Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्याचे पहिले एआय धोरण तयार करा, मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले एआय धोरण तयार करा, असे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jan 01, 2025 | 06:14 PM
राज्याचे पहिले एआय धोरण तयार करा, मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

राज्याचे पहिले एआय धोरण तयार करा, मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आता सॉफ्टवेअर आणि एआयचा काळ सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. आयटी क्षेत्र ज्या झपाट्याने वाढले, त्याच झपाट्याने आता या क्षेत्रात क्रांती होताना दिसून येत आहे. त्यामध्ये डिजिटलायजेशन नंतर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले, एआय (एआय) (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करा, असे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत.

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. सह्याद्री अतिथीगृहावर आज माहिती व तंत्रज्ञान विभागाचा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आढावा घेतला. या बैठकीस आयटी विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डिसेंबर महिन्यात जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; वार्षिक संकलनात 7.3 टक्क्यांनी वाढ

एआय तंत्रज्ञानाचे युग सुरू

मंत्री आशिष शेलार यांनी विभागाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन करताना म्हटले की, एआय तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी घेतली पाहिजे. एआयचा प्रभावी उपयोग करून आपण अधिक उद्योग व व्यवसाय आकर्षित करीत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची ही संधी आहे.

मार्च 2024 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय मिशन’ अंतर्गत देशभरात एआय क्षमता वाढवण्यासाठी 10,372 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात इंडिया एआय डेटासेट्स प्लॅटफॉर्म, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रकल्प, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स, इंडिया एआय इनोव्हेशन सेंटर, फ्युचर स्किल्स प्रोग्राम आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा यांचा समावेश आहे.

सेबीने सायबर सुरक्षा सुधारणांच्या अंमलबजावणीची मुदत वाढवली; ही असेल शेवटची मुदत

एआयमध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहावा

दरम्यान, केंद्र सरकार जानेवारी 2025 पासून वैयक्तिक नसलेल्या डेटासेट्सचे संकलन सुरू करणार आहे. त्यामुळे स्टार्टअप्स, कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि संशोधका ॲप्स विकसित करण्यासाठी, विविध भाषांची सेवा देण्यासाठी तसेच आणि विशेष सेवा देण्यासाठी उपयोग होणार आहे. आपला देश तंत्रज्ञानाच्या आघाडीवर प्रगती करत असताना महाराष्ट्र यात अग्रेसर राहिला पाहिजे असेही अ‍ॅड. शेलार यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील बारामतीमध्ये एआयवर विकसित शेतीचा प्रयोग करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, एआय हे तंत्रज्ञान वापरुन विविध क्षेत्रात बदल व क्रांती घडविली जाऊ शकते.

Web Title: Prepare the states first ai policy minister adv ashish shelar directs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Ashish Shelar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
2

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
3

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार; आशिष शेलारांनी केली ११ कोटी निधीची घोषणा
4

Ganesh Festival: यंदाचा गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार; आशिष शेलारांनी केली ११ कोटी निधीची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.