Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget Planning : खर्चावर नियंत्रण ठेवा, भविष्य सुरक्षित करा, होम क्रेडिट इंडियाने दिल्या आर्थिक शिस्तीच्या टिप्स

बाजारातील चढ-उतार, महागाई आणि जागतिक अनिश्चिततेच्या काळात आर्थिक स्थैर्य टिकवणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. मात्र, संपत्ती निर्माण करण्यातील सर्वात मोठा अडथळा अनेकदा आपल्या स्वतःच्या खर्चाच्या सवयी ठरतात. ‘स्पेंड-ओ-मीटर’ या संकल्पनेद्वारे उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल कसा राखावा, तसेच आर्थिक नियंत्रण पुन्हा कसे मिळवावे....

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 02, 2026 | 05:10 PM
तुमचा ‘स्पेंड-ओ-मीटर’ बिघडतोय का? वाढत्या महागाईत पैशांचे नियोजन महत्त्वाचे; जाणून घ्या खर्चाच्या सवयींचा परिणाम

तुमचा ‘स्पेंड-ओ-मीटर’ बिघडतोय का? वाढत्या महागाईत पैशांचे नियोजन महत्त्वाचे; जाणून घ्या खर्चाच्या सवयींचा परिणाम

Follow Us
Follow Us:

बाजारपेठेतील चढ-उतार, वाढती महागाई आणि भू-राजकीय अनिश्चिततेच्या या युगात आर्थिक स्थिरता आता फक्त एक पर्याय उरलेली नाही, तर काळाची गरज बनली आहे. तरीही, दीर्घकालीन संपत्तीसाठी सर्वात मोठी जोखीम बाहेरून क्वचितच येते. ही जोखीम आपल्या दैनंदिन खर्चाच्या वर्तणुकीत असते. तुमच्या आर्थिक स्थितीचा स्पेंड-ओ-मीटर प्रमाणे विचार करा. हे एक मापक आहे, जे तुमचे उत्पन्न किती वेगाने खर्च होत आहे याचा मागोवा घेते. यावर नियंत्रण ठेवले नाही, तर तुम्ही निर्माण करत असलेला आर्थिक पाया हे मीटर हळूहळू कमकुवत करत जाते. येथे अशा काही गोष्टी दिल्या आहेत ज्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि तुम्ही तुमचे नियंत्रण पुन्हा कसे मिळवू शकता हे देखील सांगितले आहे.

१. विचार न करता खर्च करणे: लहान खर्च, मोठे नुकसान

वन-क्लिक चेकआउट, सेम-डे डिलिव्हरी आणि अल्गोरिदमवर आधारित जाहिरातींमुळे खर्च करणे अत्यंत सोपे झाले आहे. अचानक खरेदी केलेला गॅझेट, रात्री उशिरा दिलेली जेवणाची ऑर्डर, किंवा ‘चुकवूच नये’ असा फ्लॅश सेल या सर्व गोष्टी त्या क्षणी किरकोळ वाटतात. पण, हे छोटे आणि वारंवार होणारे खर्च काळाच्या ओघात एकत्र येऊन तुमच्या बचतीला मोठा फटका बसवतात.

Shriram Finance: ‘श्रीराम फायनान्स’ आता ‘पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन’चे मुख्य प्रायोजक; तळागाळातील खेळाडूंना मिळणार बळ

२. भावनिक खर्च: आजचा आनंद, उद्याची तडजोड

रिटेल थेरपी (खरेदी करून मन हलके करणे) ही कधीतरी करायची गोष्ट न राहता आता सवय बनली आहे. ताणतणाव, कंटाळा किंवा एखादा वाईट दिवस आता काही सेकंदांत खरेदीत बदलू शकतो. यातून मिळणारा तात्पुरता आराम खरा असला, तरी त्याचा दीर्घकालीन खर्चही तितकाच वास्तविक असतो. सततच्या भावनिक खर्चामुळे आर्थिक स्थिरता हळूहळू कमकुवत होत जाते.

3. जीवनशैलीतील महागाई: संपत्तीचा छुपा शत्रू

पगारवाढ किंवा उत्पन्न वाढल्यानंतर तुमची बचत वाढायला हवी. पण, बऱ्याचदा यामुळे तुमचे खर्च अधिक वेगाने वाढतात. उत्पन्न वाढले की अपार्टमेंट, कार किंवा कपडे अपग्रेड करण्याचा दबावही वाढतो. जीवनशैलीत हळूहळू होणारा हा बदल तुम्हाला अशा चक्रात अडकवतो, जिथे तुम्ही कमावता तर जास्त पण कधीही लक्षणीय प्रगती करू शकत नाही.

तुमची आर्थिक स्थिती सुधारणाऱ्या ३ सवयी

१. २० टक्‍के नियम: स्वतःच्या भविष्यासाठी आधी तरतूद करा

तुमच्या उत्पन्नातील एकही रुपया खर्च करण्यापूर्वी किमान २० टक्‍के रक्कम बचतीसाठी बाजूला ठेवा. ही रक्कम ऑटोमॅटिकली ट्रान्सफर (बचत खात्यात जमा) केल्याने आधी खर्च करून नंतर उरलेली रक्कम वाचवण्याच्या मोहापासून तुम्ही दूर राहता. काळाच्या ओघात, या शिस्‍तबद्ध नियोजनामुळे मोठी बचत होण्‍यास मदत होते आणि जीवनशैलीतील वाढत्या खर्चाविरुद्ध नैसर्गिक कवच म्हणून काम करते.

२. ४८ तासांचा विराम: खरेदी करण्यापूर्वी वेळेचा विचार करा

कोणतीही अत्यावश्यक नसलेली वस्तू खरेदी करण्यापूर्वी स्वतःला ४८ तासांचा अवधी द्या. बऱ्याचदा, या कालावधीत ती वस्तू घेण्याची तीव्र इच्छा कमी होते. हा साधा नियम इच्छा आणि कृती यामध्ये अंतर निर्माण करतो, ज्यामुळे घाईघाईत होणारा खर्च एका समजूतदार निवडीमध्ये बदलतो.

३. मासिक पुनरावलोकन: तुमचे पैसे कुठे जातात ते जाणून घ्या

दरमहा ३० मिनिटे काढून तुमच्या खर्चाचा आढावा घ्या. तुमच्या स्पेंड-ओ-मीटरकडे फक्त रेकॉर्ड म्हणून न पाहता डॅशबोर्ड म्हणून पहा. खर्चाचे स्वरूप वेळीच ओळखून, जसे तुम्ही विसरलेले एखादे सबस्क्रिप्शन किंवा अचानक वाढणारा एखादा खर्च, तुम्ही या छोट्या सवयींचे मोठ्या नुकसानीत रूपांतर होण्यापूर्वी स्वतःला सावरू शकता.

Repo Rate : कर्ज महागणार का? RBI च्या पतधोरणाआधी ग्राहक आणि बाजारपेठेची धाकधूक

महत्त्वपूर्ण विचार

आर्थिक सुरक्षेमधील अडथळा हा उत्पन्नाची कमतरता नसून उत्पन्न ज्या वेगाने नाहीसे होते तो वेग आहे. आर्थिक स्वातंत्र्य हे जागरूक खर्च आणि सातत्यपूर्ण बचतीतून निर्माण होते, काहीही न बदलता फक्त जास्त कमावण्याने नाही. तुमच्या सवयी बदला, तुमचे मीटर रीसेट करा आणि ज्या भविष्यासाठी तुम्ही मेहनत करत आहात, ते अधिक सहज साध्य होईल.

Web Title: Spend o meter financial stability smart money management tips marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Budget

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.