Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस

Nothing Smart Glasses: स्मार्टफोन आणि ऑडिओ उत्पादनांनंतर Nothing कंपनी स्मार्ट ग्लासेसच्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. टिपस्टर Roland Quandt यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी दोन प्रकारच्या स्मार्ट ग्लासेसवर काम करत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 15, 2026 | 11:36 AM
Nothing Smart Glasses: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Nothing Smart Glasses: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Nothing कंपनी दोन स्मार्ट ग्लासेस मॉडेल्सवर काम करत असल्याची चर्चा आहे.
  • पहिल्या मॉडेलमध्ये ऑडिओ, कॉलिंग आणि व्हॉइस असिस्टंटचा सपोर्ट असेल.
  • दुसऱ्या मॉडेलमध्ये कॅमेरा, ChatGPT आणि ट्रान्सलेशन फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
स्मार्टफोन नंतर आता Nothing कंपनी वेगळ्या वाटेवर जात आहे. नुकतेच कंपनीने दोन नवीन ब्लूटूथ स्पीकर लाँच केले होते. आणि आता एक मोठी बातमी समोर येत आहे. Nothing लवकरच स्मार्ट ग्लासेसच्या दुनियेत एंट्री करणार असल्याची चर्चा आहे. ही माहिती एका टिपस्टरने दिली आहे. Nothing Smart Glasses

UK ची ही कंपनी आता AI वर चालणारे स्मार्ट ग्लासेस बनवत असल्याचे बोलले जात आहे. दोन प्रकारचे ग्लासेस असतील असे सांगितले जात आहे.

दोन वेगळे मॉडेल येणार

टिपस्टर Roland Quandt यांनी Bluesky वर ही माहिती शेअर केली आहे. त्यांच्या मते Nothing दोन स्मार्ट ग्लासेसवर काम करत आहे. दोन्हीमध्ये वेगवेगळे फीचर्स असतील.

पहिला ग्लास फक्त ऑडिओसाठी असेल. म्हणजे चष्म्यातच हेडफोन बसवलेला असेल. यातून तुम्ही गाणी ऐकू शकता, ऑडिओ बुक ऐकू शकता, फोनवर बोलू शकता आणि फोनमधील व्हॉइस असिस्टंट पण वापरू शकता. एकदम साधा आणि सोपा वापर.

दुसरा ग्लास याच्यापेक्षा थोडा भारी असेल. यात वरचे सगळे फीचर्स असतीलच, पण सोबत कॅमेरा पण असेल. यात ChatGPT चे सपोर्ट आणि ट्रान्सलेशन फीचर पण मिळेल असे सांगितले जात आहे. याच अर्थ चष्मा घालून फोटो देखील काढता येईल. दरम्यान AI ला प्रश्न सुद्धा विचारु शकता. तसेच कोणत्याही भाषेमध्ये भाषांतर सुद्धा करता येईल.

लेन्स पण खास असणार

दोन्ही ग्लासेसमध्ये फोटोक्रोमिक लेन्स असणार आहे. ही लेन्स उन्हात गेल्यावर आपोआप काळी होते आणि घरात आल्यावर परत क्लिअर होते. Meta च्या Ray-Ban Meta ग्लासेसमध्ये असते तशीच ही टेक्नॉलॉजी असेल.अजून या ग्लासेसचा फोटो किंवा डिझाईन समोर आले नाहीये. किंमत किती असेल, बॅटरी किती चालेल आणि कधी लाँच होईल याबद्दल पण काही माहिती नाहीये.

Instagram वर Meta AI चा वापर करायचा आहे का? जाणून घ्या सोप्या टीप्स …

Nothing चा प्लॅन काय?

Nothing ने नुकतेच Nothing Headphone (1) Pro लाँच केले आहे. त्यामुळे हा ऑडिओ वाला ग्लास त्यांच्या हेडफोन लाईनला पूरक ठरू शकतो. तर कॅमेरा असलेला ग्लास जास्त पॉवरफुल असेल, कारण त्यात फोटो काढणे आणि AI फीचर्ससाठी वेगळे हार्डवेअर लागेल.

सध्या स्मार्ट ग्लासेसच्या मार्केटमध्ये Meta चे राज्य केले. काही दिवसांपूर्वी त्यांनी Ray-Ban Meta Gen 3 बाजारात आणले. त्यात 12 मेगापिक्सल कॅमेरा, 3K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि नवीन हार्डवेअर दिले आहे. ज्यामुळे फक्त ऑडिओ असलेला Ray-Ban Meta Audio ग्लास देण्यात आलं आहे.

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass

Nothing कशी वेगळी जागा

Meta शिवाय Samsung आणि Google पण Warby Parker आणि Gentle Monster सारख्या ब्रँड सोबत मिळून स्मार्ट चष्म्यावर काम करत आहेत. Apple पण स्मार्ट ग्लासेस बनवत असल्याची चर्चा आहे, पण अजून कन्फर्म नाही.आता या गर्दीत Nothing कशी वेगळी जागा बनवते हे पाहणे महत्वाचे ठरेल. Nothing ची डिझाईन नेहमीच वेगळी आणि ट्रान्सपरंट असते. त्यामुळे त्यांचे स्मार्ट ग्लासेस पण दिसायला हटके असतील अशी अपेक्षा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Nothing स्मार्ट ग्लासेस किती प्रकारांत येणार?

    Ans: ऑडिओ ग्लासेस आणि कॅमेरा असलेले AI ग्लासेस या दोन प्रकारांत येण्याची शक्यता

  • Que: Nothing स्मार्ट ग्लासेसमध्ये कोणते फीचर्स असतील?

    Ans: ऑडिओ, कॉलिंग, कॅमेरा, ChatGPT, भाषांतर आणि फोटोक्रोमिक लेन्स अशी फीचर्स

  • Que: Nothing स्मार्ट ग्लासेसची किंमत किती असेल?

    Ans: किंमत आणि लॉन्चची तारीख अद्याप कंपनीने सांगितली नाही.

Web Title: Nothing smart glasses chatgpt camera photochromic lenses rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • ai
  • chatgpt
  • Smart Glass
  • Tech News

संबंधित बातम्या

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?
1

AI in Education: एआय बंदूकसारखी… योग्य वापर तर फायदा, अन्यथा नुकसान! मुलांच्या अभ्यासात तंत्रज्ञानाचा कसा करावा वापर?

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा
2

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा

१,५०० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ५ भन्नाट TWS इयरबड्स; गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फास्ट चार्जिंग अन् दमदार साउंडने सुसज्ज
3

१,५०० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ५ भन्नाट TWS इयरबड्स; गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फास्ट चार्जिंग अन् दमदार साउंडने सुसज्ज

दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पै
4

दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पै

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.