
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत सध्या बराच चर्चेत आहे. तो म्हणजे टीम सोडल्याबाबत आणि या वर्षीच्या आयपीएलमध्ये ऋषभ पंतच्या मानधनात कपात होणार असल्याच्या बातम्यामुळे तो बराच चर्चेत आला आहे. पंत २०२७ च्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे, पण त्याचे मानधन निम्मे करण्यात आले आहे. या सगळ्या परिस्थितीवर ज्येष्ठ उद्योगपती हर्ष गोएंका यांनीही यांनी ट्वीट करत खिल्ली उडवली आहे.
ऋषभ पंतच्या पगारात कपात झाल्याच्या वृत्तांनंतर, प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी या क्रिकेटपटूची खिल्ली उडवली आहे. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये त्यांनी ऋषभच्या पगारातील कपातीची तुलना कॉर्पोरेट संस्कृतीशी केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी आयपीएल लिलावाला कॉर्पोरेट संस्कृतीपेक्षाही वाईट म्हटले आहे.
हर्ष गोएंका यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट ‘X’ वर एक पोस्ट टाकली, ज्यात त्यांनी लिहिले आहे, “ऋषभ पंत: ₹२७ कोटी – ₹१५ कोटी. कल्पना करा, तुम्ही एका कंपनीच्या सीईओला सांगत आहात की, ‘गेल्या वर्षी तुम्हाला ₹२७ कोटी मिळाले, पण या वर्षी तुमच्या कामगिरीवर आणि बाजारातील मागणीवर आधारित, तुमचा पगार ₹१५ कोटींपर्यंत कमी केला जात आहे.’ कॉर्पोरेट जगात अशा गोष्टीची कल्पना करणेही कठीण आहे.”
Rishabh Pant: ₹27 crore ➝ ₹15 crore. Imagine a CEO being told “Last year we paid you ₹27 crore. This year, based on performance and market demand, we’re cutting it to ₹15 crore.” In corporate life, that’s unthinkable. In the IPL, it’s an auction that determines what you’re… — Harsh Goenka (@hvgoenka) June 23, 2026
त्याने पुढे लिहिले, “पण आयपीएलमध्ये खेळाडूंची किंमत लिलावाद्वारे ठरवली जाते आणि त्यांचे सध्याचे मूल्य त्यावरच आधारित असते. त्यामुळे सुदैवाने, आपल्यापैकी बहुतेक जण कॉर्पोरेट जगात काम करतात.” गोएंकाच्या पोस्टवर सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काही जण हर्ष गोएंकावर टीका करत आहेत, तर काही जण पंतची खिल्ली उडवण्यात त्याला साथ देत आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आयपीएल २०२५ च्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला २७ कोटी रुपयांना विकत घेतले होते. ही लीगच्या इतिहासातील सर्वाधिक रक्कम होती. इतकेच नाही तर, तो संघाचा कर्णधारही होता. मात्र, कर्णधार म्हणून त्याच्या खराब कामगिरीमुळे ही रक्कम कमी करण्यात आली आहे. आता ऋषभ पंत पुन्हा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार असून, त्यासाठी त्याला १२ कोटी रुपये दिले जात आहेत, जे त्याच्या पूर्वीच्या पगाराच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.