Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TATA Sons AGM Breaking : टाटा समूहाच्या इतिहासातील पहिलीच घटना! टाटा संसची बैठक अचानक रद्द; काय आहे यामागचे मुख्य कारण?

TATA Sons AGM Breaking : भारतीय उद्योग जगतातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित उद्योग समूह असलेल्या टाटा संसच्या १०० वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासात पहिल्यांदाच कंपनीची AGM स्थगित करण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे कॉर्पोरेट वर्तुळात आणि भागधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 18, 2026 | 04:05 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • टाटा समूहाच्या इतिहासातील पहिलीच घटना!
  • टाटा संसची बैठक अचानक रद्द
  • काय आहे यामागचे मुख्य कारण?
TATA Sons AGM Breaking Postponed : भारतातील उद्योग जगतातील सर्वात मोठी उद्योग समूह असलेला टाटा संसबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. टाटा संसच्या 100 वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा AGM स्थगित करण्यात आली आहे. नेमकं काय आहे यामागचं कारण? अचानक का घेतला हा निर्णय ? सविस्तर जाणून घेऊयात.

( TATA Sons AGM Breaking ) 

Top Stocks To Buy Now : ‘हे’ 3 तगडे शेअर्स… पुढच्या 3-4 आठवड्यांत देतील बँकपेक्षा डबल रिटर्न, तुमच्या लिस्टमध्ये आहेत का?

टाटा संसची एनुअल जनरल मीटिंग यानी AGM वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवारी पुढे ढकलण्यात आली आहे. एजीएम पुढे ढकलण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आवश्यक संख्येने सदस्य उपस्थित नसल्यामुळे एजीएम पुढे ढकलण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या १०० वर्षांत टाटा सन्सने एजीएम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ही एजीएम दुपारी २:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि दृकश्राव्य माध्यमांद्वारे आयोजित केली जाणार होती, परंतु  पर्याप्त कोरम नसल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. सूत्रांनुसार, सर रतन टाटा ट्रस्ट (SRTT)  आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नामनिर्देशित केल्या जाणाऱ्या प्रतिनिधीसंदर्भात असलेल्या नियामक निर्बंधांमुळे ही अडचण निर्माण झाली.

कशामुळे कोरमवर परिणाम?

महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी जारी केलेल्या नियामक निर्बंधांमुळे, SRTT सध्या संयुक्त प्रतिनिधीची नियुक्ती करू शकत नाही. टाटा सन्सच्या नियमावलीनुसार, वैध गणपूर्तीसाठी संबंधित संयुक्त नामनिर्देशित प्रतिनिधीसह किमान पाच सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते. त्यामुळे, प्रतिनिधीच्या अनुपस्थितीमुळे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या गणपूर्तीवर परिणाम झाला.

AGM ची स्थगिती दुर्मिळ घटना

महत्त्वाची गोष्ट म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द होणे ही एक दुर्मिळ घटना आहे, आणि कदाचित टाटा सन्सच्या १०० वर्षांहून अधिक काळाच्या कॉर्पोरेट इतिहासातील ही पहिलीच घटना असावी. भारतीय कंपनी कायद्यानुसार प्रत्येक आर्थिक वर्षानंतर एका विहित कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे, ती पूर्णपणे रद्द करण्याची कोणतीही तरतूद नाही. अपवादात्मक परिस्थितीत, एनसीएलटी (NCLT) सारख्या कायदेशीर न्यायाधिकरणाच्या आदेशाने ती केवळ पुढे ढकलली किंवा थांबवली जाऊ शकते.

कोणत्याही परिस्थिती झाली नव्हती स्थगित

हे उल्लेखनीय आहे की, १९१७ मध्ये स्थापित झालेल्या टाटा सन्सने आपल्या संपूर्ण इतिहासात कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि नियमित वार्षिक सभांचे काटेकोरपणे पालन केले आहे. सायरस मिस्त्री वादासारख्या मोठ्या विवादांच्या काळातही सभा आयोजित केल्या गेल्या, परंतु त्या कधीही रद्द केल्या गेल्या नाहीत. जर कायदेशीर किंवा अंतर्गत विवादांमुळे वार्षिक सर्वसाधारण सभा अधिकृतपणे रद्द केली गेली, तर भागधारकांचे हक्क आणि संचालक मंडळाच्या निर्णयांच्या संदर्भात समूहाच्या इतिहासातील ही एक अभूतपूर्व घटना मानली जाते.

Bank Of India NZ Mobile App : 80 व्या स्वातंत्र्यदिनी बँक ऑफ इंडियाचा ऑकलंडमध्ये धमाका! ‘BOINZ – Freedom’ मोबाईल बँकिंग ॲप लाँच

Web Title: Tata sons agm breaking postponed for first time in 100 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Noel Tata
  • Ratan Tata
  • Tata company
  • Tata Group
  • tata motor

संबंधित बातम्या

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
1

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा
2

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
3

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
4

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.