Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वदेस फाउंडेशन आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार; ग्रामीण आरोग्याला मिळणार बळ

स्वदेस फाउंडेशन आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यात ग्रामीण आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना त्याचा बराच फायदा होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 01, 2026 | 02:02 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

स्वदेस फाउंडेशनने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सेंटर फॉर हेल्थ अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी सोबत सामंजस्य करार केला आहे. या भागीदारीचा उद्देश महाराष्ट्रातील ग्रामीण भागात समुदाय आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी संयुक्त संशोधन, क्षमता विकास, डिजिटल आरोग्य आणि पुराव्यावर आधारित सार्वजनिक आरोग्य उपक्रमांना चालना देणे हा आहे.

LPG Price : अरे वा…! महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, ‘हे’ आहेत नवे दर

यासाठी ही भागीदारी कार्य करणार

स्वदेस फाउंडेशनचा ग्रामीण विकासातील व्यापक अनुभव आणि चक्रा-मुहसचे आरोग्य संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि डिजिटल आरोग्य क्षेत्रातील कौशल्य यांचा संगम घडवत, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारी समुदाय-केंद्रित आणि विस्तारक्षम आरोग्यसेवा मॉडेल विकसित करण्यासाठी ही भागीदारी कार्य करणार आहे. या सहकार्याअंतर्गत खालील बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे:

स्वदेसच्या ‘ड्रीम व्हिलेज’ मॉडेलमध्ये समावेश

स्वदेसच्या प्रशिक्षित समुदाय आरोग्य स्वयंसेवक (स्वदेस मित्र) मॉडेलच्या धर्तीवर समुदाय आरोग्य स्वयंसेवकांचे प्रशिक्षण आणि डिजिटल शिक्षण मंचांद्वारे क्षमता विकास. आधुनिक वैद्यकशास्त्र तसेच आयुष (AYUSH) क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहभागातून गाव आणि शाळांमधील आरोग्य शिबिरे अधिक प्रभावी करणे. ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी टेलिमेडिसिन आणि डिजिटल आरोग्य उपाययोजनांना प्रोत्साहन देणे. समुदायाच्या आरोग्य परिणामांमध्ये सुधारणा करण्यासाठी ‘आरोग्य ग्राम’ आणि ‘वेलनेस कुंभ’ संकल्पनांचा स्वदेसच्या ‘ड्रीम व्हिलेज’ मॉडेलमध्ये समावेश करणे.

यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या

सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेप आणि धोरणनिर्मितीसाठी संयुक्त संशोधन, शोधनिबंध आणि पुराव्यांची निर्मिती करणे.
या सामंजस्य करारावर वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे (MEDD) सचिव श्री. धीरज कुमार (IAS), विभागाच्या संयुक्त सचिव तथा हाफकिन संस्थेच्या संचालक सौ. सुवर्णा खरात, उपसचिव श्री. संदीप ढाकणे, तसेच स्वदेस फाउंडेशनच्या सह-संस्थापक झरीना स्क्रूवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, आरोग्य कार्यक्रम संचालक रंजीश कट्टडी आणि डॉ. सुरेंद्र यादव यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

आरोग्यसेवा मॉडेल विकसित करण्याची अपेक्षा

या भागीदारीबाबत बोलताना स्वदेस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सदस्य मंगेश वांगे म्हणाले,”स्वदेस फाउंडेशनमध्ये आम्ही असा विश्वास ठेवतो की ग्रामीण आरोग्यसेवेत शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी समुदायाचा विश्वास आणि तांत्रिक कौशल्य यांची सांगड घालणाऱ्या मजबूत भागीदारीची आवश्यकता असते. चक्रा-मुहससोबतचे हे सहकार्य आम्हाला अग्रभागी कार्यरत आरोग्य स्वयंसेवकांची क्षमता वाढविणे, डिजिटल नवोपक्रमांचा प्रभावी वापर करणे आणि आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पुरावे निर्माण करण्यास मदत करेल. या माध्यमातून ग्रामीण भारतात पुनरुत्पादित करता येतील अशी समुदाय-केंद्रित आणि विस्तारक्षम आरोग्यसेवा मॉडेल विकसित करण्याची आमची अपेक्षा आहे.

यावेळी ब्रिगेडियर डॉ. सुभोध मुलगुंद (निवृत्त), मुख्य प्रशासकीय अधिकारी, चक्रा-मुहस म्हणाले,”ही भागीदारी शैक्षणिक उत्कृष्टता आणि समुदायाभिमुख कृती यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. स्वदेस फाउंडेशनसोबतच्या सहकार्यामुळे संशोधन, डिजिटल आरोग्य नवोपक्रम आणि क्षमता विकास यांचे प्रत्यक्ष ग्रामीण आरोग्य सुधारण्यात रूपांतर करण्याची संधी मिळेल. तसेच भविष्यातील सार्वजनिक आरोग्य धोरणांना दिशा देणारे महत्त्वपूर्ण पुरावे निर्माण करण्यासही या सहकार्याची मदत होईल.

India-Japan Trade : डॉलरला बायबाय? आता थेट रुपया-येनमध्ये होणार व्यवहार? भारत-जपानचा नवा फॉर्म्युला

Web Title: Swades foundation muhs chakra mou rural healthcare digital health see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र आहात? नेमकी कशी होणार प्रक्रिया? कोणते निकष बदलला? सविस्तर जाणून घ्या
1

Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र आहात? नेमकी कशी होणार प्रक्रिया? कोणते निकष बदलला? सविस्तर जाणून घ्या

सरकारचा मोठा निर्णय, सुकन्या समृद्धी आणि PPF सह लहान बचत योजनांच्या व्याजदरांसंदर्भात उचललं ‘हे’ पाऊल
2

सरकारचा मोठा निर्णय, सुकन्या समृद्धी आणि PPF सह लहान बचत योजनांच्या व्याजदरांसंदर्भात उचललं ‘हे’ पाऊल

Petrol 2 Wheeler Ban : दिल्लीत पेट्रोल बाईक आणि स्कूटर बॅन; किती लोकांना बदलावं लागेल आपलं वाहन?
3

Petrol 2 Wheeler Ban : दिल्लीत पेट्रोल बाईक आणि स्कूटर बॅन; किती लोकांना बदलावं लागेल आपलं वाहन?

Market Crash Alert: शेअर बाजाराला मंदीचा फटका बसणार? तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता; पाहा काय आहेत संकेत?
4

Market Crash Alert: शेअर बाजाराला मंदीचा फटका बसणार? तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता; पाहा काय आहेत संकेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.