पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अभूतपूर्व मतदान झाले असून, या दोन्ही मतदारसंघांतील महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. सोलापूर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक मतदान झाल्याचेही त्यांनी सांगितले. गोरे म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघात 62 टक्के, तर शिक्षक मतदारसंघात 90 टक्के मतदान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात 72 टक्के मतदान नोंदविण्यात आले. मतदानाच्या वेळी अनेक बूथवर एकतर्फी मतदान महायुतीच्या बाजूने झाल्याचा दावा त्यांनी केला. राज्यातील पाचही जागा महायुती जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बॅलेट पेपर मतदानाबाबत बोलताना गोरे म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत यापूर्वी मोठ्या फरकाने पराभव झाला होता. मात्र, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदार स्वतःचा विचार करून मतदान करतात. या निवडणुकीचे वेगवेगळे कंगोरे असून, पक्षीय पातळीवर हा फार मोठा विषय नसतो. जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपबाबत बोलताना त्यांनी क्लिपची सत्यता तपासण्याची गरज व्यक्त केली. आजच्या काळात एआयच्या माध्यमातून कोणाचाही आवाज तयार करता येतो. चौकशी होऊन सत्य बाहेर येईपर्यंत या क्लिपला महत्त्व देण्याची गरज नाही. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असे ते म्हणाले. रामदास कदम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, महायुतीतील प्रत्येक नेत्याने जबाबदारीने बोलावे, असे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर भाष्य करणे उचित नसल्याचेही गोरे यांनी स्पष्ट केले.