Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी; सेन्सेक्स 74900 च्या जवळ तर निफ्टीत 200 अंकांची वाढ

बाजारातील ही गिफ्ट निफ्टी जवळपास २०० अंकांनी वधारल्याने देशांतर्गत बाजाराला आधार मिळाला. शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुरुवातीच्या व्यवहारात बँकिंग आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये लक्षणीय तेजी दिसून आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 12, 2026 | 11:12 AM
शेअर मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी; सेन्सेक्स 74900 च्या जवळ तर निफ्टीत 200 अंकांची वाढ

शेअर मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी; सेन्सेक्स 74900 च्या जवळ तर निफ्टीत 200 अंकांची वाढ

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात दमदार झाली. सुरुवातीच्या व्यवहारात, बीएसई सेन्सेक्स 1100 हून अधिक अंकांनी वधारून ७४९०० च्या जवळ पोहोचला, तर एनएसई निफ्टीमध्येही जवळपास २०० अंकांची वाढ होऊन तो तेजीत होता. बाजारातील ही तेजी सुधारलेल्या जागतिक संकेत आणि गिफ्ट निफ्टीच्या दमदार कामगिरीमुळे आल्याचे दिसून येत आहे.

बाजारातील ही गिफ्ट निफ्टी जवळपास २०० अंकांनी वधारल्याने देशांतर्गत बाजाराला आधार मिळाला. शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुरुवातीच्या व्यवहारात बँकिंग आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये लक्षणीय तेजी दिसून आली. आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारखे प्रमुख शेअर्स तेजीत व्यवहार करत होते. गुरुवारी बाजारात लक्षणीय चढ-उतार दिसून आले. त्यानंतर आता कमालीची तेजी दिसून आली.

पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या प्रॉफिट-बुकिंगमुळे सेन्सेक्स १५१ अंकांनी घसरून बंद झाला, तर निफ्टी २३२०० च्या खाली घसरला.

गुंतवणूकदार सध्या अनेक घटकांवर लक्ष ठेवून आहेत. त्यात गिफ्ट निफ्टीची हालचाल, कच्च्या तेलाच्या किमती, परदेशी गुंतवणूकदारांची (FII) हालचाल, जागतिक बाजारातील संकेत या गोष्टींचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, निफ्टी सध्या २३००० ते २३५५० च्या दरम्यान व्यवहार करू शकतो. बाजाराची पुढील दिशा केवळ एका मोठ्या ट्रिगरनंतरच निश्चित होईल.

अमेरिका-इराण संघर्षाचा दिसू शकतो परिणाम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित हल्ले रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर अमेरिका-इराण शांतता कराराच्या आशा निर्माण झाल्या आहेत. या परिस्थितीचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारांमधून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांमुळे, आज १२ जून रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत उघडत आहेत. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत दिले होते. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ३२३ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३५२३ च्या पातळीवर ट्रेड करत होता.

Networth : एका दिवसात अंबानी-अडानीच्या एकूण संपत्तीपेक्षा अधिक कमाई, Trillionaire होण्याच्या तयारी Elon Musk

Web Title: Sensex nears 74900 nifty rises by 200 points

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • BSE Sensex
  • Finance News
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Crash : भारतीय शेअर बाजार पुन्हा कोसळला! HDFC Bank चा शेअर धडाम; Nifty 22400 च्या खाली
1

Share Market Crash : भारतीय शेअर बाजार पुन्हा कोसळला! HDFC Bank चा शेअर धडाम; Nifty 22400 च्या खाली

Share Market Today: आज शेअर बाजारात कमाईची संधी? सकारात्मक पातळीवर होणार सुरुवात, ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर
2

Share Market Today: आज शेअर बाजारात कमाईची संधी? सकारात्मक पातळीवर होणार सुरुवात, ‘या’ शेअर्सवर ठेवा नजर

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर
3

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?
4

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.