Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरच्या नावाने बाहेरच्या स्ट्रॉबेरीची विक्री; GI टॅगचा गैरवापर करणाऱ्यांना कायदेशीर इशारा

Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वर तालुक्याबाहेर उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीची 'महाबळेश्वर स्ट्रॉबेरी' या नावाने विक्री होत असल्याच्या आरोपावरून श्रीराम फुट प्रोसेसिंग सहकारी संस्थेने कायदेशीर नोटीस बजावली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 22, 2026 | 07:19 PM
Mahabaleshwar Strawberry GI Tag Misuse ( महाबळेश्वर स्ट्रॉबेरी GI टॅगचा गैरवापर )

Mahabaleshwar Strawberry GI Tag Misuse ( महाबळेश्वर स्ट्रॉबेरी GI टॅगचा गैरवापर )

Follow Us
Follow Us:
  • येथे स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते  
  • दिशाभूल करणारी जाहिरात, छपाई अथवा पॅकिंग करून विक्री करू नये  
  • स्ट्रॉबेरीचे उत्पादन करून तिची विक्री करणे हा प्रत्येक शेतकऱ्याचा अधिकार 
Mahabaleshwar Strawberry :   महाबळेश्वर तालुक्याबाहेर उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीची ‘महाबळेश्वर स्ट्रॉबेरी’ या नावाने छपाई, पॅकिंग व जाहिरात करून विक्री होत असल्याच्या गंभीर पार्श्वभूमीवर श्रीराम फुट प्रोसेसिंग सहकारी संस्था मर्या., भिलार (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) यांच्या वतीने कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. संस्थेचे चेअरमन गणपत रामचंद्र पार्टे यांच्या सूचनेनुसार आणि त्यांनी दिलेल्या माहिती व कागदपत्रांच्या आधारे नोटरी अॅड. सचिन शेखर तिरोडकर यांनी ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

येथे स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते

श्रीराम फुट प्रोसेसिंग सहकारी संस्था ही सहकार कायद्यानुसार सहाय्यक निबंधक, महाबळेश्वर यांचेकडे नोंदणीकृत असून गेल्या सुमारे ३५ वर्षांपासून कार्यरत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आणि कृषी उत्पादनाला चांगला दर मिळावा तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे, यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. पर्यटन तालुका असलेल्या महाबळेश्वरमध्ये सातारा जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. येथे स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते; पर्यटकांना आणि असंख्य ग्राहकांना उत्तम दर्जाची स्ट्रॉबेरी मिळावी यासाठी संस्था स्थानिक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, तसेच तांत्रिक व आर्थिक सहाय्य करते.

महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी संस्थेने भारत सरकारच्या भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्रीकडे नोंदणी करून “महाबळेश्वर स्ट्रॉबेरी” या नावाने भौगोलिक उपदर्शन (G.I.-154) प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. मात्र, सध्या महाबळेश्वर तालुक्याबाहेर उत्पादित होणारी स्ट्रॉबेरी ‘महाबळेश्वर स्ट्रॉबेरी’ या नावाने छपाई, पॅकिंग व जाहिरात करून विकली जात असल्याचे संस्थेच्या निदर्शनास आले आहे.

ही बाब अनुचित व्यापार पद्धती असून पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे असंख्य ग्राहकांची फसवणूक होत असून महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे आणि संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे व होत आहे.

दिशाभूल करणारी जाहिरात, छपाई अथवा पॅकिंग करून विक्री करू नये

ही नोटीस प्राप्त झाल्यापासून महाबळेश्वर तालुक्याबाहेर उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीची ‘महाबळेश्वर स्ट्रॉबेरी’ या नावाने वृत्तपत्रे, समाजमाध्यमे किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून दिशाभूल करणारी जाहिरात, छपाई अथवा पॅकिंग करून विक्री करू नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

याचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती किंवा घटकाविरुद्ध दिवाणी व फौजदारी कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस व परिणामास सर्वस्वी संबंधित घटकच जबाबदार राहील, असे नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे. तसेच या नोटीसचा रु. १०,०००/- खर्च संबंधित व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे.

Washim: पेनटाकळीत पाणीसाठा मुबलक, तरी वाशिमच्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम; शिवसेनेचा जलसंपदा विभागाला थेट इशारा

स्ट्रॉबेरीचे उत्पादन करून तिची विक्री करणे हा प्रत्येक शेतकऱ्याचा अधिकार

दरम्यान, या विषयावर स्ट्रॉबेरी ग्रोव्हर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भिलारे यांनी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली स्ट्रॉबेरी कोणत्याही भौगोलिक क्षेत्रातील असली तरी ती विक्री करण्यासंदर्भात आमचे कोणतेही दुमत नाही.

स्ट्रॉबेरीचे उत्पादन करून तिची विक्री करणे हा प्रत्येक शेतकऱ्याचा अधिकार आहे; मात्र ज्या भागात जी स्ट्रॉबेरी पिकवली जाते, त्याच भागातील ती संबंधित स्ट्रॉबेरी आहे, असे सांगूनच तिची विक्री होणे अपेक्षित आहे. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी महाबळेश्वरच्या नावाने विकली जावी आणि ‘महाबळेश्वर’ हा भौगोलिक उपदर्शन (GI) टॅग त्यासाठी वापरण्यात यावा.

वाई, जावळी  किंवा इतर कोणत्याही भागातील स्ट्रॉबेरी विकली जात असेल, तर ती त्या संबंधित भागातील किंवा गावातील आहे, असे स्पष्ट सांगूनच तिची विक्री व्हावी; ‘महाबळेश्वर स्ट्रॉबेरी’ या नावाने नव्हे. कारण प्रत्येक मातीत उगवणाऱ्या स्ट्रॉबेरीचे गुणधर्म आणि तिची चव वेगवेगळी असते.

त्यामुळे स्ट्रॉबेरी ज्या भौगोलिक क्षेत्रात पिकवली जाते, त्याच भौगोलिक क्षेत्राचे किंवा गावाचे नाव देऊन ती विकावी, जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही. याकडे संबंधितांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहनही नितीन भिलारे यांनी केले.

Satara News: सातारा जिल्ह्याची राज्यात शैक्षणिक भरारी! SMC पुनर्गठनात प्रथम, गुणवत्ता निर्देशांकात दुसरा क्रमांक

Web Title: Mahabaleshwar strawberry gi tag misuse legal notice satara sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 07:19 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Government of Maharashtra
  • Mahabaleshwar
  • strawberry

संबंधित बातम्या

Maharashtra Road Safety Charter : महाराष्ट्रात रस्ते अपघातांचा वाढता धोका; २०३० पर्यंत मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट
1

Maharashtra Road Safety Charter : महाराष्ट्रात रस्ते अपघातांचा वाढता धोका; २०३० पर्यंत मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.