'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये; 'ही' प्रक्रिया पुर्ण कराच!
केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे 18 हप्ते जमा झाले आहेत. आता 19 वा हप्ता कधी मिळणार? याकडेच देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
या दिवशी मिळणार 19 वा हप्ता
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 18 हप्ते जमा झाले आहेत. लवकरच 19 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18 व्या हप्ता 5 ऑक्टोबर रोजी राज्यातील सुमारे 91.51 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यानंतर 19 वा हप्ता देखील लवकरच मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. प्रत्येक चार महिन्याला 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो आहे. त्यानुसार डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
कशी कराल ई-केवायसी पूर्ण?
ई-केवायसी करण्यासाठी शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात. त्या ठिकाणी ई-केवायसी टॅबवर क्लिक करुन आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर फोनवर ओटीपी क्रमांक येईल. तो ओटीपी क्रमांक नोंदवल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटसह पीएम किसानचे अॅप आणि नागरी सुविधा केंद्रात ई केवायसी करता येणार आहे.
‘या’ शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही?
खासदार, आमदार, मंत्री किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष असे कोणतेही घटनात्मक पद भूषविणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. जे शेतकरी आयकर भरतात. ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. कोणत्याही संस्थात्मक जमिनीचे धारक शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.