Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी, अवघ्या 5000 रुपयांत सुरू करा गुंतवणूक; SBI ने आणला नवा टार्गेट Mutual Fund

गुंतवणूकदारांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण SBI Mutual Fund ने या नवीन टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंडाची घोषणा केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना केवळ 5000 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करता येईल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 10, 2026 | 06:03 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी
  • अवघ्या 5000 रुपयांत सुरू करा गुंतवणूक
  • SBI ने आणला नवा टार्गेट Mutual Fund
भारताची सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाने एका ‘टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंडा’ची घोषणा केली आहे. या फंडाचे नाव ‘एसबीआय क्रिसिल-आयबीएक्स एसडीएल इंडेक्स – जून २०३४ इंडेक्स फंड’ असे आहे. न्यू फंड ऑफर (NFO) ७ जुलै ते १४ जुलै २०२६ या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुली राहील.

Akasa Air चा यू-टर्न! सुरु होताच बंद केली नोएडा-नवी मुंबई विमानसेवा, अवघ्या दोन आठवड्यांत का घेतला मोठा निर्णय?

काय आहे ओपन-एंडेड टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंड?

‘एसबीआय क्रिसिल – आयबीएक्स एसडीएल इंडेक्स – जून २०३४ इंडेक्स फंड’ हा एक ओपन-एंडेड टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंड आहे. हा फंड ‘क्रिसिल-आयबीएक्स एसडीएल इंडेक्स – जून २०३४ इंडेक्स’चा मागोवा (ट्रॅक) घेतो. यामध्ये व्याजाच्या दराची जोखीम तुलनेने जास्त आहे. क्रेडिटची जोखीम तुलनेने कमी आहे. ट्रॅकिंग एररच्या अधीन राहून, अंडरलाईंग इंडेक्सद्वारे दर्शविलेल्या रोख्यांच्या एकूण परताव्याशी साधर्म्य सांगणारा परतावा प्रदान करणे हा या योजनेचा गुंतवणुकीचा उद्देश आहे. योजनेचा गुंतवणुकीचा उद्देश साध्य होईल याची कोणतीही हमी किंवा आश्वासन नाही. ही योजना कोणत्याही परताव्याची हमी किंवा आश्वासन देत नाही.

मनी मार्केट साधनांमध्ये काय?

‘एसबीआय क्रिसिल – आयबीएक्स एसडीएल इंडेक्स – जून २०३४ इंडेक्स फंड’ प्रामुख्याने आपल्या मालमत्तेचा ९५% ते १००% भाग ‘क्रिसिल-आयबीएक्स एसडीएल इंडेक्स – जून २०३४’ चा भाग असलेल्या रोख्यांमध्ये गुंतवेल. मालमत्तेचा उर्वरित ५% पर्यंतचा भाग कर्ज (डेट) आणि मनी मार्केट साधनांमध्ये गुंतवला जाऊ शकतो. यामध्ये रोख आणि रोख समतुल्य साधनांचा समावेश आहे. मनी मार्केट साधनांमध्ये कमर्शियल पेपर्स, कमर्शियल बिल्स, सरकारी रोखे समाविष्ट असतील. सरकारी रोख्यांमध्ये जी-सेक (G-Secs), एसडीएल (SDLs), एक वर्षापर्यंतची मुदत असलेल्या ट्रेझरी बिल्स, कॉल किंवा नोटीस मनी, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, युसान्स बिल्स आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या इतर साधनांचा समावेश असेल. रोख आणि रोख समतुल्य साधनांमध्ये एक वर्षापर्यंतची उर्वरित मुदत असलेले ट्रेझरी बिल्स आणि सरकारी रोखे, ट्रायपार्टी रेपो आणि लिक्विड म्युच्युअल फंडांच्या युनिट्सचा समावेश असू शकतो.

‘या’द्वारे देखील गुंतवणूक

न्यू फंड ऑफर (NFO) दरम्यान किमान अर्ज रक्कम ₹५,००० आहे. त्यानंतर ₹१ च्या पटीत गुंतवणूक करता येईल. अतिरिक्त खरेदी ₹१,००० आणि त्यानंतर ₹१ च्या पटीत केली जाऊ शकते. गुंतवणूकदार दैनिक, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक फ्रिक्वेन्सीसह सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) द्वारे देखील गुंतवणूक करू शकतात. अधिक तपशिलांसाठी गुंतवणूकदारांना स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (योजनेचे माहिती पत्रक) पाहण्याचा सल्ला दिला जातो.

श्री. राजीव राधाकृष्णन, सीएफए, मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि संशोधन प्रमुख (फिक्स इन्कम), या योजनेचे फंड मॅनेजर म्हणून काम पाहतील. ते जून २००८ पासून एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडशी जोडलेले आहेत. ते सध्या फिक्स इन्कम आणि हायब्रिड गुंतवणूक धोरणांमधील पोर्टफोलिओ व्यवस्थापित करतात.

1160 कोटींचा Ethanol घोटाळा; मध्य प्रदेशात कुपोषित मुलांचा 50 लाख क्विंटल तांदूळ गायब, नेमकं काय प्रकरण?

Web Title: Sbi launched new target mutual fund start investing just 5000

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Mutual Fund
  • SBI
  • SBI Bank

संबंधित बातम्या

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर
1

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
2

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
3

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला
4

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.