Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: १०० रुपयांपेक्षा कमी किंंमतीत खरेदी करा हे शेअर्स, बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस

Share Market Update: गुरुवारी शेअर बाजारात तेजी होती. निफ्टीच्या टॉप परफॉर्मर्समध्ये इन्फोसिस, टीसीएस आणि नेस्ले यांचा समावेेश होता. बाजार तज्ज्ञांनी आज खरेदी करण्यासाठी कोणत्या स्टॉक्सची शिफारस केली, जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 22, 2025 | 09:05 AM
Share Market Today: १०० रुपयांपेक्षा कमी किंंमतीत खरेदी करा हे शेअर्स, बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस

Share Market Today: १०० रुपयांपेक्षा कमी किंंमतीत खरेदी करा हे शेअर्स, बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस

Follow Us
Close
Follow Us:

२२ ऑगस्ट रोजी आज शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. जॅक्सन होल इकॉनॉमिक सिम्पोजियममध्ये यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणापूर्वी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडतील अशी शक्यता बाजार तज्ज्ञांनी वर्तवली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंद असल्याचे दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,०८४ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ३८ अंकांनी कमी होता.

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

गुरुवारी, २१ ऑगस्ट रोजी देशांतर्गत शेअर बाजाराने सलग सहाव्या सत्रात तेजी नोंदवली, बेंचमार्क निफ्टी ५० २५,००० च्या वर राहिला. सेन्सेक्स १४२.८७ अंकांनी म्हणजेच ०.१७% ने वाढून ८२,०००.७१ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३३.२० अंकांनी म्हणजेच ०.१३% ने वाढून २५,०८३.७५ वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक ५६.९५ अंकांनी किंवा ०.१०% ने वाढून ५५,७५५.४५ वर बंद झाला. भारतीय शेअर बाजाराने सलग सहाव्या दिवशीही तेजीचा कल कायम ठेवला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये निफ्टी आयटी, एफएमसीजी आणि रिअ‍ॅल्टीमध्ये वाढ पाहायला मिळाली. निफ्टी मीडिया, फार्मा आणि फायनान्शियल सर्व्हिसेस यासारख्या क्षेत्रांना दिवसभरात मोठे नुकसान झाले.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंटमधील डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकादारांना एक्साइड इंडस्ट्रीज , कमिन्स इंडिया आणि एल अँड टी फायनान्सचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी आज गुंतवणूकादारांना १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये सेंट्रम कॅपिटल , डीसीडब्ल्यू आणि जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस यांचा समावेश आहे.

प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकादारांना खरेदी-विक्रीसाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँक , कोफोर्ज आणि सुला व्हाइनयार्ड्स यांचा समावेश आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकादारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये संघवी मूव्हर्स , सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी , टेक्नो इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग कंपनी, गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड आणि गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड यांचा समावेश आहे.

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

आज खरेदी करायच्या स्टॉकबाबत, बाजार तज्ञांनी काही माहिती दिली आहे. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्येस कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज लिमिटेड, लँडमार्क कार्स लिमिटेड, पतंजली फूड्स लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड, स्वान एनर्जी लिमिटेड आणि सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Share market on 22 august stocks to buy under rupees 100 experts recommended this share

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 09:05 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

निटकोतर्फे पहिल्या तिमाहीत ११४ टक्क्यांची वाढ, टाइल्स व्यवसायाचा विकास
1

निटकोतर्फे पहिल्या तिमाहीत ११४ टक्क्यांची वाढ, टाइल्स व्यवसायाचा विकास

BSE च्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण, ‘या’ विक्रीच्या वर्चस्वाने बाजारात भूकंप
2

BSE च्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण, ‘या’ विक्रीच्या वर्चस्वाने बाजारात भूकंप

Stocks Market: Nazara Tech, SBI Life सह शेअरमध्ये धमाका, चढउताराचे काय आहे कारण?
3

Stocks Market: Nazara Tech, SBI Life सह शेअरमध्ये धमाका, चढउताराचे काय आहे कारण?

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
4

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.