Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shark Tank India 6: शार्क टँक इंडियाचा नवा धमाका; ‘#DontBeATota’ मोहिमेद्वारे स्टार्टअप बझवर्ड्स वापरणाऱ्यांना मोलाचा सल्ला!

भारतातील सर्वात लोकप्रिय बिझनेस रिॲलिटी शो 'शार्क टँक इंडिया' आपल्या ६ व्या सीझनसह पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सोनी लिव्हवर नोंदणी सुरू झाल्यानंतर, शार्क टँकने '#DontBeATota' ही विशेष मोहीम लाँच केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 20, 2026 | 04:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शार्क टँक इंडियाचा नवा धमाका;
  • ‘#DontBeATota’ मोहिम
  • स्टार्टअप बझवर्ड्स वापरणाऱ्यांना मोलाचा सल्ला!
Shark Tank India 6: आपल्या सहाव्या सीझनसाठी नोंदणी सुरू केल्यानंतर शार्क टँक इंडियाने विशेष नवीन उपक्रम #DontBeATota लाँच केला आहे, जो स्टार्टअप जगतात वेगाने पसरत असलेल्या एका गैरसमजावर निशाणा साधतो. हा गैरसमज आहे: केवळ उद्योजकतेची भाषा बोलणे म्हणजे एक यशस्वी व्यवसाय उभा करण्यासारखेच आहे.

गाडी चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! E20 फ्यूलच्या वादात सरकारने उचलले मोठे पाऊल; नेमका काय आहे मास्टर प्लॅन?

#DontBeATota महत्त्वाकांक्षी उद्योजकांना काय आठवण करुन देतं?

व्हॅल्युएशन, बर्न रेट आणि ईबीआयटीडीए यांसारखे शब्द रोजच्या संभाषणाचा भाग बनले आहेत, अशा काळात हा उपक्रम साधा, पण अत्यंत समर्पक प्रश्न विचारतो: उद्योजकतेच्या या भाषेने मूळ व्यवसायालाच मागे टाकण्यास सुरुवात केली आहे का? विनोद आणि संस्कृतीच्या सूक्ष्म निरीक्षणाद्वारे #DontBeATota महत्त्वाकांक्षी उद्योजकांना आठवण करून देतो की, यशस्वी व्यवसाय हे केवळ स्टार्टअपच्या फॅशनेबल शब्दांवर (जार्गन) उत्तम पकड असल्यामुळे नाही, तर दृढ विश्वास, अंमलबजावणी, स्थिरता आणि व्यवसायाच्या मुलभूत गोष्टींच्या सखोल आकलनातून उभे राहतात.

शार्कचा सामना करताना शब्दांनी काम होत नाही तर…

या उपक्रमाच्या केंद्रस्थानी तोता (पोपट) हा एक चतुर मॅस्कॉट आहे, ज्याचा विश्वास आहे की, स्टार्टअपच्या संज्ञा आत्मविश्वासाने घोकून दाखवणे हे शार्कना प्रभावित करण्यासाठी पुरेसे आहे. ज्या शब्दांचा अर्थ कदाचित त्याला स्वतःलाही नीट माहीत नाही, अशा फॅशनेबल शब्दांनी सज्ज असलेला तोता या गैरसमजाचे प्रतिनिधीत्व करतो की, उद्योजकासारखे बोलणे म्हणजेच उद्योजक असणे होय. पण, शार्कचा सामना करण्याची वेळ येते, तेव्हा केवळ अशा शब्दांमुळे काम होत नाही. या खोडकर पात्राच्या माध्यमातून हा उपक्रम एक साधे सत्य समोर आणतो: स्टार्टअपची भाषा कोणीही तोंडपाठ करू शकते, पण आपला व्यवसाय खऱ्या अर्थाने समजतो, केवळ तेच संस्थापक व्यवसाय उभा करू शकतात.

व्यवसाय उभे करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले

गेल्या पाच सीझनमध्ये, शार्क टँक इंडियाने उद्योजकतेला मुख्य प्रवाहातील संभाषणांमध्ये आणण्यास मदत केली आहे, ज्यामुळे देशभरातील संस्थापकांना त्यांच्या संकल्पना मांडण्यासाठी, गुंतवणूक मिळवण्यासाठी आणि शाश्वत व्यवसाय उभे करण्यासाठी हक्‍काचे व्यासपीठ मिळाले आहे. हा नवीन उपक्रम सर्व स्तरांतील उद्योजकांचा गौरव करून त्या वारशाला पुढे नेतो, ज्यांनी वर्षानुवर्षे वास्तविक समस्या सोडवण्यात, आपल्या ग्राहकांना समजून घेण्यात आणि अगदी शून्यातून व्यवसाय उभा करण्यात अथक मेहनत घेतली आहे.

शार्क अशा व्यक्तींच्या शोधात आहेत

द स्क्रिप्ट रूमद्वारे संकल्पित आणि निर्मित करण्यात आलेली #DontBeATota मोहीम स्पष्टता, दृढ विश्वास आणि ठोस पाया असलेल्या संस्थापकांना पुढे येण्याचे आवाहन करते. मग ते पहिल्यांदाच उद्योजक बनलेले असोत किंवा अनुभवी व्यावसायिक असोत, शार्क अशा व्यक्तींच्या शोधात आहेत, ज्यांना आपला व्यवसाय सखोलपणे माहित आहे, ज्यांची स्वतःची एक गाथा आहे आणि ज्यांच्यामध्ये सातत्याने पुढे जाण्याची जिद्द आहे.

याच विचारातून मोहीम आकारली गेली

अमन गुप्‍ता, boAt चे सह-संस्थापक आणि ऑफ/बीटचे (OFF/BEAT) संस्थापक  यांनी  स्पष्ट केलं की, “स्टार्टअप बझवर्ड्स पुन्हा-पुन्हा बोलून व्यवसाय उभा राहिला असता, तर आपण सर्वांनी पोपटांमध्ये गुंतवणूक केली असती. याच विचारातून ही मोहीम आकाराला आली आहे. गेल्या काही वर्षांत शार्क टँक इंडियाने उद्योजकतेला मुख्य प्रवाहातील संभाषणांचा भाग बनवण्यास मदत केली आहे आणि या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे. पण, कंपनी उभी करणे म्हणजे केवळ उद्योजकासारखे बोलणे कधीच नव्हते, तर वास्तविक समस्या सोडवणे, तुमचा व्यवसाय सखोलपणे समजून घेणे आणि दररोज व्यवसाय पुढे नेत राहण्याची जिद्द दाखवणे यांबद्दल आहे. सीझन ६ मध्ये आम्ही अगदी अशाच प्रकारच्या संस्थापकांना भेटण्यास उत्सुक आहोत.”

शार्क टँक इंडिया सीझन ६ साठी नोंदणी सध्या सोनी लिव्हवर सुरू आहे. प्रबळ व्यवसाय, दृढ विश्वास आणि आपण कोणता व्यवसाय उभारत आहोत याची स्पष्ट समज असलेले संस्थापक शार्कसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळवण्यासाठी आताच नोंदणी करू शकतात. शार्क टँक इंडिया सीझन ६ लाहोरी जिरा आणि लॉरियल पॅरिस यांच्याद्वारे सह-प्रायोजित आहे, तर व्हाईट गोल्ड आणि लाल स्वीट्स भागीदार आहेत.

Rupee vs Dollar: रुपया पुन्हा घसरला, डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर! पण ही अवस्था का?

Web Title: Shark tank india season 6 launches dont be a tota campaign for startup founders marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Shark Tank

संबंधित बातम्या

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
1

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!
2

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर
3

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकाराची मल्याळम इंडस्ट्रीत एन्ट्री! थेट ममुट्टींसोबत करणार स्क्रीन शेअर

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य
4

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.