स्वामीत्व योजनेद्वारे ग्रामीण कुटुंबांसाठी १०० लाख कोटी रुपये मूल्याची कर्जे उपलब्ध होणार, नरेंद्र मोदी यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
SVAMITVA scheme News Marathi: व्यावसायिक, उद्योजक आणि परदेशी प्रतिनिधींच्या भव्य संमेलनाला संबोधित करण्यासाठी टाइम्स ग्रुप ईटी नाउ ग्लोबल बिझनेस समिट २०२५ या परिषदेच्या ९व्या पर्वाचे प्रमुख आतिथी म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. ही परिषद हॉटेल ताज पॅलेसमध्ये सुरू आहे. टाइम्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
सरकारद्वारे केल्या जात असलेल्या रूपांतरणात्मक सुधारणांमुळे आर्थिक वाढीला गती चालना मिळत आहे आणि व्यवसायाची भावनाही वाढत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. “विकसित भारत होण्याच्या दिशेने चाललेल्या देशाच्या प्रवासात आपले सरकार खासगी क्षेत्राकडे महत्त्वपूर्ण सहयोगी म्हणून बघत आहे, ” असे ते म्हणाले. मागील परिषदेत जी आश्वासने दिली होती, ती सगळी पूर्ण केल्याचे पंतप्रधानांनी श्रोत्यांना सांगितले आणि अशा प्रकारच्या जागतिक परिषदा याचसाठी महत्त्वपूर्ण असतात असेही ते म्हणाले.
“भारताने केलेल्या ठोस आर्थिक सुधारणांची फलिते दिसत आहे. विशेषत: बँकिंग क्षेत्रात ही फलिते दिसून येत आहेत. सार्वजनिक बँकांनी एप्रिल-डिसेंबर २०२४ या काळात १.२५ लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक नफा नोंदवला आहे. व्यवसाय करणे अधिक सोपे व्हावे म्हणून आम्ही एक विनियमन आयोग स्थापन करत आहोत. त्याद्वारे सरकारचा सहभाग कमी केला जाईल आणि व्यवसायांसाठी पूर्तता करणे अधिक सुलभ केले जाईल,” अशी ग्वाही त्यांनी जगभरातून जमलेल्या प्रतिनिधींना दिली.
विकसित भारतासाठी खासगी क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे असेही ते पुढे म्हणाले. “अवकाश क्षेत्र खुले केल्यानंतर मिळालेल्या प्रतिसादामुळे प्रोत्साहित होऊन मी आता अणूऊर्जा क्षेत्र खासगी सहभागासाठी खुले करत असल्याची घोषणा करत आहे. त्यामुळे खासगी क्षेत्राला देशाच्या वाढीच्या प्रवासात अधिक आक्रमकतेने सहभाग घेणे शक्य होईल,” असे ते म्हणाले. तसेच देशातील ठोस बँकिंग प्रणालीबद्दल पंतप्रधान म्हणाले की, दशकभरापूर्वी भारतातील बँकिंग प्रणाली संकटात होती, लक्षावधी लोक औपचारिक बँकिंग जाळ्याबाहेर होते आणि कर्ज उपलब्ध करून घेणे आव्हानात्मक होते. “आज आम्ही हे चित्र पालटून टाकले आहे, सर्वांसाठी आर्थिक समावेशनाची निश्चिती आम्ही केली आहे. एकेकाळी अशक्य समजले जाणारे आता वास्तवात आले आहे, बँकिंग सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत,” असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. “बँकिंग सेवा न मिळणाऱ्यांना बँकिंग सेवा, असुरक्षितांना सुरक्षितता, कर्ज न मिळणाऱ्यांना कर्ज, हेच आमचे धोरण आहे,” असेही ते म्हणाले.
टाइम्स ग्रुप ईटी नाउ ग्लोबल बिझनेस समिट २०२५ प्रभावी उद्घाटन सत्रासह सुरू झाले. जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताची भूमिका या विषयावरील महत्त्वपूर्ण संभाषणाने परिषदेला सुरुवात झाली. नवोन्मेष, उद्योजकता आणि स्वयंपूर्णता यातील भारताच्या बलस्थानांवर मान्यवरांनी भर दिला आणि त्यातून ‘इव्हॉल्व, इमर्ज, एक्स्पाण्ड (उत्क्रांती, उदय, विस्तार)’ हा परिषदेचा विषय अधोरेखित झाला. उद्योग, अर्थव्यवस्था आणि समाज यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या प्रगतीशील विचारांसाठी याद्वारे उत्तम पार्श्वभूमी निर्माण झाली.
टाइम्स ग्रुपकडून सादर टाइम्स ग्रुप ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट एक प्रतिष्ठित व्यासपीठ आहे, जिथे भारत व जगभरातील अनेक व्यक्तिमत्वांनी उपस्थिती लावली होती. या ख्यातनाम उद्योजकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मायक्रोसॉफ्टचे दूरदर्शी बिल गेट्स, एअरबीएनबीचे ब्रायन चेस्की, हफिंग्टन पोस्ट मीडिया ग्रुपच्या अरियाना हफिंग्टन, उबेरचे नेते दारा खोस्रोवशाही, नेटफ्लिक्सचे प्रतिनिधीत्व करणारे रीड हेस्टिंग्स, अॅप्पलकडून संशोधक स्टीव्ह वोझनियाक
ख्यातनाम व्हेंचर कॅपिटलिस्ट गाय कावासाकी, वर्ल्ड बँकेच्या अंशुला कांत, ख्यातनाम अभिनेता शाहरूख खान तसेच प्रसिद्ध अर्थतज्ञ व नोबेल पुरस्कार विजेते पॉल क्रुगमन इत्यादींचा समावेश होता. ही समिट अद्वितीय ज्ञान व जागतिक दृष्टीकोनांचे केंद्र असून ती बिझनेस व नावीन्यपूर्णतेच्या भविष्याला आकार देण्यासाठी बुद्धिमान वक्त्यांना एकत्र आणते.
ईटी एज हा टाइम्स ग्रुपचा उपक्रम असून ती भारतातील सर्वांत मोठी परिषद आणि विचार नेतृत्व कंपनी आहे. २०१५ मध्ये स्थापना झाल्यापासून ईटी एज विविध क्षेत्रे, उद्योग व वर्गांना धोरणात्मकरित्या विकसित स्पेशलाइज्ड परिषदा व समिट्स यांच्या माध्यमातून विविध उपक्रम आयोजित करण्यात आघाडीवर आहे.
टाइम्स ग्रुप ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट ही ईटी एजच्या प्रमुख आयपीपैकी एक आहे. त्यातून आपल्या समृद्ध व्यासपीठाद्वारे जागतिक ख्यातीचे विचारवंत व वक्ते एकत्र आणले जातात आणि समाज व व्यवसायांमधील सहयोगाला चालना दिली जाते. ईटी एजच्या प्रमुख कॉन्फरन्स मालमत्तांमध्ये (एसडीजी) सस्टेनिबिलिटी डेव्हलपमेंट गोल्स समिट, सप्लाय चेन समिट, सीएक्स समिट आणि बेस्ट ब्रँड्स सीरिज यांचा समावेश आहे.