Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

असं का? भारतात धक्का देऊन UK मध्ये बंपर Hiring! Layoff नंतर TCS चा मेगाप्लॅन, 5000 नव्या नोकऱ्या देणार

TCS Hiring In UK : भारतीय आयटी क्षेत्रात Layoff ची भीती आणि नोकरकपातीचे ढग जमा झालेले असताना, देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS ने ब्रिटनमध्ये ५,००० नव्या नोकऱ्या देण्याची मोठी घोषणा केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 07, 2026 | 04:12 PM
TCS Hiring In UK

TCS Hiring In UK

Follow Us
Follow Us:
  • भारतात धक्का देऊन UK मध्ये बंपर Hiring!
  • Layoff नंतर TCS चा मेगाप्लॅन
  • 5000 नव्या नोकऱ्या देणार
TCS Hiring In UK : IT क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय आयटी क्षेत्रात Layoff ची भिती आणि नोकरकपातीचे ढग जमा झालेले असताना हा मोठा धक्का पाहायला मिळत आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी TCS नेही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली. या सगळ्यात लोकांच्या नोकऱ्या जाण्याचे कारण AI असल्याचे समोर आले होते. अशा परिस्थितीत, एक धक्कादायक मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक पाहता, कंपनी त्याच AI कामासाठी यूकेमध्ये भरती करणार आहे, ज्यामुळे टाटा कंपनीने आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. त्याच कंपनीने ब्रिटनमध्ये 5000 नव्या नोकऱ्या देण्याची मोठी घोषणा असल्याने प्रश्नच उभा राहिला आहे. ( TCS Hiring In UK ) 

ग्राहकांनो लक्ष द्या! 11 September ला Bank ची कामे अडकणार, कर्मचारी Strike वर; ‘या’ बँका राहणार बंद

TCS ने सोमवार, ७ सप्टेंबर रोजी लंडनमध्ये AI-आधारित क्रिएटिव्ह इंजिनिअरिंग स्टुडिओ सुरू करण्याची घोषणा केली. याअंतर्गत युनायटेड किंगडममध्ये ५,००० नोकऱ्या निर्माण करण्याची कंपनीची योजना असल्याच देखील स्पष्ट केलं.

नीतीश मित्तल काय म्हणाले?

ग्लोबल रिसर्च आणि कंसल्टिंग फर्म, एवरेस्ट ग्रुपचे पार्टनर नीतीश मित्तल म्हणाले, “लंडन स्टुडिओ हा युनायटेड किंगडम आणि आयर्लंडमधील TCS च्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा एक भाग आहे. यामध्ये पुढील तीन वर्षांत या प्रदेशात ५,००० नवीन नोकऱ्या निर्माण करण्याच्या वचनबद्धतेचा समावेश आहे.”

कंपनीच्या प्रतिभा धोरणातील बदलाचे प्रतीक

मित्तल म्हणाले की, TCS चा लंडन स्टुडिओ कंपनीच्या प्रतिभा धोरणातील बदलाचे प्रतीक आहे. AI ने उद्योगांच्या कार्यपद्धतीत आणि ग्राहकांच्या गरजांमध्ये परिवर्तन घडवले आहे. हा स्टुडिओ ग्राहकांना बदलांशी जुळवून घेण्यास आणि नवीन संधींचा फायदा घेण्यास मदत करण्यासाठी विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांना एकत्र आणतो. निवेदनानुसार, लंडन स्टुडिओ ४,५०० चौरस फूट क्षेत्रात पसरलेला आहे आणि ग्राहकांना AI-आधारित सर्जनशील अभियांत्रिकी क्षमतांचा वापर करता यावा, या उद्देशाने त्याची रचना करण्यात आली आहे.

दोन्ही देश कंपनीसाठी महत्त्वाच्या बाजारपेठा

‘TCS UK आणि आयर्लंडचे प्रमुख विनय सिंघवी म्हणाले की, दोन्ही देश कंपनीसाठी महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत आणि हा स्टुडिओ AI-आधारित सर्जनशील तंत्रज्ञानामध्ये नेतृत्व करण्याप्रती TCS ची वचनबद्धता दर्शवतो. सिंघवी यांनी यूकेच्या तंत्रज्ञान परिसंस्थेबद्दल विश्वासही व्यक्त केला.

कंपनीने २०२५ मध्ये न्यूयॉर्क स्टुडिओ सुरू केल्यानंतर हे पाऊल उचलले आहे आणि हे TCS च्या डिजिटल डिझाइन, मार्केटिंग आणि अनुभव-आधारित परिवर्तन शाखा असलेल्या TCS इंटरॅक्टिव्हचा विस्तार म्हणून काम करणार आहे.

या वर्षी TCS चे शेअर्स घसरले

TCS च्या या घोषणेनंतर, भारतीय शेअर बाजारात त्याचे शेअर्स १.७२% नी घसरले आहेत. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ३०% ची घसरण झाली आहे. सध्या, टीसीएसच्या शेअरची किंमत ₹२,२६५ आहे. कंपनीचे शेअर कॅपिटल ₹८,१९,४६१ कोटी आहे.

बल्ले बल्ले… NSE IPO चा बाजारात धुमाकूळ! ग्रे मार्केटमध्ये ₹300 चा प्रीमियम; सरकारी विमा कंपन्यांना जॅकपॉट

Web Title: Tcs to hire 5000 employees in uk for ai roles after layoffs in india marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • ai
  • TCS Company
  • TCS Jobs

संबंधित बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यापासून आता AI बेल्ट वाचवणार जीव! डॉ. पल्लवी नल्ले अन् टीमचा भारतीय पेटंट मंजूर
1

बिबट्याच्या हल्ल्यापासून आता AI बेल्ट वाचवणार जीव! डॉ. पल्लवी नल्ले अन् टीमचा भारतीय पेटंट मंजूर

New York Schools AI Ban: न्यूयार्क शाळांमध्ये जेनरेटिव्ह AI टूल्सवर बंदी का घालण्यात आली? जाणून घ्या
2

New York Schools AI Ban: न्यूयार्क शाळांमध्ये जेनरेटिव्ह AI टूल्सवर बंदी का घालण्यात आली? जाणून घ्या

Sundar Pichai : सुंदर पिचाई यांचा आयआयटी खरगपूर ते गुगलपर्यंतचा प्रवास वाचा एका क्लिकवर..
3

Sundar Pichai : सुंदर पिचाई यांचा आयआयटी खरगपूर ते गुगलपर्यंतचा प्रवास वाचा एका क्लिकवर..

AI study app: कोडिंग न येताही विद्यार्थिनीने बनवले AI स्टडी ॲप, अवघ्या ३ दिवसांत कमावले लाखो रुपये
4

AI study app: कोडिंग न येताही विद्यार्थिनीने बनवले AI स्टडी ॲप, अवघ्या ३ दिवसांत कमावले लाखो रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.