लग्नसराईचा हंगाम लवकरच सुरु होणार आहे. याशिवाय घरातील इतर कार्यक्रमाच्या वेळी सर्वच महिलांना खूप सुंदर दिसायचे असते. लग्नात नवरीचा लुक आकर्षक आणि हटके दिसावा यासाठी लाखो रुपयांच्या साड्यांची खरेदी केली जाते. पण बऱ्याचदा साडी खरेदी केल्यानंतर आवडीचा रंग अंगावर खुलून दिसत नाही आणि साडी नेसण्याची संपूर्ण उत्साह निघून जातो. यामागील एकमेव कारण म्हणजे स्किन टोन आणि अंडरटोन लक्षात न घेता साडीची निवड करणे. त्यामुळे लग्न सोहळ्यासाठी साडीची निवड करताना या गोष्टींची आवश्यक काळजी घ्या, अन्यथा लग्नातील रिसेप्शन किंवा विधी सोहळ्यात लुक सुंदर दिसणार नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
Wedding Saree Tips: लग्नासाठी साडी खरेदी करताना रंग, डिझाइन आणि फॅब्रिकची 'या' पद्धतीने करा निवड

लग्न सोहळ्यात किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात साडीची निवड करताना स्वतःचा स्किन टोन आणि अंडरटोन ओळखणे फारच आवश्यक आहे. हाताच्या मनगटावरील नसा तपासून अंडरटोन ओळखला जातो. वॉर्म अंडरटोन असल्यास हाताच्या नसा हिरवट रंगाच्या दिसतात तर कूल अंडरटोनमध्ये नसा निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या असतात. न्युट्रल अंडरटोन नसा हिरवे आणि निळे दोन्ही रंग दर्शवतात.

गोऱ्यापाण त्वचेवर मरुन, राणी गुलाबी, पाचू हिरवा, नेव्ही ब्लू आणि गडद जांभळा अतिशय खुलून दिसतो. तर गव्हाळ रंगावर मस्टर्ड, वाईन, टील ग्रीन, रॉयल ब्लू, रस्ट आणि टोमॅटो रेड इत्यादी रंग सुदंर दिसतात. पारंपरिक लाल किंवा हिरव्या रंगांची पैठणी रिसेप्शन लुकसाठी उत्तम आहे.

सावळ्या रंगाच्या त्वचेवर फ्युशिया, कोबाल्ट ब्लू, एमराल्ड, ऑरेंज, गोल्डन यलो आणि पर्पल हे चमकदार रंग शोभून दिसतात. त्यामुळे साडीची निवड करताना योग्य रंगाची निवड करणे आवश्यक आहे.

न्युट्रल अंडरटोनसाठी टील, नेव्ही ब्लू, डस्टी रोज, पीच, आयव्हरी आणि सॉफ्ट पर्पल रंग अतिशय उत्तम आहे. या रंगाच्या साडींवर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान करू शकता.

सूर्यप्रकाशात पेस्टल व मिंटसारखे हलके रंग खुलून दिसतात. याशिवाय रात्रीच्या वेळी कोणत्याही कार्यक्रमासाठी उबदार आणि लाईट्समध्ये वाईन व नेव्ही ब्लू सारख्या गडद रंगांची निवड करावी.






