Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; वाचा… नेमका कसा तो?

बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आणि एकूणच भारतीय कापड उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. बांगलादेशी कापड व्यवसायाची ९० टक्के गरज ब्राझील आणि भारतीय कापसाकडून भागवली जाते. त्यामुळे भारतीय कापसासाठी बांगलादेश ही मोठी बाजारपेठ आहे. मात्र, आता भारतीय कापूस निर्यातीवर मोठा परिणाम होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 05, 2024 | 07:44 PM
बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; वाचा... नेमका कसा तो?

बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; वाचा... नेमका कसा तो?

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आणि एकूणच भारतीय कापड उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. ब्राझीलनंतर भारत हा बांगलादेशला कापूस पुरवठा करणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे. दरम्यान, चीन, पाकिस्तान व बांगलादेश हे भारतीय कापसाचे मोठे आयातदार आहेत. मात्र, भारतीय कापूस निर्यात ही सर्वाधिक बांगलादेशला होते. परिणामी, आता भारतीय कापूस निर्यातीवर याचा मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे.

भारतीय कापसाची मोठी बाजारपेठ

बांगलादेशात ८५ पेक्षा जास्त टेक्स्टाइल कारखाने आहेत. मात्र, या कारखान्यांची गरज भागवणारे कापूस उत्पादन त्या देशात होत नाही. त्यामुळे बांगलादेशी कापड व्यवसायाची ९० टक्के गरज ब्राझील आणि भारतीय कापसाकडून भागवली जाते. त्यामुळे भारतीय कापसासाठी बांगलादेश ही मोठी बाजारपेठ आहे. इतकेच नाही तर 2006 पासून भारतातील अनेक कापड कंपन्यांनी बांगलादेशकडे मोर्चा वळवला. या कंपन्या भारतातून कापूस निर्यात करून बांग्लादेशात वस्रनिर्मिती करतात. मात्र, आता या कंपन्यांच्या व्यवसायावर देखील आता बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा थेट परिणाम होणार आहे. परिणामी, भारतीय कापूस निर्यातीला मोठा फटका बसणार आहे.

हेही वाचा : ‘या’ भारतीय कंपन्यांची चिंता वाढली; बांग्लादेशातील अस्थिरतेमुळे गुंतवणूक धोक्यात!

कापड निर्यातीत बांगलादेश भारतापेक्षा पुढे

बांगलादेशात कमी वेतनात मिळणारे मजूर आणि हलकी वाहतूक असल्याने भारतातातुन कापूस निर्यात करणे सहजसोपे असल्याने या कंपन्यांनी 2006 पासून बांगलादेशात मोठी गुंतवणूक केली आहे. परिणामी, भारतीय कंपन्यांच्या जोरावर कापड निर्यातीत बांगलादेश भारतापेक्षा खूप पुढे आहे. 2013 ते 2023 दरम्यान, बांगलादेशातील कपड्यांचे उत्पादन 69.6 टक्के, तर व्हिएतनामचे 81.6 टक्के दराने वाढले आहे. तर भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण कापड निर्यातीपैकी, भारताची वस्त्र निर्यात केवळ 4.6 टक्के दराने वाढली आहे. त्यामुळे जागतिक वस्त्र व्यापारातील भारताचा वाटा सातत्याने कमी होत आहे.

हेही वाचा : बांग्लादेशात राजकीय अस्थिरता; संकट मात्र भारतावर, वाचा… नेमका काय परिणाम होणार?

भारतापेक्षा 3 पटीने जास्त कापड निर्यात

2022-23 मध्ये भारतातून तयार कपड्यांची निर्यात 16 अब्ज डॉलर्सची होती, तर याच कालावधीत बांगलादेशने 47 अब्ज डॉलर्सच्या भारताच्या तुलनेत 3 पटीने जास्त कापड निर्यात केली. पण बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणि अशांतता यामुळे आता भारतीय गारमेंट कंपन्यांना आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. एकूणच भारतीय कापूस निर्यात धोक्यात येणार आहे.

Web Title: Political instability in bangladesh will affect indian cotton exports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 07:44 PM

Topics:  

  • sheikh hasina

संबंधित बातम्या

Bangladesh Politics: बांगलादेशने शेख हसीनांचे Voter ID केले ब्लॉक; निवडणूकीपासून माजी पंतप्रधानांना दूर ठेवण्याचा प्रयत्न?
1

Bangladesh Politics: बांगलादेशने शेख हसीनांचे Voter ID केले ब्लॉक; निवडणूकीपासून माजी पंतप्रधानांना दूर ठेवण्याचा प्रयत्न?

भारतात ‘गुपचूप’ कार्यालय उघडत आहे शेख हसीनाचा पक्ष? गुपित उघडं पडलं, युनूसवर भडकले नेता
2

भारतात ‘गुपचूप’ कार्यालय उघडत आहे शेख हसीनाचा पक्ष? गुपित उघडं पडलं, युनूसवर भडकले नेता

Bangladesh General election 2026 : बांगलादेशमध्ये उडणार निवडणुकीचा धुराळा; निवडणूक आयोग करणार मतदानाची तारीख जाहीर
3

Bangladesh General election 2026 : बांगलादेशमध्ये उडणार निवडणुकीचा धुराळा; निवडणूक आयोग करणार मतदानाची तारीख जाहीर

बांगलादेशमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकारणात रंगत! मोहमद युनूस यांच्या जाण्याच्या चर्चांना वेग, ‘या’ पक्षांनी दिले संकेत
4

बांगलादेशमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकारणात रंगत! मोहमद युनूस यांच्या जाण्याच्या चर्चांना वेग, ‘या’ पक्षांनी दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.