
30 ऑक्टोबरला 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात नाही येणार 2-2 हजार! ( सौजन्य - सोशल मीडिया )
अनेक शेतकऱ्यांच्या पैशांना विलंब होऊ शकतो. आता प्रश्न असा आहे की, कोणत्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात प्रत्येकी २,००० रुपये मिळणार नाहीत? आणि काय आहे या मागचं कारण?
पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या काही शेतकऱ्यांवर याचा परिणाम होऊ शकतो. यासाठी या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पीएम खात्याबाबतची सगळी माहिती अचूक आहे का ? काहीही गहाळ नाही ना? याची खात्री करण्यासाठी वेळोवेळी त्याची तपासणी करणं आवश्यक आहे. बऱ्याचवेळा शेतकरी हे अपडेट करण्यास विसरतात किंवा त्याकडे लक्ष्य दिला जात नाही. ज्यामुळे त्यांच्या खात्यात हफ्ते जमा होत नाहीत. जर तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल तर त्याचाही फटका तुम्हाला बसू शकतो. आता प्रश्न असा आहे की, शेतकऱ्याचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे की नाही, हे ते कसे ठरवतील? चला याबद्दल अधिक जाणून घेऊया.
पीएम किसान योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी, तुम्ही त्यांची सद्यस्थिती तपासणं आवश्यक आहे.
तुम्ही पीएम किसान योजना ॲप डाउनलोड करून स्वतः ई-केवायसी देखील करू शकता. तुम्ही ओटीपी-आधारित ई-केवायसी देखील करू शकता. ओटीपी-आधारित ई-केवायसी थोडे सोपे आहे.
ओटीपी-आधारित ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी, शेतकऱ्याकडे आधारशी जोडलेला एक सक्रिय मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी, खालील पायऱ्यांचे अनुसरण करा:
i. पीएम-किसान पोर्टलला भेट द्या
ii. e-KYC वर क्लिक करा
iii. तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि तुमचे eKYC पूर्ण करण्यासाठी OTP सबमिट करा.
eKYC पूर्ण करण्याचा हा सर्वात नवीन आणि सोपा मार्ग आहे.
i. गुगल प्ले स्टोअरवरून ‘PM-KISAN’ मोबाईल ॲप आणि ‘Aadhaar Face RD’ ॲप डाउनलोड करा.
ii. ॲप उघडा आणि PM-KISAN मध्ये नोंदणी केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा.
iii. लाभार्थी स्थिती या पेजवर जा.
iv. जर e-KYC स्थिती नाही असेल, तर e-KYC वर क्लिक करा, त्यानंतर तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि तुमचा चेहरा स्कॅन करण्यास परवानगी द्या
v. एकदा चेहरा यशस्वीरित्या स्कॅन झाल्यावर, e-KYC पूर्ण होते.
अशा पद्धतीने ई-केवायसीमुळे अडकण्याची शक्यता असलेला पीएम किसान योजनेचा हफ्ता अडकणार नाही. ई-केवायसी देखील सोप्या पद्धतीने पूर्ण झालेली असेल. त्यानंतर पुन्हा एकदा तुमचा स्टेटस चेक करा.
Ans: ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही किंवा ज्यांचे लँड सीडिंग प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
Ans: शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन Know Your Status वर क्लिक करून स्टेटस पाहू शकतात.
Ans: ई-केवायसी बाकी असल्यास ओटीपी किंवा बायोमेट्रिकद्वारे त्वरित पूर्ण करावी, बँक खात्यात जाऊन DBT पर्याय सुरू करावा आणि लँड सीडिंगसाठी स्थानिक कृषी अधिकारी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.