Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Stocks Price : साखरेने खाल्ला भाव… बाजारात दर वाढताच शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ! शुगर शेअर्समध्ये तुफान तेजी

Sugar Stocks Price : बाजारात साखरेच्या किमती वाढताच शेअर बाजारात शुगर कंपन्यांच्या शेअर्समध्येजोरदार तेजी पाहायला मिळत आहे. साखर महाग झाल्याचा थेट फायदा कंपन्यांच्या मार्जिनला होणार असल्याच्या अपेक्षेने प्रमुख शुगर शेअर्स ११ टक्क्यांपर्यंत सुसाट धावले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 24, 2026 | 02:30 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • साखरेने खाल्ला भाव…
  • बाजारात दर वाढताच शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ!
  • शुगर शेअर्समध्ये तुफान तेजी
Sugar Stocks Price : सणासुदीच्या काळात महागाईने डोकं वर केलं आहे. या महागाईच्या झळा सामान्यांना बसत आहेत. त्यामुळे आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर सध्या मार्केटमध्ये बरीच भाव खात आहे. त्यामुळे सामान्यांच्या घरातील गोडवा महागला आहे. अशी परिस्थिती असली तरीही साखरेने शेअर मार्केटमध्ये देखील चांगलीच धुमाकुळ घातली आहे. साखरेच्या किमती वाढल्यामुळे देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही भारतीय शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही जोरदार तेजी दिसून येत आहे. कंपन्यांचे शेअर्स प्रचंड नफा मिळवून गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. असे कोणते शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना बंपर नफा कमवून दिला आहे? ( Sugar Stocks Price ) 

Bank Strike Alert : बँकेची कामं अडकणार… कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत, कधीपर्यंत बंद राहणार सर्व्हिस?

साखरेची दर वाढ आणि राजकीय गदारोळ

साखरेच्या दरामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. हा सगळा राजकीय गोंधळ सुरु असताना विरोधी पक्ष सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. गंभीर आरोप केले जात आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरवाढीचा मुद्दा कडाडला आहे. इथेनॉलला या सगळ्यासाठी जबाबदार ठरवलं जात आहे. निर्मितीसाठी उसाचा वापर वाढल्यामुळे देशातील साखरेचा पुरवठा कमी होत आहे, ज्यामुळे दरात मोठी वाढ होत आहे. असा दावा विरोधी पक्ष करत आहेत. सरकार हे आरोप फेटाळून लावत देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही आणि या दरवाढीत इथेनॉलचा काहीही संबंध नाही असं स्पष्ट केलं.

शुगर मिल्सचे शेअर्समध्ये तेजी

साखरेच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर, साखर उत्पादक कंपनी बलरामपूर शुगर मिल्सच्या शेअर्स सुसाट झाले आहेत. बलरामपूर चिनी मिल्स शेअर प्राईस ही केवळ पाच ट्रेडिंग दिवसांत जवळपास ११% ची वाढला आहे. सोमवारी, हा शेअर ₹७२८.९० वर होता. दुसरीकडे, उत्तम शुगर मिल्सचे शेअर्स सोमवारी उघडताच जवळपास १०% नी वाढले आणि तर काही वेळापूर्वी तो ₹३५०.७१ वर होते, ज्यात ८.४८% ची वाढ दिसून आली आहे. त्यामुळे बाजाराभावासोबत शेअर्समध्ये देखील सुसाट वाढ दिसून आली आहे.

धामपूर शुगर कंपनीचे शेअर्स

साखर कंपन्यांच्या शेअर्सच्या यादीत धामपूर शुगर मिल्सचं नाव घ्यायलाच हवं. धामपूर शुगर मिल्सच्या शेअरच्या किमतीत अवघ्या पाच दिवसांत १२% वाढ झाली आहे. सोमवारी ट्रेडिंग सुरू होताच त्यात ६% पेक्षा जास्त वाढ होऊन तो ₹१९९.९२ झाला. हा आकड्यासह तो या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या एका महिन्यात, या साखर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अंदाजे ३८% चा दमदार रिटर्न दिला आहे.

हा स्टॉक बनला रॉकेट

या यादीत पहिल्या नंबरचं स्थान मिळवलं आहे ते म्हणजे बजाज हिंदुस्तान शुगर लिमिटेडच्या शेअरने. या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी, सोमवारी, शेअर उघडताच जवळपास १२% नी वाढून गुंतवणूकदारांना तगडा नफा मिळवून दिला आहे. पाच ट्रेडिंग दिवसांत, शेअरने ४०% ची वाढ नोंदवत आहे.

या शेअर्समध्ये दमदार तेजी

या शेअर्स व्यतिरिक्त इतर शेअर्सही असे आहेत ज्यामध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. या मध्ये डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीजच्या शेअरमध्येही जोरदार तेजी दिसून येत आहे. हा शेअर सोमवारी ५२० रुपयांवर पोहोचला आणि गेल्या पाच दिवसांत त्यात सुमारे १०% वाढ झाली आहे. श्री रेणुका शुगरच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली असून, तो सुमारे ९% ने वाढून २७.६८ रुपयांवर पोहोचला आहे.

त्यामुळे बाजारातील साखरेचे भाव पाहता शेअर मार्केटमध्ये देखील साखरेचे शेअर्स असलेल्या कंपन्यांनी चांगलाच भाव खाल्ला आहे आणि तगडा नफा मिळवला आहे.

(टीप: शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या बाजार तज्ञाचा सल्ला घ्या.)

Foreign Direct Investment : सरकारचा मास्टस्ट्रोक! भारतात 4895 कोटींची परदेशी गुंतवणूक; FDI नियमांमधील बदलामुळे फायदा?

Web Title: Sugar stocks price shares jump 11 percent after rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • share market
  • Sugar Price

संबंधित बातम्या

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार आजचा शेअर बाजार! ‘हे’ स्टॉक्स देऊ शकतात दमदार परतावा, वाचा संपूर्ण यादी
1

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार आजचा शेअर बाजार! ‘हे’ स्टॉक्स देऊ शकतात दमदार परतावा, वाचा संपूर्ण यादी

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?
2

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?

ऐन सणासुदीत साखरेला दरवाढीचा झटका, कृषीमंत्री भरणे म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच…’
3

ऐन सणासुदीत साखरेला दरवाढीचा झटका, कृषीमंत्री भरणे म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच…’

सणासुदीत साखरेचा गोडवा झाला कमी! ग्राहकांच्या बजेटवर वाढत्या दराचा भार; दर आणखी वाढण्याची शक्यता
4

सणासुदीत साखरेचा गोडवा झाला कमी! ग्राहकांच्या बजेटवर वाढत्या दराचा भार; दर आणखी वाढण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.