol Price
  • Marathi News
  • petrol rates
  • tax
  • Tax Collection
  • taxes

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.