(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तपासात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झालाः हा साधा तांदूळ नव्हता. हा कुपोषित मुलांसाठी खास तयार केलेला, पोषकतत्त्वयुक्त तांदूळ होता. गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींमधील अॅनिमिया टाळण्यासाठीही या तांदळाचा वापर केला जातो. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे मिसळली जातात. या संपूर्ण प्रकरणामुळे इथेनॉल प्लांट चालक, तांदूळ गिरणी मालक आणि सरकारी यंत्रणा यांच्यातील संगनमत उघड झाले आहे.
हा संपूर्ण घोटाळा एका छोट्या घटनेमुळे उघडकीस आला. २ जून रोजी, बालाघाट येथील नवेगाव गोदामातून छिंदवाडा येथील एव्हीजे इथेनॉल प्लॉटमध्ये तांदळाचे ३ ३ ट्रक पाठवण्यात आले होते. नोंदीनुसार, हा तांदूळ इथेनॉल उत्पादनासाठी वापरला जाणार होता. ३ जून रोजी, यापैकी एक ट्रक बालाघाट येथील सावेती राईस मिलमध्ये सापडला. उर्वरित दोन ट्रक इथेनॉल प्लांटपर्यंत कधीच पोहोचले नाहीत, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, एका विशेष पोलीस तपास पथकाने तपास सुरू केला. या तपासादरम्यान तांदूळ गिरणी मालक, प्लांट ऑपरेटर आणि वाहतूकदार यांच्यासह ४० हुन अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. आतापर्यंत चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.
उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. या तपासादरम्यान एकूण १२ ट्रक जप्त करण्यात आले आहेत. सुरुवातीला, हा तपास छिंदवाडा, बालाघाट आणि सिवनीपुरता मर्यादित होता, आता, त्याची व्याप्ती राज्यातील इतर इथेनॉल प्लांट आणि तांदूळ गिरण्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. एफसीआयच्या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशातील २१ धान्य-आधारित इथेनॉल प्लांटना सहा महिन्यांत २,११,००० मेट्रिक टन तांदूळ वाटप करण्यात आला. यापैकी, छिंदवाडा येथील गुलशन पोलिओल्सला सर्वाधिक ४८,१६२ मेट्रिक टन तांदूळ मिळाला.
वास्तविक, मध्य प्रदेश सरकारचा असा युक्तिवाद आहे की गोदामांमध्ये अतिरिक्त धान्य साठवल्याने ते खराब होण्याचा धोका असतो. नवीन पिकासाठी जागा तयार करणे देखील आवश्यक आहे. म्हणूनच इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाते. सरकार या तांदळावर प्रति क्विंटल अंदाजे ३,९०० ते ४,००० खर्च करते, तर तोच तांदूळ प्लांटना केवळ २,३२० प्रति क्विंटल दराने पुरवला जातो. सरकारी आकडेवारीनुसार, १०० किलो धानापासून अंदाजे ६७ किलो तांदूळ तयार होतो. या खर्चात किमान आधारभूत किंमत, पॅकेजिंग आणि गिरणीचा खर्च समाविष्ट आहे.






