Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Reliance Jio IPO : तयार ठेवा पैसा… मिळणार कमाईची मोठी संधी! Jio च्या मेगा IPO ची तारीख ठरली? ‘या’ दिवशी बोलीची शक्यता

Reliance Jio IPO : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आणि रिलायन्सच्या भागधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून Reliance Jio च्या बहुप्रतिक्षित आयपीओबाबत मोठे अपडेट्स आले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 03, 2026 | 01:14 PM
Jio च्या मेगा IPO ची तारीख ठरली ( सौजन्य - सोशल मीडिया )

Jio च्या मेगा IPO ची तारीख ठरली ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • मिळणार कमाईची मोठी संधी!
  • Jio च्या मेगा IPO ची तारीख ठरली
  • ‘या’ तारखेला लागणार बोली
Reliance Jio IPO : गुंतवणूकदार नेहमी बंपर कमाईच्या शोधात असतात. चांगला IPO कधी मार्केटमध्ये येईल आणि त्यावर बोली लावता येईल. तर ही प्रतिक्षा संपली आहे. कारण बऱ्याच काळापासून प्रतिक्षेत असलेला मुकेश अंबांनींच्या Jio IPO आता लवकरच मार्केटमध्ये एन्ट्री करणार आहे. २८ ऑगस्ट रोजी सेबीने मंजुरी दिल्यानंतर, आता त्याच्या सुरुवातीची प्रतीक्षा संपली आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल होल्डिंग कंपनी, जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड, या महिन्यात आपला बहुप्रतिक्षित IPO आणण्याच्या तयारीत आहे. कोणत्या तारखेला आपल्याला ही संधी मिळणार आहे? ( Reliance Jio IPO ) 

Price Hike October 2026 : एका झटक्यात वाढले ‘या’ वस्तूंचे भाव; ऑक्टोबर महिन्यात काय-काय महागले? जाणून घ्या लिस्ट

Jio चा IPO या तारखेला सुरू होण्याची शक्यता

मुकेश अंबानींच्या Reliance Industries च्या डिजिटल विभागाचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (Jio IPO) २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये १९ ऑक्टोबर रोजी अँकर बुकिंगसाठी खुला होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेअर्स २८ ऑक्टोबर रोजी लिस्टींग केले जाऊ शकतात. पण कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “Jio अपला IPO लॉन्च करण्याच्या अगदी जवळ आहे. मात्र सध्याची मार्केटची परिस्थिती आणि जागतिक घडामोडी त्याच्या वेळेवर परिणाम करण्याची शक्यता आहे.सेबीसोबतची नियामक प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली आहे. सर्व आवश्यक मंजुऱ्या मिळालेल्या आहेत.”

“जिओ आपला आयपीओ आणण्याच्या अगदी जवळ आहे, मात्र बाजारातील परिस्थिती आणि जागतिक घडामोडींचा त्याच्या वेळेवर परिणाम होईल. सेबीसोबतची नियामक प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असून सर्व आवश्यक मंजुऱ्या मिळाल्या आहेत,” असे एका सूत्राने सांगितले.
या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, कंपनीला अलीकडील बैठकांमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार FIIs आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे.

Jio IPO च्या संभाव्य ओपनिंग आणि लिस्टिंगच्या तारखा

अँकर बुक: १९ ऑक्टोबर
IPO ओपनिंग: २१ ऑक्टोबर
IPO क्लोज: २३ ऑक्टोबर
संभाव्य लिस्टिंग: २८ ऑक्टोबर
या तारखा बाजारातील परिस्थितीवर अवलंबून आहेत आणि आर्थिक बाजारातील बदलांनुसार त्या बदलण्याची शक्यता आहे.

Jio IPO किती मोठा ?

मुकेश अंबानींच्या जिओने अद्याप अंतिम इश्यूची फायनल साईज जाहीर केलेली नाही, परंतु बाजारातील अंदाजानुसार हा IPO अंदाजे ₹३७,७०० कोटींचा असू शकतो. जर हा आकार गाठला गेला, तर हा इश्यू ह्युंदाई मोटर इंडियाच्या ₹२७,८५८.७५ कोटींच्या IPO ला मागे टाकू शकतो आणि भारतीय बाजारातील सर्वात मोठ्या पब्लिक ऑफरिंगपैकी एक बनू शकतो.

सेबीकडे दाखल केलेल्या IPO च्या कागदपत्रांनुसार, या इश्यूमधील ५०% हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs), ३५% किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी (RIIs) आणि १५% गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NIIs) राखीव आहे.

DRHP नुसार, जिओ प्लॅटफॉर्म्स आपल्या टेलीकॉम सब्सिडियरी, रिलायन्स जिओ इन्फोकॉम (RJIL) चे थकीत कर्ज पूर्णपणे किंवा अंशतः फेडण्यासाठी किंवा मुदतपूर्व परतफेड करण्यासाठी IPO मधून मिळणाऱ्या अंदाजे ₹२७,५०० कोटींचा वापर करण्याची योजना आखत असल्याचं बोललं जात आहे.

( Desclaimer : शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

RBI Rules For Bank : बँकांविरोधात वाढताहेत तक्रारी… RBI अँक्शन मोडवर! सिस्टीम सुधारण्याचे दिले कडक आदेश, ग्राहकांना काय फायदा?

Web Title: Reliance jio ipo launch date bidding details and investment opportunity marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • IPO News
  • jio
  • Reliance

संबंधित बातम्या

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! ‘या’ कंपनीच्या IPOने दिला ६३% परतावा
1

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! ‘या’ कंपनीच्या IPOने दिला ६३% परतावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.