Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Price Drop : साखर स्वस्त होणार! एका झटक्यात 18 टक्क्यांनी घसरले भाव; पण कसं? जाणून घ्या कारण

Sugar Price Drop : महागाईच्या काळात सर्वसामान्य गृहिणी आणि ग्राहकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. साखरेच्या दरात एका झटक्यात १८ टक्क्यांपर्यंत मोठी घसरण झाली आहे. बाजारातील वाढता पुरवठा आणि सरकारच्या धोरणांमुळे साखरेच्या किमती कमी झाल्या आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 25, 2026 | 07:34 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • साखर स्वस्त होणार!
  • एका झटक्यात 18 टक्क्यांनी घसरले भाव
  • पण कसं? जाणून घ्या कारण
Sugar Price Drop : सर्वसामान्यांना सुखावणारी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपासून भाव घात असलेले साखरेचे दर आता उतरणार आहेत. त्यामुळे आता महागाईच्या काळात सुखद धक्का मिळाला आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, सरकारने साखरेच्या आयातीला परवानगी दिल्यानंतर आणि साठेबाजी व सट्टेबाजीवर कारवाई केल्यानंतर हे परिणाम दिसून आले आहेत. नेमके साखरेचे दर किती घसरलेत आणि काय तरतूद करण्यात आली आहे? ( Sugar Price Drop ) 

ऑफिस, रिटेल, F&B अन् अर्बन लॉजिस्टिक्स एकाच छताखाली; ठाण्यात उभारतेय भारतातील पहिले एकात्मिक शहरी व्यावसायिक केंद्र

साखरेचा कारखानदारी दर १८ टक्क्यांनी घसरून ५५ रुपये प्रति किलो झाला आहे. गेल्या आठवड्यात हा दर विक्रमी ६७ रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की, साखरेच्या दरातील अलीकडील वाढ ही बाजारातील साखरेच्या तुटवड्यामुळे झालेली नाही. सरकारने स्पष्ट केलं की देशात पुरेसा साठ उपलब्ध आहे.

सट्टेबाजांवर नजर

गेल्या आठवड्यात, सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली. घाऊक खरेदीदारांसाठी साठवणुकीची मर्यादाही कमी करण्यात आली आणि साठेबाजी व सट्टेबाजीवर लक्ष ठेवण्यासाठी तपासणी तीव्र करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले. अन्न सचिवांच्या मते, काही कारखान्यांनी दर वाढवले ​​होते, परंतु आता कारखान्यातील दर वेगाने कमी होत आहेत. साठेबाजीला आळा घालण्यासाठी देशभरात भरारी पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजच्या मते, सध्या कोणत्याही राज्यात साखरेचा कारखान्यातील दर ५५ रुपये प्रति किलोपेक्षा जास्त नाही आणि येत्या काही दिवसांत त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

हा दिलासा घरापर्यंत कधी पोहोचणार?

कारखान्यातील दरातील घसरणीचा पूर्ण फायदा अद्याप सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचलेला नाही. २४ ऑगस्ट रोजी, देशात साखरेचा सरासरी घाऊक दर ५८.२९ रुपये प्रति किलो आणि किरकोळ दर ६३.०५ रुपये प्रति किलो होता. याचा अर्थ असा की, कारखान्याच्या पातळीवर साखर स्वस्त होऊ लागली आहे, परंतु याचा परिणाम दुकानांवर होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. साधारणपणे, कारखान्यातील आणि किरकोळ दरांमध्ये प्रति किलो सुमारे ७-८ रुपयांचा फरक असतो.

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?

Web Title: Sugar price drop by 18 percent big relief consumers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 07:34 PM

Topics:  

  • Government
  • Sugar Price

संबंधित बातम्या

Ola, Uber, Rapido चालकांनो सावधान! सरकारने दिली 9 महिन्यांची डेडलाईन; आता सर्व वाहने करावी लागणार इलेक्ट्रिक
1

Ola, Uber, Rapido चालकांनो सावधान! सरकारने दिली 9 महिन्यांची डेडलाईन; आता सर्व वाहने करावी लागणार इलेक्ट्रिक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
2

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.