
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Farmer Tour 2026 : महाराष्ट्रात सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाकडुन तसेच कृषीमंत्री दत्तात्रय बरणे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.यामध्ये शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी परदेशात पाठवण्यात येणार आहे.यामध्ये 04 कोटी रुपये खर्च करुन राज्यातील 180 शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असून या दौऱ्यात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शेतमालाची निर्यात, विक्री आणि प्रक्रिया या अभ्यासण्यासाठी दौरा करण्यात येणार आहेत.
आधुनिक तंत्रज्ञान, शेतमालाची निर्यात, विक्री आणि प्रक्रिया अभ्यासण्यासाठी दौरा, 34 जिल्ह्यांतून प्रत्येकी 05 शेतकऱ्यांची निवड करणार.उर्वरित 10 शेतकरी राज्यस्तरीय समितीमार्फत निवडले जातील. या दोऱ्याला कृषी विभागा कडून प्रशासकिय मान्यता मिळाली आहे.महाराष्ट्रात ऐन दुष्काळात 180 शेतकऱ्यांना परदेशी पाठवण्यात येणार असून यासाठी लागणारा खर्च 04 कोटी आहे. हा खर्च अनाथाई आहे; असे विरोधकांचे मत आहे.
या अभ्यास दौऱ्यासाठी राज्य शासनाने 04 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांची निवड राज्यातील 34 जिल्ह्यांमधून प्रत्येकी 5 शेतकरी असे एकूण 170 शेतकरी निवडले जाणार आहेत. उर्वरित 10 शेतकरी राज्यस्तरीय समितीमार्फत निवडले जातील. असे एकूण 180 शेतकऱ्यांची निवड केली जाणार. शेतकऱ्यांना परदेशात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना तांत्रिक बाबी समजून घेता याव्यात यासाठी कृषी विभागाचे 09 अधिकारी या दौऱ्यात सोबत असणार आहेत.
या अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोष्टींचा अभ्यास करण्याची संधी देणे हा आहे. यामध्ये शेतीसाठी लागणारे आधुनिक कृषी तंत्रज्ञान कसे चालते. शेतीत होणारा बदल, तसेच भविष्यात होणाऱ्या तांत्रिक अभ्यासाकडे वाटचाल, शेतीसाठी निर्माण होणारी बाजार पेठ, यात शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा हमी भाव तसेच शेत मालाची निर्यात कशी केली जाते. यासर्व गोष्टींचा अभ्यास या दौऱ्यात शिकवला जाणार आहे. तसेच शेतमाल विक्री आणि साठवणूक व्यवस्थापन आणि अन्न प्रक्रिया उद्योग याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात ऐन दुष्काळात 180 शेतकऱ्यांना परदेशी पाठवण्यात येणार असून यासाठी लागणारा खर्च 04 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून हा खर्च अनाथाई आहे. असे विरोधकांचे मत आहे. ऐन दुष्काळात होत असलेल्या या परदेश दौऱ्याच्या निर्णयावर विरोधकांकडून काही प्रमाणात टीका होत असली तरी, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीचा आधार म्हणून दिवाळीपूर्वी 05 हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ans: आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शेतमालाची निर्यात, विक्री, साठवणूक व्यवस्थापन आणि अन्नप्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करणे होय .
Ans: राज्य सरकारने 04 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी
Ans: एकूण 180 शेतकऱ्यांची निवड केली जाणार