UPI Tap & Pay: QR कोड स्कॅनची कटकट संपली! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मुंबईमध्ये चालू असलेल्या Global Fintech Fest 2026 मध्ये हे नवीन फिचर लॉन्च करण्यात आले. RBI चे गव्हर्नर आणि NPCI ने मिळून दोन नवीन गोष्टी आणल्या आहेत, एक म्हणजे UPI Tap & Pay आणि दुसरं MyUPI. या दोन्हीमुळे UPI वापरणं अजूनच सोपं होणार झालं आहे.
आपण जसं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड मशीनवर टॅप करून पेमेंट करतो, अगदी तसंच आता मोबाईलने पण करता येणार आहे. तुम्हाला आता QR कोड शोधायची गरज नाही, कॅमेरा ओपन करायची गरज नाही, आणि सारखं सारखं ॲप ओपन करून पिन टाकायची पण गरज नाही. तुमचा फोन जर NFC सपोर्ट करत असेल तर फक्त फोन अनलॉक करायचा आणि दुकानदाराच्या मशीनवर म्हणजे PoS मशीनवर टॅप करायचा, पेमेंट होईल.
Trade Plan: BRICS मध्ये भारताचा तगडा ट्रेड प्लॅन, Trump च्या धमक्यांना घातली नाही भीक!
दुकानदाराच्या मशीनच्या इंटरनेटने तुमचा व्यवहार पूर्ण होईल. म्हणजे तुमचं नेट स्लो असलं तरी पेमेंट अडकणार नाही. जिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, अशा गावात, खेड्यात राहणाऱ्या लोकांसाठी तर हे फिचर एकदम वरदानच आहे. नेटसाठी आता तात्काळत राहण्याची गरज नाही. फक्त एक टॅप आणि काम झालं.
NPCI ने एक अजून चांगली गोष्ट केली ती म्हणजे 5000 रुपयांपर्यंतच्या छोट्या पेमेंटसाठी आता UPI पिन टाकायची गरज नाही. टॅप केलं की थेट पेमेंट होईल. 5000 पेक्षा जास्त रक्कम असेल तर मात्र पिन टाकावा लागेल. त्यामुळे भाजी घेणं, चहा पिणं, ऑटोचं भाडं देणं अशा छोट्या कामांसाठी तर एकदम फास्ट होणार आहे.
Tap & Pay सोबतच MyUPI नावाचं एक नवीन प्लॅटफॉर्म पण लॉन्च झालं. हे एक AI बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. बऱ्याच लोकांची 2-3 बँक अकाउंट असतात, 2-3 UPI आयडी असतात. सगळ्याचा हिशोब ठेवणं अवघड होतं. MyUPI मध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या UPI व्यवहारांची माहिती एकाच जागी दिसेल. किती पैसे आले, कुठे खर्च झाले, कोणत्या बँकेतून झाले, सगळं एका क्लिकवर समजू शकेल.
काही प्रॉब्लेम आला तर AI सपोर्ट पण लगेच मदत करेल. म्हणजे वेगवेगळ्या ॲपमध्ये जाऊन हिस्ट्री बघायची गरज नाही.एकंदरीत सांगायचं झालं तर UPI वापरणं आता कार्ड पेमेंट इतकंच सोपं झालंय. नेटचा इश्यू, QR स्कॅनचा वेळ, ॲप हँग होणं – या सगळ्यातून सुटका मिळणार आहे. Google Pay आणि PhonePe सारख्या ॲप्सना पण आता हे फिचर त्यांच्या ॲपमध्ये आणावं लागेल. लवकरच सगळ्यांच्या फोनमध्ये हा ऑप्शन दिसायला लागेल.






