Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात होणार रेल्वे सुधारणा संबंधित 5 मोठे बदल; प्रवाशांना मिळणार दिलासा

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये रेल्वे प्रवाशांसाठी अनेक महत्त्वाच्या सुधारणा अपेक्षित आहेत. सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांना सवलत आणि परवडणारा प्रवास यावर सरकारचा भर राहणार असणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 01, 2026 | 09:18 AM
Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात होणार रेल्वे सुधारणा संबंधित 5 मोठे बदल; प्रवाशांना मिळणार दिलासा

Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात होणार रेल्वे सुधारणा संबंधित 5 मोठे बदल; प्रवाशांना मिळणार दिलासा

Follow Us
Close
Follow Us:
  • कोविड काळात बंद झालेल्या रेल्वे तिकिट सवलती पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा असून यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास स्वस्त होऊ शकतो.
  • अपघात रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षेचा खर्च वाढवण्यावर भर, तसेच ‘कवच 4.0’ प्रणालीचा ट्रॅक कव्हरेज मोठ्या प्रमाणात वाढवण्याची शक्यता.
  • वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उत्पादन, तसेच गर्दी कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नॉन-एसी जनरल व स्लीपर कोच जोडण्यावर लक्ष.
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज २०२६ या नवीन वर्षाचा नवीन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये अनेक सेक्टरमध्ये होणारे बदल नमूद केले जातील ज्यात प्रवासासंबंधिच्या सुधारणांविषयीही बोलले जाईल. अलिकडे रेल्वे अपघातांचे प्रमाण बरेच वाढले असून रोज यामुळे कुणाचा तरी जीव पणाला लागल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती आणि अधिक आधुनिक गाड्या यासारख्या प्रवाशांच्या मागण्यांकडे अर्थसंकल्पात लक्ष केंद्रित केले जाईल अशी अपेक्षा आहे. चला तर मग प्रवासासंबंधित अर्थसंकल्पात कोणते नवे बदल अपेक्षित केले जात आहेत ते जाणून घेऊया.

या वर्षी चुकूनही बनवू नका हे देश फिरण्याचा प्लॅन… सुरक्षेच्या बाबतीत इथे आहे मोठा धोका

ज्येष्ठ नागरिक सवलती

२०२६ चा सादर होणारा अर्थसंकल्प अनेकांच्या अपेक्षांना पूर्ण करेल अशी अंदाज आहे. यात ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिट सवलती परत मिळणे, ज्या कोविड-१९ साथीच्या काळात रद्द करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर त्या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या नाहीत यावर भर दिला जाईल. यापूर्वी, ६० आणि त्यावरील पुरुषांना ४०% सवलतीसाठी पात्र होते, तर ५८ आणि त्यावरील महिलांना ५०% सवलत मिळत होती. हे बेनेफिट्स मेल, एक्सप्रेस, राजधानी, शताब्दी दुरांतो सेवांमध्ये लागू होते. कोविडच्या काळात ही सवलत तात्पुरती रद्द करण्यात आल्याचे सांगितले गेले असले तरी अद्याप तिला परत सुरु करण्यात आलेले नाही.

सुरक्षिततेसाठी मोठा दबाव

२०२६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात सुरक्षेचा मुद्दा प्रमुख राहण्याची शक्यता आहे आणि सरकार यावरील तरतूद वाढवण्याची शक्यता आहे. अनेक अहवालांनुसार, रेल्वे सुरक्षेवरील खर्च १.३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो. तर एकूण रेल्वे भाडे १०% वाढून सुमारे २.७५ लाख कोटी रुपये होण्याची अपेक्षा केली जात आहे. हाय-प्रोफाइल रेल्वे अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही वाढ होण्याची शक्यता आहे.

कवच ४.० ला निधीमध्ये मोठी वाढ मिळू शकते

३० जानेवारी रोजी, भारतीय रेल्वेने आपली स्वदेशी स्वयंचलित ट्रेन कवच व्हर्जन ४.० तीन विभागांमध्ये ४७२.३ किलोमीटरवर कार्यान्वित करण्याचे सुरु केले होते. हे रेल्वे सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. २०२६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात कवच निधीमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. मंत्रालय कवच ४.० चे कव्हरेज १८,००० किलोमीटर ट्रॅकपर्यंत वाढवण्यासाठी निविदा अंतिम टप्प्याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. ही प्रणाली अशा प्रकारे तयार केली आहे की, जर लोको पायलट ब्रेक लावण्यात अयशस्वी ठरला, तर ती आपोआप ब्रेक लावते, ज्यामुळे समोरासमोर होणारी धडक टाळण्यास मदत होईल.

वंदे भारत स्लीपर रोलआउट फोकसमध्ये

रेल्वे अर्थसंकल्पात २४-डब्यांच्या वंदे भारत स्लीपर गाड्यांच्या पूर्ण-क्षमतेच्या उत्पादनाला पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. या गाड्यांची रचना लांब पल्ल्याच्या मार्गांवरील राजधानी एक्सप्रेस सेवांची जागा घेण्यासाठी करण्यात आली आहे आणि त्यामध्ये प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह पॅन्ट्री कारचाही समावेश अपेक्षित आहे. एका प्रोटोटाइपचे उत्पादन २०२६ च्या अखेरीस पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.

जगातील असा एक देश जिथे गरुडासाठी बनवलं जात पासपोर्ट, अनोखं आहे यामागच कारण…

गर्दी कमी करण्यासाठी अधिक नॉन-एसी कोच

जुलै २०२५ मध्ये, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले की भारतीय रेल्वे चालवणाऱ्या गाड्यांमध्ये नॉन-एसी कोचचा वाटा सुमारे ७०% पर्यंत वाढला आहे. पुढील पाच वर्षांत १७,००० नॉन-एसी जनरल आणि स्लीपर कोच जोडण्यासाठी एक विशेष उत्पादन कार्यक्रम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. २०२६ च्या अर्थसंकल्पात सामान्य माणसासाठी परवडणारा प्रवास आवाक्यात ठेवण्यावर लक्ष केंद्रित करून ही योजना औपचारिक होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Union budget 2026 the union budget will bring 5 major changes related to railway reforms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • budget 2026
  • Nirmala Sitaraman
  • travel news
  • union budget 2026

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात मुंबईपासून जवळ महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या, इथले सौंदर्य तुमची समर ट्रिप करतील संस्मरणीय
1

उन्हाळ्यात मुंबईपासून जवळ महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या, इथले सौंदर्य तुमची समर ट्रिप करतील संस्मरणीय

Travel News : कैलास मानसरोवर यात्रा 2026 चे रजिस्ट्रेशन सुरू, किती असेल खर्च? जाणून घ्या
2

Travel News : कैलास मानसरोवर यात्रा 2026 चे रजिस्ट्रेशन सुरू, किती असेल खर्च? जाणून घ्या

भारतातील सर्वात Haunted Beach, इथे आहे भयानक आत्मांचे वास्तव… चुकूनही जाण्याची हिंमत करू नका
3

भारतातील सर्वात Haunted Beach, इथे आहे भयानक आत्मांचे वास्तव… चुकूनही जाण्याची हिंमत करू नका

भारतात या गावात पाण्यावर तरंगणारा रस्ता, शहरापासून दूर इथे मिळेल पर्यटनाचा अद्भुत अनुभव
4

भारतात या गावात पाण्यावर तरंगणारा रस्ता, शहरापासून दूर इथे मिळेल पर्यटनाचा अद्भुत अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.