Stock Market Today: घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात... गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने दिले संकेत
गुरुवारी, भारतीय शेअर बाजार कोसळला, तीन दिवसांची विजयी मालिका खंडित झाली, बेंचमार्क निफ्टी ५० २५,५०० च्या पातळीच्या खाली घसरला. सेन्सेक्स १,२३६.११ अंकांनी म्हणजेच १.४८% ने घसरून ८२,४९८.१४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३६५.०० अंकांनी म्हणजेच १.४१% ने घसरून २५,४५४.३५ वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक ८११.२५ अंकांनी किंवा १.३२% ने घसरून ६०,७३९.५५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी सात इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी शिफारस केलेल्या स्टॉक्समध्ये यूपीएल, बायोकॉन, एचडीएफसी लाईफ, फोर्टिस हेल्थकेअर, टाटा टेक्नॉलॉजीज, सन्मान कॅपिटल आणि एमएम फोर्जिंग यांचा समावेश आहे.
रेलिगेअर ब्रोकिंगचे संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी आजच्या व्यवहारात खरेदी आणि विक्री करण्यासाठी तीन शेअर्सची शिफारस केली आहे. अजित मिश्रा यांनी सुचवलेल्या स्टॉक्स निवडीमध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी, आरबीएल बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात गुंतवकणूदार वारी एनर्जीज, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नोवार्टिस इंडिया, एबीबी इंडिया, सीआयई ऑटोमोटिव, पेस डिजिटेक, झायडस लाइफसायन्सेस, करूर वैश्य बँक या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.
आशियाई बाजारांमध्ये संमिश्र व्यवहार झाले, तर अमेरिकन शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, वॉल स्ट्रीटचे तिन्ही प्रमुख निर्देशांक लाल रंगात बंद झाले. गुरुवारी, सावध जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराने तीन दिवसांची विजयी मालिका खंडित करत जोरदार घसरण केली.






