Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2026: इनकम टॅक्सपासून ते हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोरपर्यंत, बजेट 2026 मधील मोठ्या घोषणांचा सर्वसामान्यांना फायदा

बजेट 2026 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 01, 2026 | 01:09 PM
बजेट 2026 मधील मोठ्या घोषणांचा सर्वसामान्यांना फायदा

बजेट 2026 मधील मोठ्या घोषणांचा सर्वसामान्यांना फायदा

Follow Us
Follow Us:
  • केंद्रीय अर्थसंकल्प सादर
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला भारताचे बजेट 2026
  • जाणून घ्या महत्वपूर्ण घोषणा
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट 2026 सादर केला आहे. या बजेटमध्ये त्यांनी विविध क्षेत्रासंबंधित मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. बजेट सादर करताना त्यांनी एकापाठोपाठ घोषणा केल्या आहेत. या घोषणांचा परिणाम सामान्य माणसापासून ते उद्योग, स्टार्टअप, एमएसएमई आणि पायाभूत सुविधा क्षेत्रापर्यंत सर्वांना होणार आहे. चला २०२६ च्या बजेटमधील प्रमुख घोषणांवर एक नजर टाकूया.

सेमीकंडक्टर क्षेत्रात 40 हजार कोटींची तरतूद

सरकारने सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी 40 हजार कोटींची सर्वात मोठी तरतूद केली आहे. यामुळे एका नवीन क्षेत्रात भारत झेप घेण्यासाठी सज्ज होत आहे.

Budget 2026: मुंबईत ABGC साठी कंटेंट क्रिएटर लॅब उभारणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा

बायोफार्मा शक्ती मिशनची सुरुवात

देशाच्या बायोफार्मा क्षमतांना बळकटी देण्याच्या उद्देशाने, सरकारने पुढील पाच वर्षांत एकूण 10000 कोटी रुपयांच्या ‘बायोफार्मा शक्ती’ उपक्रमाची सुरुवात करण्याची घोषणा केली आहे.

चार राज्यात रिअर अर्थ कॉरिडोर

ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांसारख्या खनिज संपन्न राज्यांमध्ये समर्पित ‘रेअर-अर्थ कॉरिडोर’ विकसित करण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे.

‘महात्मा गांधी ग्राम स्वराज’ उपक्रमाची सुरुवात

खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘महात्मा गांधी ग्राम स्वराज’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच वस्त्र कौशल्य इको-सिस्टीमला बळकटी देण्यासाठी आणि आधुनिकतेसाठी ‘समर्थ 2.0 मिशन’ राबवले जाईल. नैसर्गिक, मानवनिर्मित आणि न्यू-एज फायबरमध्ये आत्मनिर्भरतेसाठी ‘राष्ट्रीय फायबर धोरण’ जाहीर करण्यात आले आहे.

Budget 2026 Live: दारूला लागला ब्रेक! तळीरामांसमोर दारू कशी प्यायची प्रश्न, बजेटमुळे उभी ठाकली चिंता

टियर-2 आणि टियर-3 शहरांच्या विकासावर विशेष भर

सार्वजनिक पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात मजबूत करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. येत्या काळात 5 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे, कारण ही शहरे वेगाने उदयोन्मुख ग्रोथ सेंटर बनत आहेत.

20 नव्या जलमार्गांची घोषणा

कार्गो वाहतूक अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी पूर्वेकडील दानकुनी ते पश्चिमेकडील सूरतदरम्यान नवा समर्पित मालवाहतूक कॉरिडोर विकसित केला जाणार आहे. यासोबतच, पुढील पाच वर्षांत देशभरात 20 नवे अंतर्देशीय जलमार्ग सुरू करण्याची योजना आहे. याची सुरुवात ओडिशातील राष्ट्रीय जलमार्ग-5 पासून होईल.

हाय-स्पीड रेल कॉरिडोर

पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला चालना देण्यासाठी देशात सात हाय-स्पीड रेल कॉरिडोर विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. हे कॉरिडोर मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बेंगळुरू, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बेंगळुरू, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुडी यांना जोडतील.

प्रत्येक जिल्ह्यात गर्ल्स हॉस्टल

दीर्घकालीन शिक्षण आणि प्रयोगशाळेतील कामादरम्यान मुलींना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यात एक गर्ल्स हॉस्टल उभारले जाणार आहे. हा उपक्रम VGF योजनेअंतर्गत राबवला जाईल, ज्यामुळे विद्यार्थिनींना सुरक्षित व सोयीस्कर निवास मिळेल.

टॅक्सवर मोठी घोषणा

1 एप्रिलपासून नवीन इन्कम टॅक्स कायदा लागू केला जाणार आहे.

Web Title: Union budget 2026 new income tax high speed railway corridors know about big announcement in budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Budget
  • budget 2026
  • Nirmala Sitaraman

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.