Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रतन टाटा यांनी झिरोपासून हिरो बनवलेल्या 7 कंपन्या; काहींचा परदेशातही आहे डंका!

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन होऊन २ दिवस उलटले. मात्र, अजूनही रतन टाटा यांची चर्चा थांबायला तयार नाही. रतन टाटा यांनी टाटा समूहाला अशा उंचीवर नेऊन ठेवले आहे. जिथे पोहचणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. टाटा समुहाच्या अशाच काही कंपन्यांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत... ज्यांना रतन टाटा यांनी झिरोपासून हिरो केले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 13, 2024 | 07:05 PM
रतन टाटा यांनी झिरोपासून हिरो बनवलेल्या 7 कंपन्या; काहींचा परदेशातही आहे डंका!

रतन टाटा यांनी झिरोपासून हिरो बनवलेल्या 7 कंपन्या; काहींचा परदेशातही आहे डंका!

Follow Us
Close
Follow Us:

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन होऊन २ दिवस उलटले. मात्र, अजूनही रतन टाटा यांची चर्चा थांबायला तयार नाही. रतन टाटा यांच्या सेवाभावी आणि साध्या जीवनाबद्दल सर्वजण बोलत आहेत. मात्र, व्यावसायिक जीवनातही टाटा खूप यशस्वी राहिले. रतन टाटा यांनी टाटा समूहाला अशा उंचीवर नेऊन ठेवले आहे. जिथे पोहचणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. रतन टाटा यांनी अनेक कंपन्यांना झिरोपासून हिरो केले आहे. अशाच काही कंपन्यांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत…

टाटा समूहाने २०२१ मध्ये बिग बास्केट खरेदी केली. नंतर ही देशातील सर्वात मोठी किराणा कंपनी बनली आहे. टाटा ग्रुपच्या अंतर्गत टाटा डिजिटलने हा करार २ बिलियन डॉलरला केला होता. बिग बास्केटचे काम चांगले होते. मात्र, प्रगती होत नव्हती. टाटा समूहाने ताब्यात घेतल्यानंतर कंपनीला सुगीचे दिवस सुरू झाले.

१९९९ साली टाटा मोटर्सची पहिली कार टाटा इंडिका बाजारात काही विशेष करत नव्हती. परदेशी कंपन्यांचा दबदबा वाढत होता. अशा परिस्थितीत रतन टाटा यांनी टाटा मोटर्स विकण्याचा निर्णय घेतला. बिल फोर्ड यांची भेट घेतली. त्यावेळी फोर्डकडे जग्वार आणि लँड रोव्हरसारखे लक्झरी सेगमेंट होते. बिल फोर्ड यांनी अहंकाराने रतन टाटा यांचा प्रस्ताव नाकारला. पुढे २००८ मध्ये जेव्हा अमेरिकेतील मंदीच्या काळात फोर्डची अवस्थाही बिकट झाली. तेव्हा रतन टाटा यांनी लँड रोव्हर आणि जग्वार सेगमेंट २.३ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले. आज तो एक लक्झरी ब्रँड बनला आहे.

हे देखील वाचा – ‘भारतावर दुप्पट कर लादणार’, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी; वाचा… नेमका काय होणार भारतावर परिणाम?

रतन टाटा यांनी देवू कमर्शियल व्हेइकल्स ही कोरियन कंपनी विकत घेतली होती. ही कंपनी व्यावसायिक वाहने तयार करत असे. या करारानंतरच टाटा मोटर्सची कोरियातील पोहोच वाढली. २००४ मध्ये, टाटा मोटर्सने १०२ दशलक्ष डॉलर्सचा भारतातील सर्वात मोठा करार केला होता. त्यावेळी ही कंपनी तोट्यात चालली होती. मात्र, रतन टाटांच्या खरेदीनंतर ही कंपनी फायदेशीर ठरली आणि आज तिचे मोठे नाव आहे.

कोरस ग्रुप ही युरोपमधील दुसरी सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी होती आणि जगातील आठवी मोठी कंपनी होती. गेल्या काही वर्षांपासून या कंपनीच्या स्टील सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी होत नव्हती. दरम्यान, रतन टाटा यांनी या समूहाची कोरस स्टील कंपनी विकत घेण्यासाठी ११.३ अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती. त्यानंतर कंपनीने सहमती दर्शवली आणि त्यानंतर २०१२ मध्ये टाटा समूहाची कंपनी बनली. आज ही कंपनी युरोपात तसेच जगभरात पोलाद पुरवठ्यासाठी मोठी उत्पादक कंपनी आहे.

रतन टाटा यांनी २००० मध्ये ४३१.३ दशलक्ष डॉलर्सला टेटली चहा विकत घेतला आणि चहाच्या व्यवसायात त्यांचा दर्जा वाढवला. आता हा चहा टाटा चहाचा लक्झरी ब्रँड बनला आहे. २०२१ मध्ये, टाटा सन्सने देशातील प्रमुख एअरलाइन एअर इंडियावर नियंत्रण मिळवले. एअर इंडियाची सुरुवात रतन टाटा यांचे काका जेआरडी टाटा यांनी केली असली तरी काही वर्षांनी ती सरकारी कंपनी बनली होती.

रतन टाटा यांच्या कंपनीने आरोग्य क्षेत्रात काम करणारी 1 एमजी कंपनी खरेदी केली आहे. पूर्वी ही कंपनी केवळ ऑनलाइन औषधे पुरवत असे. मात्र, आता या कंपनीने डॉक्टरांचा सल्ला, औषधे आणि इतर सुविधाही देण्यास सुरुवात केली आहे. ही कंपनी झपाट्याने ऑनलाइन बाजारपेठ काबीज करत आहे.

Web Title: Seven companies which ratan tata made from zero to hero under tata group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 07:05 PM

Topics:  

  • Ratan Tata
  • Tata Group
  • tata motors

संबंधित बातम्या

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स
1

2 नव्या रंगाच्या पर्यायांसह Tata Punch EV, आता मिळणार अधिक फास्ट चार्जिंग; पहा फिचर्स

Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?
2

Tata Nexon EV च्या बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
3

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

ऑगस्ट 2025 मध्ये Tata Motors ‘या’ कारवर देतेय बंपर डिस्काउंट, लाखो रुपये वाचवण्याची सुवर्ण संधी
4

ऑगस्ट 2025 मध्ये Tata Motors ‘या’ कारवर देतेय बंपर डिस्काउंट, लाखो रुपये वाचवण्याची सुवर्ण संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.