Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८ वा वेतन आयोग कधी होणार लागू? सरकारने संसदेत दिली ‘ही’ महत्त्वाची अपडेट

८ व्या वेतन आयोगाबाबत केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत महत्त्वाची माहिती दिली. सव्वा कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव पगार कधी मिळणार? वाचा सविस्तर अहवाल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 17, 2025 | 09:29 PM
कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८ वा वेतन आयोग कधी होणार लागू? (Photo Credit - X)

कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८ वा वेतन आयोग कधी होणार लागू? (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार?
  • ८ व्या वेतन आयोगाबाबत केंद्राची भूमिका स्पष्ट
  • मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8th Pay Commission Update Marathi News: केंद्र सरकारी (Central Goverment) कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ८ व्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून, सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

संसदेत मंत्र्यांनी काय सांगितले?

वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, ८ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये सरकारने आयोगाच्या अटी व शर्तींना मंजुरी दिली असून, आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. या अहवालात वेतन, भत्ते आणि पेन्शनच्या पुनर्रचनेची शिफारस केली जाईल.

हे देखील वाचा: समान कामासाठी समान वेतन होणार लागू; मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष पक्षपात का?

वेतन आयोग लागू होण्याचे ‘तीन’ महत्त्वाचे संकेत

तज्ज्ञांच्या मते, ८ वा वेतन आयोग लवकरच लागू होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत:

१. १० वर्षांचे अंतर: ५ वा, ६ वा आणि ७ वा वेतन आयोग दर १० वर्षांनी (१९९६, २००६, २०१६) लागू झाला आहे. त्या हिशोबाने २०२६ मध्ये नवीन आयोग येणे अपेक्षित आहे.

२. महागाई भत्ता (DA): जेव्हा डीए ५०% च्या पुढे जातो, तेव्हा नवीन वेतन आयोगाची मागणी तीव्र होते. सध्या डीए ५८% वर पोहोचला आहे.

३. सरकारची मंजुरी: जानेवारी २०२५ मध्ये कॅबिनेटने या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी दिली होती, तर ३ नोव्हेंबर २०२५ रोजी यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

कधीपासून मिळणार वाढीव पगार?

जरी ८ व्या वेतन आयोगाची ‘प्रभावी तारीख’ १ जानेवारी २०२६ असू शकते, तरी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष वाढीव पगार जमा होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. आयोगाला १८ महिने दिले आहेत, त्यानंतर कॅबिनेट मंजुरी आणि विभागांची प्रक्रिया पार पडेल. ७ व्या वेतन आयोगाचा अनुभव पाहता, कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रत्यक्ष वाढीव पगार आणि थकबाकी (Arrears) मिळण्याची शक्यता अधिक आहे.

हे देखील वाचा: 8th Pay Commission: 1.83 ते 2.57 च्या दरम्यान फिटमेंट फॅक्टर झाल्यास, किती वाढणार पगार, सरकारी कर्मचारी होतील मालामाल

Web Title: The union minister provided important information regarding the 8th pay commission in parliament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 09:29 PM

Topics:  

  • 8th pay commission
  • Employees

संबंधित बातम्या

Mumbai Local : लोकल ट्रेनची गर्दी कमी होणार? प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा जबरदस्त प्लॅन, वाचा सविस्तर बातमी
1

Mumbai Local : लोकल ट्रेनची गर्दी कमी होणार? प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा जबरदस्त प्लॅन, वाचा सविस्तर बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.