Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Gold Appeal : सोन्यात पैसे गुंतवा, पण दागिने खरेदी करू नका! पीएम मोदी का करताहेत आवाहन? ‘हे’ आहे मोठं गणित

PM Modi Gold Appeal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना भौतिक स्वरूपात दागिने, नाणी किंवा बिस्किटे अशा प्रकारात सोनं न खरेदी करण्याचे आवाहन केलं आहे. त्याऐवजी सुवर्ण योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचे वारंवार आवाहन केले आहे.यामागे नेमकं काय आहे उद्दिष्ट?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 01, 2026 | 12:09 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सोन्यात पैसे गुंतवा, पण दागिने खरेदी करू नका!
  • पीएम मोदी का करताहेत आवाहन?
  • नेमकं काय आहे गणित?
PM Modi Gold Appeal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक ‘रील’ पोस्ट केली आणि पुन्हा एकदा नागरिकांना सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं. त्यांनी भारतीयांना त्यांनी म्हटले की, “जर अत्यंत आवश्यक नसेल, तर तुम्ही सोने खरेदी करू नये.” पण पंतप्रधान पुन्हा पुन्हा अशी अपील का करत आहेत? नेमकी काय परिस्थिती आहे ज्यामुळे हे आवाहन केलं जातं आहे. जागतिक स्तरावर नेमकं काय घडतंय काय आहे यामागचं गणित? ( PM Modi Gold Appeal ) 

Sugar Price Drop : साखरेचे भाव कोसळले! तब्बल 30 टक्क्यांनी झाली स्वस्त, ‘इतक्या’ दिवसांनी ग्राहकांना मिळणार फायदा

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, सोन्याची अतिरिक्त आयात देशाची व्यापार तूट वाढवते. अनावश्यक सोने खरेदीवर नियंत्रण ठेवल्यास डॉलर्सचा देशाबाहेर जाणारा ओघ रोखला जाईल, ज्यामुळे भारतीय रुपया मजबूत होईल आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

मोदी नेमकं काय म्हणाले?

१ सप्टेंबर २०२६ रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या ‘सेल्फी-स्टाईल’ व्हिडिओमध्ये, पंतप्रधान मोदींनी सुरुवातीला भारताच्या पहिल्या तिमाहीत GDP मध्ये वाढ झाली असल्याने सगळ्याचं कौतुक केलं. ७.८% इतका प्रभावी आर्थिक विकास दर (जीडीपी वाढ) साध्य केल्याबद्दल देशाला शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर त्यांनी नागरिकांना स्पष्ट शब्दांत सांगितलं. गरज असल्याशिवाय सोने खरेदी करु नकात. त्यांनी या आवाहनाला ‘विकसित भारत @२०४७’ चे स्वप्न आणि ‘आत्मनिर्भर भारत’चा संकल्प यांच्याशी जोडलं आहे. या वर्षी पंतप्रधान मोदींनी अशा प्रकारचे आवाहन करण्याची ही दुसरी वेळ आहे; यापूर्वी त्यांनी मे २०२६ मध्ये पश्चिम आशियातील संकटकाळात त्यांनी लोकांना एक वर्ष सोने खरेदीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

मोदी हे आवाहन वारंवार का करताहेत?

सोने खरेदीपासून लांब राहण्याच्या आवाहनामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. पहिले म्हणजे, आधी नमूद केल्याप्रमाणे भारतात इतके सोन्याचे साठे नाही की भारत स्वतःची गरज भागवू शकतं. आपली मोठ्या प्रमाणावर असलेली गरज आयातीद्वारे पूर्ण करतो आणि त्यासाठी अमेरिकन डॉलर्समध्ये पैसे मोजावे लागतात. यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे वेगाने घट होते.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, जरी सोने हा सामान्य नागरिकांसाठी गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय असला. तरी सध्याच्या परिस्थितीच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम करतो आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या आर्थिक वर्षात भारताने सुमारे ७२ अब्ज डॉलर्स किमतीचे सोने खरेदी केले होते.

इतर संभाव्य कारण काय?

पंतप्रधान मोदींचे आवाहन भारतीय रुपया बळकट करण्याच्या दृष्टीकोनातूनही हे कारण असल्याचं पाहिले जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव आधीच चढले आहेत याचा संपूर्ण परिणाम थेट दिसून येऊ शकतो. सध्या ते प्रति बॅरल ९०-९१ डॉलर्सच्या आसपास आहेत. याचा अर्थ असा की, देश आधीच कच्च्या तेलाच्या आयातीवर अधिक डॉलर्स खर्च करत आहे.
शिवाय, जर देशांतर्गत सोने खरेदीत वाढ होऊन सोन्याची मागणी वाढली, तर बाजारात डॉलर्सची मागणीही वाढेल; परिणामी, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होईल. रुपया कमकुवत झाल्यामुळे देशांतर्गत इतर सर्व आयातीत वस्तू जसे की इलेक्ट्रॉनिक्स, औषधे इत्यादी महाग होतील.

व्यापार तूट कमी करणं हा उद्देश

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा उद्देश व्यापार तूट कमी करणे आणि भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावणे हा देखील आहे. देशातून बाहेर जाणारे पैसे आणि देशात येणारे पैसे यांच्यातील फरकाला ‘व्यापार तूट’ असे म्हटले जाते. अनावश्यक सोने खरेदीवर नियंत्रण आणून ही तूट कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एकंदरीत, सध्याच्या जागतिक तणावामुळे देशाची अर्थव्यवस्था आधीच दबावाखाली आहे; त्यामुळे, सोन्यासारख्या अनावश्यक आणि चैनीच्या वस्तूंवर डॉलर्स खर्च करणे धोक्याचे ठरू शकते.

GDP Growth : जागतिक मंदीतही भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! पहिल्या तिमाहीत GDP 7.8 % वाढला

Web Title: Pm modi gold appeal on investment and sovereign gold bonds

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Digital Gold
  • GDP
  • Gold Jewellery
  • instagram
  • PM Modi

संबंधित बातम्या

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…
1

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.