
SPJIMR FT MiM Ranking
एसपीजेआयएमआरने आता सलग सातव्या वर्षी जगातील सर्वोच्च ५० बिझनेस स्कूल्समध्ये आपले स्थान मिळवले आहे. २०२६ च्या रँकिंगमध्ये, एसपीजेआयएमआर ही आयआयएम बेंगळुरूपाठोपाठ आणि आयआयएम अहमदाबादच्या पुढे असलेली भारतातील दुसरी सर्वोच्च क्रमांकाची बिझनेस स्कूल ठरली आहे. २०२५ मधील चार संस्थांच्या तुलनेत या वर्षी भारतातील पाच बिझनेस स्कूल्स जागतिक स्तरावरील अव्वल ५० संस्थांमध्ये समाविष्ट आहेत.
एसपीजेआयएमआरच्या जागतिक आणि भारतातील स्थानामधील या सुधारणेबद्दल मत व्यक्त करत एसपीजेआयएमआरचे डीन वरुण नागराज म्हणाले, “या वर्षीचे रँकिंग आमच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या मानकांमध्ये झालेली सातत्यपूर्ण प्रगती दर्शवते: करिअरचे परिणाम, माजी विद्यार्थ्यांचा (अॅल्युम्नी) सहभाग आणि आमचा प्रोग्राम (अभ्यासक्रम) प्रदान करत असलेले मूल्य. प्लेसमेंट सपोर्टपासून ते प्रोग्राममध्ये आम्ही निर्माण करत असलेल्या शिक्षणाच्या सखोलतेपर्यंत, विद्यार्थी अनुभवाच्या प्रत्येक पैलूला प्रबळ करण्यावर आमचा भर कायम आहे.”
एसपीजेआयएमआरने एफटी एमआयएम रँकिंगच्या चार श्रेणींमध्ये भारतातील आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे, तसेच प्रत्येक श्रेणीत आपल्या जागतिक स्थानात सुधारणा केली आहे:
● करिअर सर्व्हिस – भारतात #१ (जागतिक रँक: #२, पूर्वीच्या #३ वरून सुधारणा)
विद्यार्थ्यांच्या भरतीला (रिक्रूटमेंट) पाठबळ देण्यासाठी करिअर सर्व्हिसच्या प्रभावीतेचे मूल्यांकन, माजी विद्यार्थ्यांच्या पुनरावलोकनांवर आधारित.
● अॅल्युम्नी नेटवर्क – भारतात #१ (जागतिक रँक: #६, पूर्वीच्या #११ वरून सुधारणा)
माजी विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाच्या आधारे अॅल्युम्नी नेटवर्क करिअरच्या संधी, स्टार्टअप्स, संकल्पनांची देवाणघेवाण, भरती आणि इव्हेण्टची माहिती प्रभावीपणे पाठबळ देते याचे मूल्यांकन करते.
● व्हॅल्यू फॉर मनी – भारतात #१ (जागतिक रँक: #५०, पूर्वीच्या #५६ वरून सुधारणा)
माजी विद्यार्थ्यांचे सध्याचे वेतन, ट्यूशन फी आणि संबंधित प्रोग्राम खर्चाचा वापर करून गणना केली जाते.
● ईएसजी अँड नेट झिरो टीचिंग – भारतात #१ (जागतिक रँक: #२८, पूर्वीच्या #६३ वरून सुधारणा)
पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ईएसजी) मुद्दे व हवामान उपायांवर केंद्रित असलेल्या अध्यापनाचे प्रमाण, तसेच या घटकांचे माजी विद्यार्थ्यांनी केलेले मूल्यांकन मोजते.
२०२६ चे रँकिंग विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाच्या अनेक पैलूंमधील एसपीजेआयएमआरची कामगिरी देखील दर्शवते, ज्यामध्ये करिअरची प्रगती, करिअर पाठबळ, माजी विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रोग्रामचे मूल्य आणि शाश्वततेवर केंद्रित शिक्षण यांचा समावेश आहे. संस्थेने १० पैकी ९.६ असा एकूण समाधान स्कोअर (ओव्हरऑल सॅटिस्फॅक्शन स्कोअर) नोंदवला आहे, जो प्रोग्रामच्या अनुभवाबद्दल विद्यार्थ्यांची प्रबळ भावना दर्शवतो.
एफटी एमआयएम जागतिक रँकिंग हे प्रामुख्याने मर्यादित कामाचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केलेल्या व्यवस्थापन प्रोग्राम्सचे मूल्यांकन करते. हे रँकिंग केवळ एएसीएसबी किंवा ईक्यूयूआयएसद्वारे मान्यताप्राप्त बिझनेस स्कूल्सचा विचार करते आणि अॅल्युम्नी करिअर प्रोग्रेस, अॅल्युम्नी नेटवर्क, स्कूल विविधता, आंतरराष्ट्रीय अनुभव, संशोधन, ईएसजी आणि नेट झिरो टीचिंग, तसेच करिअर सर्व्हिस यासह विविध निकषांवर कामगिरीचे मूल्यांकन करते.
२०२५ मधील ११ संस्थांच्या तुलनेत २०२६ मध्ये भारतातील १४ बिझनेस स्कूल्सचा एफटी एमआयएम जागतिक रँकिंगमध्ये समावेश आहे. ही वाढ आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात भारतातील बिझनेस स्कूल्सचे वाढते प्रतिनिधित्व दर्शवते. पूर्ण रँकिंग आणि पद्धतीसाठी, फायनान्शियल टाइम्स मास्टर्स इन मॅनेजमेंट रँकिंगला (Financial Times Masters in Management ranking) भेट द्या. एसपीजेआयएमआरकडून अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी, एसपीजेआयएमआर न्यूजरूमला (SPJIMR Newsroom) भेट द्या.