
कर्जत नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा बोजवारा! प्रकल्प बंद पडल्याने परिसरात दुर्गंधी
कर्जत तालुका हा ग्रामीण भाग असल्याने दैनंदिन खरेदी-विक्रीसाठी तालुक्यातील नागरिक मुख्य केंद्रस्थानी असलेल्या कर्जत शहरात मोठ्या संख्येने येतात. परिणामी, कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. मात्र, हा कचरा उचलून त्याचे योग्य वर्गीकरण, प्रक्रिया आणि शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे नगरपालिकेला व संबंधित ठेकेदाराला सध्या शक्य होत नसल्याचे चित्र आहे. गुंडगे प्रकल्पाची अवस्था पाहता या घनकचरा प्रकल्पाचे केवळ ‘कचऱ्याच्या डेपो’त रूपांतर झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रकल्प परिसरात साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या अस्वच्छतेमुळे परिसरात लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, एकीकडे नगरपालिका ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवत असल्याचा दावा करते, तर दुसरीकडे कर्जत शहर आणि गुंडगे परिसर कचऱ्याच्या विळख्यात अडकल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. या प्रकरणाबाबत कर्जत नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना विचारणा केली असता मी रजेवर आहे या संदर्भात मला कोणत्याही प्रकारची माहिती नाही. अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली आहे.
कर्जत नगरपालिका प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी, बंद अवस्थेत असलेला गुंडगे येथील घनकचरा प्रकल्प त्वरित सुरू करावा आणि आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करून कचऱ्याचे योग्य विलगीकरण व प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन दोषी ठेकेदारावर कारवाई करणार का, की घनकचरा प्रकल्पावरील हा बोजवारा असाच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ans: कर्जत नगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद पडल्याने कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Ans: प्रकल्प बंद असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, स्थानिक नागरिकांना अस्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
Ans: ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे प्रकल्पाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी नगरपालिकेच्या प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.