
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
महिला उद्योजिका: 66 वर्षीय महिलांपासून ते उद्योगातील 81 वर्षांच्या अनुभवी नेत्यापर्यंत भारतातील अत्यंत अनुभवी महिला नेतृत्व देशातील काही सर्वात मोठ्या कंपन्यांचे प्रमुखपद भूषवत आहेत. ‘कँडेरे हुरुन इंडिया वुमन लीडर्स लिस्ट 2026’ ( Top Woman Entrepreneurs In India ) या लिस्टमध्ये विविध पिढ्यांमधील यशस्वी महिलांचा समावेश आहे. यामध्ये 19 वर्षीय पॅरा-आर्चरपासून ते 86 वर्षीय उद्योजिकेचा समावेश आहे, ज्या आजही आपल्या कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत.
टॉप -10 महिला उद्योजिका 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या असून सुमारे 4.3 लाख कोटींच्या एकूण बाजार भांडवलाच्या कंपन्या चालवतात. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानींच्या विहीणबाई स्वाती पिरामल यांचाही या यादीत समावेश असून विशेष म्हणजे या महिलांना व्यवसायाचा वारसा नाही मिळाला तर स्वतःच्या बळावर स्वतःची साम्राज्ये उभी केली.
कँडेरे हुरूनच्या या लिस्टमध्ये सर्वात वयस्कर महिला उद्योजकांच्या यादीत टॉप-3 मध्ये अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइजच्या 68 वर्षीय प्रीथा रेड्डी आणि 67 वर्षीय सुनीता रेड्डी दुसऱ्या क्रमांकावर ज्या 1,21,770 कोटींचा व्यवसाय सांभाळतात. तसेच या लिस्टमध्ये पिरामल ग्रुपच्या 70 वर्षीय स्वाती पिरामल तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन 85,850 कोटी रुपये आहे.
भारतातील सर्वात वयस्कर महिला व्यावसायिक लीडर्सच्या लिस्टमध्ये पुढे बायोकॉनच्या 73 वर्षीय किरण मजूमदार-शॉ 67,440 कोटींच्या कंपनीचे नेतृत्व करत आहे. तसेच सेल्सफोर्स इंडियाच्या 79 वर्षीय अरुंधती भट्टाचार्य 45,940 कोटींच्या बाजार भांडवलासह 5व्या क्रमांकावर असून पहिल्या 10 महिलांच्या लिस्टमध्ये गॉडफ्रे फिलिप्स इंडियाच्या प्रमुख 81 वर्षीय बिना मोदी यांचाही समावेश आहे, ज्यांच्या कंपनीचे मूल्यांकन 34,930 कोटी रुपये आहे.
याशिवाय या लिस्टमध्ये पुढे 69 वर्षांच्या USV च्या लीना गांधी तिवारी सातव्या क्रमांकावर असून 32,460 कोटींच्या कंपनीचे नेतृत्व करत आहेत. 22,990 कोटींचे बाजारमूल्य असलेल्या TAFE या ट्रॅक्टर आणि कृषी उपकरण कंपनीच्या प्रमुख 66 वर्षीय मल्लिका श्रीनिवासन यादीत आठव्या स्थानावर असून नवव्या क्रमांकावर सुड-केमी इंडियाच्या 66 वर्षीय अर्शिया ए लालजी तर, दहाव्या स्थानावर जेके लक्ष्मी सिमेंटच्या 74 वर्षीय विनिता सिंघानिया आहेत, ज्या 7410 कोटींच्या कंपनीचे व्यवस्थापन करतात.
श्री.संजय रघुरामन, व्यवस्थापकीय संचालक, कँडेरे म्हणाले,”गेल्या वर्षी जेव्हा आम्ही कँडेरे-हुरुन इंडिया वुमेन लीडर्स लिस्ट लाँच करण्यासाठी हुरुन इंडियासोबत सहयोग केला, तेव्हा ज्यांचे नेतृत्व, यश आणि प्रभाव भारताला अर्थपूर्ण मार्गाने आकार देतात अशा महिलांचा उत्सव साजरा करणारा एक वार्षिक सन्मान प्रस्थापित करणे हे आमचे ध्येय होते. हे दुसरे एडिशन सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये नवीन मानके प्रस्थापित करणाऱ्या नेत्यांच्या आणखी एका उल्लेखनीय समूहाचा सन्मान करण्यात आला आहे. हुरुन इंडियासोबत, आम्हाला आशा आहे की, हा सन्मान अधिक प्रतिष्ठित होत राहील.”
भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राला आकार देण्यात या अनुभवी महिलांचे योगदान कँडेरे हुरुन इंडिया वुमन लीडर्स या लिस्टमधून समोर येते. ज्येष्ठ श्रेणीतील सर्वात तरुण महिला व्यावसायिक नेत्या 66 वर्षांच्या, तर सर्वात वयस्कर 81 वर्षांच्या असून या यादीत आरोग्यसेवा, औषधनिर्माण, उत्पादन, तंत्रज्ञान, सिमेंट आणि एफएमसीजी (FMCG) यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.