Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आजच्या ट्रेडिंगसाठी तयार राहा! बाजारात तेजीचे संकेत, तज्ज्ञांच्या रडारवर हे स्टॉक्स
Todays Gold-Silver Price: सोन्याची चमक फिकी, चांदीही झाली स्वस्त! दागिने खरेदीपूर्वी आजचे दर वाचाच
भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणारे गुंतवणूकदार आज एचसीएल टेक्नॉलॉजीज, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेट मॅनेजमेंट कंपनी, आरबीएल बँक, आनंद राठी वेल्थ, पूनावाला फिनकॉर्प, डीमार्ट, बाजार स्टाईल, पॉवर ग्रिड, कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनी, कॅनरा एचएसबीसी जीवन विमा, वॉटवेज लीजर टुरिझम, पीटीसी इंडस्ट्री, या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. (फोटो सौजन्य: istock)
चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आरबीएल बँक, बिरलासॉफ्ट, गो डिजिट, एलआयसी आणि नायका या पाच ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारस केली आहे. तसेच, बागडिया यांनी 100 रुपयांपेक्षा कमी किंमत खरेदी करण्यासाठी एनटीपीसी ग्रीन, जयस्वाल नेको इंडस्ट्रीज, सॅजिलिटी , एसबीएफसी फायनान्स, साऊथ इंडियन बँक या 5 शेअर्सची शिफारस केली आहे.
आनंद राठीचे गणेश डोंगरे यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी भारती एअरटेल, आयटीसी आणि पीएनबी या तीन शेअर्सची निवड केली आहे. तर बाजारातील इतर काही तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना डाबर, लेन्सकार्ट सोल्युशन्स, साउथ इंडियन बँक, रॅडिको खैतान आणि आरबीएल बँक या स्टॉक्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. चॉईस ब्रोकिंगचे विश्लेषक सचिन गुप्ता यांनी देखील आज गुंतवणूकदारांसाठी काही शेअर्सची निवड केली आहे. ज्यामध्ये ग्लेनमार्क फार्मा, गो डिजिट आणि करूर वैश्य बँक यांचा समावेश आहे.






