सांगलीत 5 ते 29 ऑक्टोबरदरम्यान 52 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहा पोलीस दलांतील पुरुष आणि महिला खेळाडू मिळून 1200 खेळाडू सहभागी होणार आहेत.
ॲथलेटिक्स, फुटबॉल, कबड्डी, कुस्ती, जलतरण यांसह 19 क्रीडा प्रकारांतील सामने विविध मैदानांवर होणार आहेत. स्पर्धेच्या क्रीडानगरीला ‘शहीद अशोक कामटे क्रीडा नगरी’ असे नाव देण्यात आले असून, ‘सेनापती’ हा वाघ शुभंकर आहे.
ॲथलेटिक्समधील सर्वोत्तम पुरुष खेळाडूला होंडा पॅशन मोटरसायकल, तर महिला खेळाडूला एथर इलेक्ट्रिक बाईक बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. 29 ऑक्टोबरला सांगता समारंभाला आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत उपस्थित राहणार आहेत.