
Bangladesh Political Crisis
खालिदा झिया यांचा पक्ष बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) च्या नेत्याने शेख हसीना यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. बीएनपीने म्हटले आहे की, बेगम खालिदा झिया यांच्या मृत्यूसाठी शेख हसीना जबाबदार आहेत. हे आरोप खालिदा यांच्यावर अंत्यसंस्कारपूर्वी करण्यात आले होते. खालिदा झिया यांचे सहकारी नजरुल यांनी हे आरोप केले. त्यांनी राष्ट्रीय संसद भवनात दक्षिण प्लाझा येथे वाचलेल्या लेखी निवेदनात हा आरोप केला आहे.
नरुल यांनी म्हटले की, ८ फ्रेब्रुवारी २०१८ पासून खालिदा झिया यांना खोट्या आरोपांखाली तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यांना २०१८ ते २०२४ पर्यंत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगवासा सुनावण्यात आला होता. या काळात त्या आजारी पडल्या आणि योग्यवेळेवर उपचार न झाल्यामुळे त्यांची प्रकृती अधिक बिघडली. खालिदा झिया एकांतवासातून आजारी पडल्याचे स्पष्ट दिसून येते असा आरोप नररुल यांनी म्हटले.
यावेळी शेख हसीना यांचे अवामी लीग सरकार सत्तेत होते. नजरुल यांनी डॉक्टरांचा हवाला देत त्यांची प्रकृती तुरुंगात असताना अधिक खराब झाली असून यामुळेच त्यांचा जबाबदार आहे. खालिदा तुरुंगात असल्याने त्यांना परदेशात उपचारसाठी जाम्याची परवानगी नव्हती. याामुळे खालिदा यांच्य मृत्यूसाठी नजरुल यंनी शेख हसीना यांना जबाबदार धरले आहे.
खालिदा झिया यांना गेल्या अनेक वर्षांपासून छातीत संसर्ग होता. तसेच यकृत, मूत्रपिंड, मधूमेह, संधिवात आणि डोळ्यांच्या आजारांनीही त्या ग्रस्त होत्या. खालिदा झिया यांनी १९९१ ते १९९६ आणि २००१ ते २००२६ या काळात दोन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून कार्य केले आहे. त्या माजी राष्ट्रापती झियाउर रहमान यांच्या पत्नी होत्या. त्यांना दोन मुले आहेत. बीएनपीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान हे त्यांचे मोठे पुत्र तर धाकटा अराफत रहमान ज्यांचे याच वर्षी २०२५ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
Ans: खालिदा झिया यांच्या मृत्यूसाठी शेख हसीना यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
Ans: २०१८ मध्ये खालिदा यांना तुरुंगात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ठेवण्यात आले होते. यावेळी अवामी लीग सरकार सत्तेत होते. या तुरुंगवासाच्या काळात खालिदा आजारी पडल्या आणि त्यांन योग्य वेळेवर उपचार मिळाले नाही. हसीना सरकारने खालिदा यांच्यावर खोटे आरोप लावल्याचा दावा बीएनपीने केला आहे.