Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Kisan Yojana: लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा मिळणार नाही पीएम किसान योजनेचा 2000 रूपयांचा19 वा हफ्ता

आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेच्या १८ हप्त्यांद्वारे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत पाठवण्यात आली आहे. १९ वा हप्ता कधी जारी होईल आणि त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 14, 2025 | 05:22 PM
पीएम किसान योजनेचा १९ वा हफ्ता कधी मिळणार (फोटो सौजन्य - Instagram)

पीएम किसान योजनेचा १९ वा हफ्ता कधी मिळणार (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:

केंद्र सरकार लवकरच पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता जारी करणार आहे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. ही आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक हप्त्यात, सरकार प्रत्येकी २००० रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते.

आतापर्यंत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हप्त्यांद्वारे आर्थिक मदत पाठवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता जारी केला होता. पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता कधी जारी होईल आणि त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल याची माहिती आम्ही या लेखातून देत आहोत (फोटो सौजन्य – iStock) 

19 वा हफ्ता कधी?

केंद्र सरकार दर चार महिन्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता देत असते. शेवटचा हप्ता ऑक्टोबर २०२४ मध्ये आला होता. त्यानुसार, योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये जारी केला जाऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. तथापि, सरकारने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही हा केवळ अंदाज लावण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकरी हा हफ्ता नक्की कधी मिळणार याच्या प्रतिक्षेत आहेत. या पीएम किसान योजनेच्या हफ्त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक फायदे होत असल्याचे दिसून येत आहे आणि यासाठी शेतकरी अत्यंत सोप्या पद्धतीने आपले नावही नोंदवू शकतात आणि ही प्रक्रिया ऑनलाईन अथवा ऑफलाईन दोन्ही प्रकाराने शेतकऱ्यांना करता येऊ शकते 

‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये; ‘ही’ प्रक्रिया पुर्ण कराच!

कोणाला लाभ नाही मिळणार?

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी, ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी, म्हणजेच जमिनीच्या मालकीची पडताळणी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी पडताळणी केलेली नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी अधिकारी शेतकऱ्यांना सतत जागरूक करत आहेत की त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणी करून घ्यावी. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे, अन्यथा कोणत्याही शेतकऱ्याला याचा फायदा घेता येणार नाही. यासाठी आधार कार्डाशी लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे

पीएम किसान योजनेचे 2000 रुपये ‘या’ दिवशी मिळणार; 19 व्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे काय फायदे आहेत?

  • पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची मदत मिळते. यामुळे त्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यास मदत होते
  • या योजनेचा मुख्य उद्देश कमी जमीन असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना लाभ देणे आहे
  • पीएम किसान योजनेत कोणताही मध्यस्थ नाही. यामध्ये रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवली जाते. यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते
  • या योजनेत शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया खूप सोपी आहे. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येते

Web Title: Pm kisan yojana 19th installment to avail benefits need to complete steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Business News
  • PM Kisan Yojana

संबंधित बातम्या

High Court on Aashirvaad Atta : तुम्हीही ‘आशीर्वाद’ आटा वापरता? दिल्ली हायकोर्टाकडून मोठी बातमी; दिला मोठा निर्णय?
1

High Court on Aashirvaad Atta : तुम्हीही ‘आशीर्वाद’ आटा वापरता? दिल्ली हायकोर्टाकडून मोठी बातमी; दिला मोठा निर्णय?

PepsiCo Pune Plant : पेप्सिको इंडियाच्या पुणे प्लांटचे रौप्य महोत्सवी वर्ष! 25 वर्षांचा यशस्वी प्रवास, शेकडो शेतकऱ्यांना बळ!
2

PepsiCo Pune Plant : पेप्सिको इंडियाच्या पुणे प्लांटचे रौप्य महोत्सवी वर्ष! 25 वर्षांचा यशस्वी प्रवास, शेकडो शेतकऱ्यांना बळ!

Foreign Direct Investment : सरकारचा मास्टस्ट्रोक! भारतात 4895 कोटींची परदेशी गुंतवणूक;  FDI नियमांमधील बदलामुळे फायदा?
3

Foreign Direct Investment : सरकारचा मास्टस्ट्रोक! भारतात 4895 कोटींची परदेशी गुंतवणूक; FDI नियमांमधील बदलामुळे फायदा?

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?
4

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.