
सावंगी बायपासवरील लुटमारीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
खुशालसिंग नानकसिंग गिल, सागर ऊर्फ मारी इंदलसिंग जारवाल आणि घनश्याम सुपडसिंग घुसिंगे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सावंगी बायपास रोडवरील पुलाजवळ रात्रीच्या वेळी नागरिकांना अडवून चाकूचा धाक दाखवून लुटमारीच्या घटना घडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर फुलंब्री पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयितांचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांचा लुटमारीच्या घटनेशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक स्कुटी, फिर्यादीकडून लुटलेले दोन मोबाईल फोन, एक रिक्षा, लुटमारीसाठी वापरण्यात आलेले धारदार चाकू तसेच रोख रक्कम जप्त कले आहे.
हे सुद्धा वाचा : राहत्या घरातच झाडली स्वतःवर गोळी… निवृत्त सहाय्यक RTO अधिकाऱ्याचा धक्कादायक अंत!
सावंगी बायपास परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांना अडवून लुटण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पोलिसांच्या या कारवाईमुळे लुटमारीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी डॉ. सोनाली पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक दवंगे, पोलिस हवालदार राठोड, पोलिस हवालदार नागलोत आणि अंमलदार गायकवाड यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे.
हे सुद्धा वाचा : गुन्ह्यात सहआरोपी करीन…https://www.navarashtra.com/crime/mira-bhayandar-kashimira-psi-sharad-khade-acb-trap-25000-bribe-arrest-sn-1385006.html भीती दाखवून मागितले २५ हजार; लाच घेतानाच PSI शरद खाडे थेट एसीबीच्या जाळ्यात!
Ans: १८ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सावंगी बायपास रोडवरील पुलाजवळ ही घटना घडली.
Ans: फुलंब्री पोलिसांनी खुशालसिंग नानकसिंग गिल, सागर ऊर्फ मारी इंदलसिंग जारवाल आणि घनश्याम सुपडसिंग घुसिंगे या तिघांना अटक केली.
Ans: आरोपींकडून एक स्कुटी, एक रिक्षा, लुटलेले दोन मोबाईल फोन, धारदार चाकू आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.