Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI Credit Card Recovery Rules: तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरण्यात अपयशी ठरल्यास कोणती कारवाई केली जाईल? RBI चे नियम जाणून घ्या

RBI Credit Card Recovery Rules News: रिकव्हरी एजंट ग्राहकांना मारहाण किंवा छळ करू शकतात का? जाणून घ्या क्रेडिट कार्ड वसुलीबाबतचे आरबीआयचे कडक नियम आणि तुमचे कायदेशीर अधिकार.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 07, 2026 | 09:01 PM
तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरण्यात अपयशी ठरल्यास कोणती कारवाई केली जाईल? (Photo Credit- X)

तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल भरण्यात अपयशी ठरल्यास कोणती कारवाई केली जाईल? (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • सावधान!
  • रिकव्हरी एजंट दादागिरी करत असतील तर ‘हे’ आहेत तुमचे अधिकार
  • RBI ने आखून दिलेली नियमावली नक्की वाचा
RBI Credit Card Recovery Rules: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भरबाजारात काही रिकव्हरी एजंट एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. पतीला वाचवण्यासाठी पत्नी धडपड करत आहे, मात्र एजंट त्यांची दादागिरी सोडायला तयार नाहीत. क्रेडिट कार्डचे थकीत पेमेंट घेण्यासाठी आलेल्या या एजंटची ही वर्तणूक कायदेशीर आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) वसुलीसाठी अत्यंत कडक नियम बनवले आहेत, जे प्रत्येक ग्राहकाने जाणून घेणे आवश्यक आहे.

रिकव्हरी एजंटची दादागिरी कायद्याने गुन्हा

आरबीआयच्या स्पष्ट नियमांनुसार, कोणताही बँक रिकव्हरी एजंट ग्राहकाचा मानसिक किंवा शारीरिक छळ करू शकत नाही. ग्राहकाचा अपमान करणे, अपशब्दांचा वापर करणे किंवा अंगावर हात टाकणे हा कायदेशीररीत्या गंभीर गुन्हा आहे. अशा परिस्थितीत ग्राहक थेट पोलिसांत धाव घेऊ शकतात.

कॉल करण्यासाठी वेळेचे बंधन: सकाळी 8 ते संध्याकाळी 7

वसुलीसाठी एजंट ग्राहकांना कधीही फोन करू शकत नाहीत. आरबीआयच्या नियमावलीनुसार, वसुलीसाठी कॉल करण्याची वेळ सकाळी 8:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंतच निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्हाला सकाळी 8 पूर्वी किंवा संध्याकाळी 7 नंतर वसुलीसाठी फोन आला, तर तुम्ही तो त्वरित खंडित करू शकता. या वेळेव्यतिरिक्त येणारे कॉल्स हे नियमांचे उल्लंघन मानले जातात.

घरी येण्यापूर्वी सूचना देणे अनिवार्य

कोणताही एजंट पूर्वसूचना दिल्याशिवाय तुमच्या घरी किंवा कार्यालयात येऊ शकत नाही. जर एखादा एजंट तुमच्या दारात उभा असेल, तर त्याच्याकडे खालील गोष्टी असणे अनिवार्य आहे:

  • बँकेचे अधिकृत पत्र (Authorization Letter)
  • बँकेचे ओळखपत्र (ID Card) या कागदपत्रांशिवाय त्यांना तुमच्याशी चर्चा करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही.

कॉर्पोरेट सेल्स ते 106 कोटी रुपयांचे ‘एयूएम’; जाणून घ्या विजय शेजवळ यांचा व्यवसायाचा प्रवास

गोपनीयता आणि सामाजिक प्रतिष्ठा

तुमच्या कर्जाची किंवा क्रेडिट कार्डच्या थकबाकीची माहिती बँक किंवा एजंट तिसऱ्या व्यक्तीला देऊ शकत नाही. तुमच्या शेजाऱ्यांसमोर, नातेवाईकांसमोर किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपमानित करण्याचा अधिकार एजंटला नाही. तुमची वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवणे ही बँकेची जबाबदारी आहे.

एजंट त्रास देत असतील तर काय करावे?

1. बँकेकडे तक्रार: सर्वात आधी संबंधित बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात किंवा नोडल ऑफिसरकडे लेखी तक्रार नोंदवा.

2. बँकिंग ओम्बड्समन (Banking Ombudsman): जर बँकेने 30 दिवसांच्या आत तुमच्या तक्रारीवर कारवाई केली नाही, तर तुम्ही आरबीआयच्या बँकिंग लोकपालाकडे तक्रार करू शकता.

3. पोलीस मदत: शारीरिक इजा किंवा धमकावण्याचा प्रयत्न झाल्यास त्वरित स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार (FIR) दाखल करा.

4. पुराव्यांचे संकलन: एजंटसोबतचे संभाषण रेकॉर्ड करा किंवा सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवा, जेणेकरून तुम्हाला कायदेशीर लढाईत मदत होईल.

लक्षात ठेवा, कर्ज फेडणे ही तुमची जबाबदारी असली, तरी सन्मानाने जगणे हा तुमचा हक्क आहे. वसुली एजंटशी व्यावसायिक भाषेत संवाद साधण्याची मागणी तुम्ही करू शकता.

LPG सिलिंडरच्या किमती बदलल्या! तुमच्या खिशावर किती भार पडणार? पाहा आजचे ताजे दर

Web Title: Rbi rules for credit card recovery agents customer rights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • Business News
  • Credit Card Rules
  • RBI

संबंधित बातम्या

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा
1

Jobs Announcement: सणासुदीला नोकरीची बंपर मागणी, Flipkart नंतर आता Myntra च्या देखील 26,000 नोकरीसाठी जागा

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ
2

Sugar Import: कमी शुल्कात विकली जाणार अमेरिकेत भारतीय साखर, आयात कोट्यात वाढ

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा
3

Aadhaar Update: 30 सप्टेंबरनंतर लागणार अधिक शुल्क? 5-17 वर्षांच्या मुलांसाठी कसे कराल अपडेट, मोफत सेवा

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
4

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.