
Bangaldesh Khaleda Zia VS Sheikh Hasina
Khaleda Zia Death : खालिदा झिया यांना पतीच्या कबरीजवळ करण्यात येणार दफन; ७ दिवसांचा शोक जाहीर
एकेकाळी दोन्ही महिला नेत्या या लोकशाहीच्या समर्थनार्थ एकत्र लढल्या होत्या. परंतु १९९१ च्या निवडणुकीच्या निकालाने दोन्ही महिला नेत्यांच्या मैत्रीत मोठी दरार पडली आणि त्या एकमेकींच्या कट्टर विरोधक बनल्या. नेमकं काय घडलं हे आपण जाऊन घेऊयात.
१९७५ मध्ये बांगलादेशचे संस्थापक म्हणून ओखळले जाणारे आणि अवामी लीगचे शेख मुजबीर रहमान यांची एका बंडात हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येने त्यांची मुलगी शेख हसीना आमि त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाच डोंगर कोसळला. मुजबीर रहमान यांच्या हत्येनंतर झिया यांचे पती झियाउर रहमान तत्कालीन लष्करप्रमुख यांनी सत्ता ताब्यात घेतली. यानंतर ते १९७७ मध्ये बांगलादेशचे राष्ट्रपती बनले.
दरम्यान १९८१ मध्ये झियाउर रहमान यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर झिया आणि शेख हसीना लष्करीसत्तेविरोधात एकत्र आल्या होत्या. दोन्ही महिला नेत्यांनी लोकशाहीसाठी मोठे जनआंदोलन केले. १९९० चे शासक हुसेन मोहम्मद इरशाद यांना या महिला नेत्यांनी हाकलवून लावले. यानंतर १९९० मध्ये लोकशाही स्थापन झाली. मात्र यानंतर दोन्ही हसीना आणि झिया यांच्या मैत्रीत मोठी राजकीय दरार पडली.
१९९१ मध्ये लोकशाही स्थापन झाल्यावर पहिल्या निवडणुका बांगलादेशात पार पडल्या. या निवडणुकीत खालिदा जिया यांची पंतप्रधान पदी निवड झाली आणि त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. यानंतर हसीना आणि झिया यांच्या मैत्रीत राजकीय फूट पडली. तेव्हापासून दोन्ही महिलांमध्ये सत्तेसाठी तीव्र संघर्ष सुरु झाला. या लढाईला त्या काळी बेगमांची लढाई म्हणून संबोधले जायचे.
शिवाय १९९६च्या निवडणुकीत शेख हसीना यांनी झिया यांचा पराभव केला, पण पाच वर्षानंतर झिया पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सत्तेत परतल्या. २००४ मधील निवडणुकांच्या प्रचारादरम्यान हसीनांच्या रॅलीवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात हसीना थोडक्यात बचावल्या मात्र यासाठी त्यांनी खालिदा झिया यांच्या सरकारला जबाबदार धरण्यात आले होते.