Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

60000 कोटी स्वाहा… फक्त 5 दिवसांत कोटींचं नुकसान, ‘या’ कंपनीच्या गुंतवणूकदारांना तगडा झटका

आठवड्यात Share Market मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी दबावाखाली राहिले. सेन्सेक्समधील पहिल्या १० कंपन्यांपैकी सहा मार्केट वॅल्यूमध्ये मोठी घसरण झाली आणि देशातील सर्वात मोठी मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांना सर्वात मोठे नुकसान भोगावं लागलं.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 07, 2026 | 06:20 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

गेल्या आठवड्यात Share Market मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी दबावाखाली राहिले. सेन्सेक्समधील पहिल्या १० कंपन्यांपैकी सहा मार्केट वॅल्यूमध्ये मोठी घसरण झाली आणि देशातील सर्वात मोठी मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांना सर्वात मोठे नुकसान भोगावं लागलं. या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना केवळ पाच दिवसांत ४०,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले, तर टाटा समूहाच्या TCS नेही गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलं. त्याच बरोबर आणखी 7 कंपन्यादेखील तोट्यात दिसल्या नेमका कसा राहिला परफॉर्मन्स समजून घेऊयात.

‘अर्धा हिस्सा तर भारताचाच…’, तेल व्यापारावर रशियन CEO यांचं मोठं विधान

सात कंपन्यांना १.२५ लाख कोटी रुपयांचे नुकसान

गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील मंदीच्या काळात, बीएसईचा ३०-शेअर सेन्सेक्स निर्देशांक ५३२ अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी निर्देशांक १८१ अंकांनी खाली आला. दरम्यान, सेन्सेक्समधील पहिल्या १० कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात एकत्रितपणे १.२५ लाख कोटी रुपयांची घट झाली. रिलायन्स आणि टीसीएससह सात कंपन्यांना तोटा झाला असला तरी, घसरत्या बाजारातही तीन कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला.

रिलायन्स- TCS चं मोठं नुकसान

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य १७.४७ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले आणि गुंतवणूकदारांना अवघ्या पाच दिवसांत ३९,७१८ कोटी रुपयांचे नुकसान झाले. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा समूहाची टीसीएस दुसऱ्या क्रमांकावर होती, जिचे बाजारमूल्य २०,१३५ कोटी रुपयांनी घसरून ७.९५ लाख कोटी रुपयांवर आले. केवळ या दोन कंपन्यांना पाच दिवसांत सुमारे ६०,००० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले.

या कंपन्यांनाही मोठे नुकसान

केवळ रिलायन्स आणि टीसीएसच नव्हे, तर गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील इतर मोठ्या कंपन्यांनाही नुकसान झाले.

कंपनी नुकसान मार्केट कॅपिटल
भारती एअरटेल १८,७३६ कोटी १०.९६ लाख कोटी रुपये
एल अँड टी १६,८८० कोटी ५.४४ लाख कोटी रुपये
LIC १४,६११ कोटी ५.०६ लाख कोटी रुपये
बजाज फायनान्स ९,६८१ कोटी ५.५४ लाख कोटी रुपये
HUL ५,९०९ कोटी ४.९८ लाख कोटी रुपये

SBI सह या कंपन्यांची बल्ले – बल्ले

गुंतवणूकदारांना फायदा मिळवून देणाऱ्या तीन सेन्सेक्स कंपन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, एसबीआय, यादीत अव्वल स्थानी आहे. तिचे बाजार भांडवल ₹१२,६९२ कोटींनी वाढून ₹९.०२ लाख कोटी झाले. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल ₹४,४८५ कोटींनी वाढून ₹९.०५ लाख कोटी झाले, तर एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल ₹४,१०१ कोटींनी वाढून ₹११.५१ लाख कोटी झाले.

बाजार भांडवलानुसार सर्वात मोठ्या कंपन्यांच्या क्रमवारीकडे पाहिल्यास, घसरण होऊनही मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल स्थानी असून तिचे वर्चस्व कायम आहे. त्यानंतर अनुक्रमे एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, टीसीएस, बजाज फायनान्स, एलटी, एलआयसी आणि एचयूएल यांचा क्रमांक लागतो.

LPG Gas घेऊन येणारी जहाजं अडकली होर्मुझच्या सामुद्रधुनीत? आता भारतात गॅस पुरवठा खंडित होणार? काय आहे सत्य परिस्थिती?

Web Title: Sixty thousand crore investors wealth wiped out in five days see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Business News
  • LIC
  • Marathi News
  • share market
  • TCS
  • TCS Company

संबंधित बातम्या

असं का? भारतात धक्का देऊन UK मध्ये बंपर Hiring! Layoff नंतर TCS चा मेगाप्लॅन, 5000 नव्या नोकऱ्या देणार
1

असं का? भारतात धक्का देऊन UK मध्ये बंपर Hiring! Layoff नंतर TCS चा मेगाप्लॅन, 5000 नव्या नोकऱ्या देणार

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली
2

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली

Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता
3

Raigad News: तुकडेबंदीच्या कचाट्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा! जुन्या व्यवहारांना आता मिळणार कायदेशीर मान्यता

Chandrapur News: सावलीच्या दहीहंडीला राजकीय रंग! धानोरकरांच्या एका निर्णयाने चर्चांना उधाण; नेमकं काय घडलं?
4

Chandrapur News: सावलीच्या दहीहंडीला राजकीय रंग! धानोरकरांच्या एका निर्णयाने चर्चांना उधाण; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.